Sri Sri Ravi Shankar has founded courses that provide techniques and tools to live a deeper, more joyous life. He has established nonprofit organizations that recognize a common human identity above the boundaries of race, nationality and religion. His goal is to uplift people around the globe, to reduce stress, and to develop leaders so that human values can flourish in people and communities.


श्री श्रींनी नोबेल पीस सेंटर येथे आयोजित “क्लीन एअर गेम्स” या परिषदेत आपले मुख्य भाषण सादर केले | Sri Sri gives a keynote for Clean Air Games Conference at Nobel Peace Center

आध्यात्मिकता आणि मानवी मूल्ये


श्री श्रींनी नोबेल पीस सेंटर येथे आयोजित “क्लीन एअर गेम्स” या परिषदेत आपले मुख्य भाषण सादर केले | Sri Sri gives a keynote for Clean Air Games Conference at Nobel Peace Center

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

ओस्लो, नॉर्वे
४ जून, २०१९

जागतिक पर्यावरण दिवस जवळ येत असल्याच्या निमित्ताने नोबेल पीस सेंटर, ऑस्लो इथे आयोजित “क्लीन एअर गेम्स” (शुद्ध वातावरणातील खेळ) हा दोन दिवसांचा अनोखा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, ज्यात खेळाशी निगडीत पर्यावरणाच्या प्रभावाची आणि त्याच्या सातत्याची कारणे ह्या कार्यक्रमात प्रमुख अतिथि म्हणून संबोधन करण्यासाठी वैश्विक मानवतावादी आणि आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांना आमंत्रित केले गेले.

Sri Sri Ravi Shankar addressing a diverse audience on Sustainability as a mindset in Oslo, Norway

भाषांतरित ट्विट –

नॉर्वेच्या ओस्लो येथील नोबेल पीस सेंटर येथे क्लीन एअर गेम्समध्ये स्थिरतेची मानसिकता (सात्तत्य टिकवण्यासाठीची मानसिकता) या याबाबत आर्ट ऑफ लिव्हिंगचा दृष्टीकोन सामायिक करतांना आनंद झाला. समुदायांना एकत्र आणणाऱ्या, जागरूकता निर्माण करणाऱ्या आणि स्पष्ट परिणाम दर्शवणाऱ्या अशा केंद्रित प्रयत्नांनी लोकांची मानसिकता बदलू शकते.


या परिषदेस संबोधित करताना गुरुदेव म्हणाले, “प्रगती करण्यासाठी व परिवर्तन घडवून आणण्यासाठी लोकांची मानसिकता महत्वाची ठरते. केवळ उपभोग घेण्याची मनोवृत्ती सोडून, भविष्याचा विचार करण्याची मानसिकता रुजवावी लागेल आणि मानसिकतेत बदल घडून येण्यासाठी लक्षपूर्वक ऐकणे आवश्यक असते. जर एखादा व्यक्ती तणावग्रस्त असेल तर त्याला लक्ष देऊन ऐकणे शक्य होत नाही. जेंव्हा आपले अंतर्मन शांत असते तेंव्हाच आपण बाह्य शांतीचा अनुभव होऊ शकतो. एखादी व्यक्ती तणावग्रस्त असेल तर तिला कोणाबद्दल किंवा कुठल्याही ध्येयाबद्दल आस्था असणे शक्य नाही. केवळ एका शांत व्यक्तीलाच पृथ्वीबद्दल आस्था असू शकते, कारण अशी व्यक्ती धरतीला स्वत:चाच एक अंश समजते. जास्तीत जास्त लोकांना याबद्दल जागृत करावे लागेल.”

Sri Sri during a panel discussion with Liv Tørres and Knut Skeie Solberg on courageous leadership for long term sustainable investments

या परिषदेत उपस्थित अन्य मान्यवरांमध्ये नोबेल पीस सेंटरचे सीईओ, लिव टोरेस आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा समालोचक, नट स्की सोल्बर्ग यांचा समावेश होता. क्रीडा जगतातील अनेक मान्यवर, परिवर्तनकर्ते, राजकारणी, धोरणकर्ते आणि इतर सहभागधारकांना संबोधित करताना “स्थिरतेची मानसिकता (सात्तत्य टिकवण्यासाठीची मानसिकता): आर्ट ऑफ लिव्हिंग चा दृष्टीकोन” या विषयावर गुरुदेवांनी सामाजिक परिवर्तन आणण्याकरिता आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आंतरिक व बाह्य दृष्टीकोणाबद्दल विचार मांडले, ज्यात अध्यात्मिकतेमुळे आंतरिक शांती प्राप्त लोकांनी झाल्याने प्रेरित होऊन, समाज सेवेसाठी मोठे परिवर्तन घडवून आणण्याकरिता आपले योगदान दिल्याचा उल्लेख केला. १५६ देशांत कार्य करीत असलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यकर्त्यांनी यशस्वीपणे ८० लाख रोपांचे वृक्षारोपण केले आणि भारतातील ४१ नद्यांचे पुनुरुज्जीवन केले (या सर्व नद्या केवळ कागदावरच जिवंत होत्या) ज्यामुळे ५० लाख लोकांना त्याचा लाभ झाला.

