Sri Sri Ravi Shankar has founded courses that provide techniques and tools to live a deeper, more joyous life. He has established nonprofit organizations that recognize a common human identity above the boundaries of race, nationality and religion. His goal is to uplift people around the globe, to reduce stress, and to develop leaders so that human values can flourish in people and communities.


‘श्वास आणि पर्यावरण’ | ‘Breath and Environment’

आध्यात्मिकता आणि मानवी मूल्ये


‘श्वास आणि पर्यावरण’ | ‘Breath and Environment’

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

१५ नोव्हेंबर, २०१९
रोम, इटली

गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांनी रोममध्ये “श्वास आणि पर्यावरण’ या विषयावर सार्वजनिक परिसंवाद घेतला. “पर्यावरण हा आपल्या शरीराचाच बाह्य विस्तार आहे. जसे आपण आपल्या शरीराची निगा राखतो तद्वत आपण आपल्या पर्यावरणाची काळजी घ्यायला हवी.” असे त्यांनी ट्विट केले.

वास्तविकतः पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी कोणत्या प्रकारची मानसिकता उपयुक्त ठरेल याचे स्पष्टीकरण या दौऱ्यादरम्यान त्यांनी केले. ते म्हणाले, “पर्यावरणाबद्दल सर्वत्र भरपूर चर्चा सुरु आहेत. जर तुम्हाला हृदयापासून काही वाटत नसेल तर तुम्ही पर्यावरणाची काळजी कशी घेणार? हा माझ्या अस्तित्वाचा एक अविभाज्य घटक आहे असे मनापासून वाटायला हवे. जशी मी माझ्या शरीराची काळजी घेतो तशीच मी पर्यावरणाची काळजी घ्यायला हवी. जेंव्हा मी माझ्या दैनंदिन कार्यामधून निर्माण होणाऱ्या ताणतणावातून मुक्त होतो तेंव्हा पर्यावरणाकडे आपसूक लक्ष जाते.”

भाषांतरित ट्विट –

पर्यावरण हा आपल्या शरीराचाच विस्तार आहे. आपण जसे आपल्या शरीराची निगा राखतो तद्वत आपल्या पर्यावरणाची काळजी घ्यायला हवी.

रोममध्ये ‘श्वास आणि पर्यावरण’ यावर सार्वजनिक व्याख्यान दिले.