Sri Sri Ravi Shankar has founded courses that provide techniques and tools to live a deeper, more joyous life. He has established nonprofit organizations that recognize a common human identity above the boundaries of race, nationality and religion. His goal is to uplift people around the globe, to reduce stress, and to develop leaders so that human values can flourish in people and communities.


कोरोना-व्हायरस लॉकडाऊनने प्रभावित रोजंदारीवर काम करणार्‍यांना दिलासा देण्यासाठी पुढाकार | #iStandwithHumanity - An initiative to support the daily-wage earners affected by the Coronavirus lockdown

आध्यात्मिकता आणि मानवी मूल्ये


कोरोना-व्हायरस लॉकडाऊनने प्रभावित रोजंदारीवर काम करणार्‍यांना दिलासा देण्यासाठी पुढाकार | #iStandwithHumanity - An initiative to support the daily-wage earners affected by the Coronavirus lockdown

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

२९ मार्च, २०२०
बेंगळूरू, भारत

कोरोना व्हायरस लॉकडाऊन प्रसंगी माणुसकीला साथ

भारतात कोरोना व्हायरसच्या महामारीचा झपाट्याने होणारा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभर लॉकडाऊन घोषित केला.

काबाड कष्ट करून दैनंदिन रोजंदारीवर राबणारे, ज्यांचे हातावरचे पोट आहे आणि तटपुंजे उत्पन्न असणाऱ्यांना मदत करण्यासाठी श्री श्रींनी मोहीम सुरु केली. या काळामध्ये या लोकांच्या हाताचे काम बंद झाले आहे, त्यांना आता कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. श्री श्रींनी ज्यांना शक्य आहे त्यांनी या लोकांना पोटा-पाण्याची आणि आर्थिक मदत करण्याची विनंती केली आहे.

भाषांतरित ट्विट –

रोजंदारीवर जगणाऱ्या आणि कमी उत्पन्न असणाऱ्यांची काळजी घेण्यासाठी आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा स्थानिक लोकांनी जर एकत्र केला तर हा आर्थिक बोजा स्थानिक स्तरावर विभागला जाईल. प्रत्येकाची काळजी घेण्या इतपत माणुसकी अद्याप जिवंत आहे हे आपण दाखवून देऊया.


आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक देशभरातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनमुळे प्रभावित रोजंदारी कामगारांना स्थानिक संस्थांच्या मदतीमुळे अन्न धान्य आणि किराणा मालाच्या पिशव्या तयार करून त्यांचे वाटप करत आहेत.

भाषांतरित ट्विट –

लॉकडाऊन होण्यापूर्वी वापी, गुजरात मधील स्वयंसेवकांनी त्वरित एकत्र येऊन आठवडा भराच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप रोजंदारी कामगारांना केले. परंतु कृपया आता लॉकडाऊनमध्ये असे धाडस अजिबात करू नका. प्रशासनाने अशा सेवांसाठी निवडक स्वयंसेवकांची निवड केली आहे.


भाषांतरित ट्विट –

हे काम तर सुरु झाले आहे परंतु अजून खूप काही करण्याची आवश्यकता आहे. मुंबई आणि दिल्लीतील आर्ट ऑफ लिव्हिंग च्या स्वयंसेवकांनी अन्नाची पॅकेट्स बनवून स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने रोजंदारी कामगारांना त्यांचे वाटप केले.

आर्ट ऑफ लिव्हिंग ने उपलब्ध करून दिलेल्या अन्नाच्या पॅकेट्सचे मुंबईतील रोजंदारी कामगारांना वाटप केले. स्वयंसेवकांचे आभार.


भाषांतरित ट्विट –

आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक दिल्लीमधील स्थलांतरित कामगारांना वस्तू पुरवताना.


IAHV आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त पुढाकाराने सुरु केलेल्या #iStandWithHumanity या प्रकल्पाला फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्राने ने खुल्या दिलाने पाठिबा दिला.

भाषांतरित ट्विट –

आर्ट ऑफ लिव्हिंग ने देशभरातील रोजंदारी काम करणाऱ्या दहा लाख कुटुंबांना लॉकडाऊनमध्ये दहा दिवसांचे रेशन पुरवले. यामध्ये सामील झाल्याबद्धल संपूर्ण फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीतील लोकांची मी प्रशंसा करतो. देणगी देण्यासाठी वेबसाईट : http://www.iahv.org/in-en/donate/ 


या पुढाकाराला पाठिंबा दिल्याबद्दल श्री श्रींनी फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकांची प्रशंसा केली.

Sportsmen from Kodagu, Karnataka also joined the campaign.

art of living food distribution during covid lockdown to low-income groups and migrant workersart of living food distribution during covid lockdown to low-income groups and migrant workers - 1art of living food distribution during covid lockdown with help of civic bodies to low-income groups and migrant workersart of living food distribution with help of civic bodies during covid lockdown to low-income groups and migrant workers

[custom-twitter-feeds hashtag=”#IStandWithHumanity” exclude=”retweeter”]