Sri Sri Ravi Shankar has founded courses that provide techniques and tools to live a deeper, more joyous life. He has established nonprofit organizations that recognize a common human identity above the boundaries of race, nationality and religion. His goal is to uplift people around the globe, to reduce stress, and to develop leaders so that human values can flourish in people and communities.


कोरोना व्हायरस - परिस्थिती हाताळत असताना स्वस्थ आणि निरोगी राहण्याकरिता काही सूचना | Wellbeing And Wellness Tips To Handle The Corona Virus Situation

सेवा आणि सामाजिक कार्यक्रम


कोरोना व्हायरस - परिस्थिती हाताळत असताना स्वस्थ आणि निरोगी राहण्याकरिता काही सूचना | Wellbeing And Wellness Tips To Handle The Corona Virus Situation

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

२० मार्च २०२०,
बंगळुरू, भारत

संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडले असताना, श्री श्री रवि शंकरजी प्रत्येकाला शांत राहण्यास आणि आपल्या दिनचर्येत काही सुगम बदल करण्यास प्रेरित करीत आहेत ज्यामुळे विषाणूंचा प्रसार रोखण्यास मदत होईल.

पूर्ण लेख वाचा – “खात्री बाळगा, आपण याच्यावर मात करू.”

त्यांनी सुचवलेल्या काही सर्व साधारण सूचना आम्ही इथे देत आहोत ज्यामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ति वाढण्यास मदत होईल. :

 1. योग्य आहार घ्या ( साखर आणि मैदा यापासून तयार केलेले पदार्थ टाळा)
 2. प्राणायाम आणि काही श्वसन क्रिया करा:
  1. अनुलोम-विलोम प्राणायाम,
  2. भस्त्रिका (जोरात श्वासोच्छवासाचे अनोखे तंत्र)
  3. हळू हळू श्वास बाहेर सोडणे
  4. भ्रामरी प्राणायाम
 3. निर्देशित ध्यान
 4. आहारात हळदीचा वापर करा
 5. तुमच्या आहारात शेवग्याच्या पानांचा वापर करा

येथे एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये याचे तपशीलवार वर्णन केलेले आहे आणि ध्यान करवून घेतले आहे.

–  “प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि चिंता कमी करण्यासाठी टिपा, श्वास घेण्याची तंत्रे आणि मार्गदर्शित ध्यान

कोरोना व्हायरसमुळे आज सर्वजण बंदिस्त झाले आहेत. अचानक उद्भवलेली ही परिस्थिती हाताळण्याकरिता त्यांनी अतिशय सोप्या पद्धती या व्हिडिओ मध्ये सांगितल्या आहेत. त्यातल्या काही अतिशय सोप्या पद्धती खाली दिलेल्या आहेत.

 1. दिवसातून २ ते ३ वेळा ध्यान करा
 2. जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करा
 3. नवीन कला शिका, नवीन भाषा शिका नवीन छन्द निर्माण करा
 4. वाचन करा, ज्ञान देणारे आणि शैक्षणिक व्हिडिओ बघा
 5. सामाजिक माध्यमांचा वापर करा लोकांचा सोबत गप्पा मारा त्यांचे उत्साहवर्धन करा.
 6. काही दिवसांकरिता शांत व्हा, गती मंद करा आणि शीतल रहा.

भाषांतरित ट्विट –

आपण सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे, पण घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र त्याचवेळी स्वतःतच मग्न होऊ नका. या आव्हानात्मक परिस्थितीचा स्वीकार करा आणि याचा कसा सकारात्मक उपयोग करता येईल ते बघा. कदाचित, निसर्गाची इच्छा असेल की सारे जग ज्या वेगाने धावत आहे, त्याला थोडी उसंत मिळावी.


View this post on Instagram

Coronavirus is a huge crisis but it is also an opportunity for us to reflect on our lives, our roles and responsibilities in society, etc. We’ve been so busy, with less sleep, without much rest or we were in too much rest. So use this time to contemplate all those scenarios and see what should be the context of our lives. That will be very beneficial. Solitude is not always boring. It bring us inner strength and clarity of mind. Meditate, do Yoga, watch nature. This is a blessing in disguise. Greet others by 'Namastey'. Many of us have hardly spent any time with ourselves, so taste that silence and take some time off. Most of the time we are so active that the doer or the seer is lost in the scenery. Now is the time to abide by the being and come back from the scenery to the seer. That is yoga. #socialdistancing #meditate #solitude #corona #yoga

A post shared by Gurudev Sri Sri Ravi Shankar (@srisriravishankar) on

भाषांतरित –

कोरोनाव्हायरस ही एक खूप मोठी आपत्ती आहे परंतु समाजातील आपली जबाबदारी, समाजातील आपली भूमिका याबद्दल चिंतन करण्याची आपल्याला एक संधी आहे. आजपर्यंत आपण खूप व्यस्त होतो, कधी पुरेशी झोप न घेता, किंवा कधी पूर्ण विश्रांती न घेता, तर कधी खूपच जास्तं विश्रांती घेत होतो. म्हणून या सर्व परिस्थितींचा विचार करण्यासाठी या वेळेचा वापर करा आणि आपल्या जीवनाचा संदर्भ आधार काय असावा ते पहा. हे खूप लाभकारी ठरेल.

एकांतवास नेहमीच कंटाळवाणा नसतो. त्यामुळे आपले आंतरिक बळ वाढते, विचारांमध्ये स्पष्टता येते. ध्यान करा, योग करा, निसर्गाचे निरीक्षण करा. हा अचानक आलेला बदल अप्रत्यक्ष वरदानच आहे असे समजा. आपले हात जोडून नमस्ते करून दुसऱ्यांचे अभिवादन करा. बऱ्याच लोकांनी स्वतःसोबत कधी वेळच घालवला नसेल, तर त्या मौनाचा, एकांताचा आस्वाद घेत काही वेळ व्यतीत करा. बहुतेक वेळा आपण कार्यात इतके व्यस्त असतो की कर्ता किंवा दृष्टा दृश्यात हरवून जातो. हीच वेळ आहे आपल्या अस्तित्वाच्या संगतीत राहण्याची आणि दृष्यातून परत द्रष्ट्याकडे वळण्याची. यालाच योग म्हटले जाते.