गुरुदेवांनी उदाहरण देऊन सांगितले की कशा प्रकारे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी २,८०,००० शेतक-यांशी संपर्क साधून त्यांना शेतातील पिकांचे खुंट, कचरा आणि चारा जाळण्यापासून परावृत्त केले. या प्रकारांमुळे दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील हवेत विषारी तत्वांचा प्रसार होत असे आणि प्रदूषणाचा स्तर वाढत असे. शेतक-यांना कचरा जाळण्याऐवजी त्याला शेतातच पुरून सेंद्रिय खतामध्ये रुपांतर करण्याचे प्रशिक्षण दिले गेले, ज्यामुळे जमिनीला आवश्यक असलेली नायट्रोजनची मात्रा वाढली, जमिनीचा कस वाढला आणि हवा पण स्वच्छ आणि श्वसनास योग्य झाली.

त्यांनी लातूरमध्ये कशा प्रकारे परिवर्तन घडवून आणले याचे पण उदाहरण दिले. महाराष्ट्रातील एक शहर लातूर, ज्या ठिकाणी भयंकर दुष्काळ पडल्यामुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती आणि पिण्याचे पाणी सुद्धा इतर शहरातून पुरवठा करण्याची वेळ आली. जेव्हा आर्ट ऑफ लिव्हिंगने सामाजिक संस्थांसोबत हात मिळवून नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे कार्य सुरू केले, तेव्हा परिस्थिती पूर्णपणे बदलून गेली. या उपक्रमात नदी असलेल्या जमिनीतील पाण्याचे स्त्रोत पुन्हा जिवंत करून कोरड्या पडलेल्या नद्यांचे, नाल्यांचे पुनरुज्जीवन करणे. पावसाचे पाणी जमिनीत सोडण्याची व्यवस्था करणे , भूजल पुनर्भरण संरचना तयार करणे आणि परिणामी जमिनीतील पाण्याचा स्तर वाढविणे हे कार्य करण्यात आले.

श्री श्री म्हणाले, “पर्यावरणाला भौगोलिक किंवा राजनैतिक मर्यादा नाहीत. तुम्ही असं म्हणूच शकत नाही की आम्हाला फक्त नॉर्वे मध्येच शुद्ध हवा पाहिजे, कारण इतर ठिकाणी जर शुद्ध हवा नसेल तर ती तुम्हाला सुद्धा प्राप्त होणार नाही. आपल्या सर्वांची एकच पृथ्वी आणि एकच पर्यावरण आहे. आणि त्याची काळजी घेण्याकरिता आपल्याला संपूर्ण विश्वामध्ये फार मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. आणि याकरिता अध्यात्मिक मार्गांचा अवलंब करणे आवश्यक आहे.”

लोकांमध्ये पर्यावरणाप्रतीबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी अध्यात्मिक मार्गांचा अवलंब आणि मनोवृत्तीत बदल करण्याशिवाय गुरुदेवांनी पृथ्वीवर वाढत असलेल्या प्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी काही व्यावहारिक टीप पण दिल्या. श्री श्रींनी संपूर्ण जगात नववर्षाच्या स्वागतासाठी करण्यात येणा-या आतिषबाजीचा पण उल्लेख केला, ज्यामुळे हवेत विषारी तत्वांचा प्रसार होऊन वायू श्वास घेण्यायोग्य राहत नाही. श्री श्रींनी सुचविले की जगातल्या सर्वच समुदायांनी एका मध्यम मार्गाचा अवलंब करावा आणि ईलेक्ट्रॉनिक किंवा लेसर प्रकाश किरणांच्या आतिशबाजीचा वापर करावा, ज्यामुळे पर्यावरण प्रदूषित होणार नाही आणि हवा शुद्ध राहील.

नैसर्गीक शेती ही किफायतशीर नाही आणि जलद उत्पादनासाठी जमिनीत रसायने व जीएमओ बियाणे आवश्यक आहेत व ती न वापरल्यास सर्व लोक उपाशी राहतील, अशी चुकीची माहिती पसरवणाऱ्यानां गुरुदेवांनी आव्हान दिले. गुरुदेव म्हणाले, “आम्ही हे सिद्ध करून दाखवले आहे की ही चुकीची धारणा आहे. हा एक विशिष्ट वर्ग आहे जो गरीब शेतक-यांकडून त्यांची ताकत आणि धन काढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यामुळे गरीब शेतकरी आपल्या बियाण्यांचा साठा करू शकणार नाही आणि जेणेकरून दुस-यांवर अवलंबुन राहणे त्यांना भाग पडेल. नैसर्गीक पद्धतीने शेती व्यवस्थापनीय आणि सातत्य टिकवणारी आहे, हे आम्ही भारतात वारंवार निदर्शनास आणून दिले आहे.”

दीर्घकालीन गुंतवणूक करत असताना साहसी नेतृत्वाची गरज असते यावर लिव टोरेस यांच्यासोबत विचार विनिमय करताना श्री श्रींनी नोबेल पुरस्कार सम्मानित रवींद्रनाथ टागोर यांच्या एका वाक्याचा उल्लेख केला “आपल्याला काहीतरी करणे आवश्यक आहे याची खात्री झाल्यावर, आपणास अज्ञात ठिकाणांवरून विरोधाचा सामना करण्यास धैर्याची आवश्यकता असते.” यासाठी टागोरांनी एक सुंदर नारा दिला, “एकला चलो रे”. जर तुमच्या सोबत कोणीच नसेल तर एकटेच मार्गस्थ व्हा. तुम्हीजे करत आहात त्याचे महत्व लोकांच्या लक्षात येईल तेव्हा लोकं आपणहून तुमच्या बरोबर चालू लागतील.

Sri Sri in an informal conversation with Liv Tørres and Knut Skeie Solberg