Sri Sri Ravi Shankar has founded courses that provide techniques and tools to live a deeper, more joyous life. He has established nonprofit organizations that recognize a common human identity above the boundaries of race, nationality and religion. His goal is to uplift people around the globe, to reduce stress, and to develop leaders so that human values can flourish in people and communities.


डॉक्टर्स आणि वैद्यकीय व्यावसायिकांसाठी ऑनलाइन मेडीटेशन आणि ब्रेथ वर्कशॉप | Online Meditation and Breath Workshop for Doctors and Medical Professionals

सेवा आणि सामाजिक कार्यक्रम


डॉक्टर्स आणि वैद्यकीय व्यावसायिकांसाठी ऑनलाइन मेडीटेशन आणि ब्रेथ वर्कशॉप | Online Meditation and Breath Workshop for Doctors and Medical Professionals

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

कोविड १९ च्या साथीशी सामना करण्यासाठी आपल्या राष्ट्रीय चमूचा एक भाग म्हणून आपले डॉक्टर्स, वैद्यकीय सेवा देणारे, नर्सेस आणि वैद्यकीय व्यावसायिक लोक, रुग्णांच्या उपचारासाठी आणि त्यांना आवश्यक ती वैद्यकीय सेवा देण्यासाठी,अवजड सुरक्षा किट घालून घामाघूम होत, अथक ६ ते ८ तास काम करत अहोरात्र राबत आहेत. ते ही कधीकधी स्वतःचा जीव धोक्यात घालून. अजून एका कोविड मोहिमेअंतर्गत, असंख्य रुग्णांना सेवा देताना येणारा धडकी भरणारा ताण निवळण्यासाठी आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना आपल्या आतच काही मिनिटे तरी गहिरी शांतता अनुभवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगने १३ ते १६ दरम्यान आपले प्रणेते आणि जागतिक स्तरावरील अध्यात्मिक गुरू, गुरुदेव श्री श्री रवि शंकरजी यांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनाखाली ऑनलाइन मेडिटेशन अँड ब्रेथ वर्कशॉपचा (ऑनलाईन ध्यान आणि श्वसन प्रक्रिया कार्यक्रम) शुभारंभ केला आहे.

या शिबिरात काही श्वास प्रक्रियांचे व्यवहार्य आणि प्रभावी तंत्र शिकवले जाईल आणि डॉक्टर्सना विशेषतः या जागतिक साथीशी सामना करताना कामादरम्यान चिंता, ताण, निद्रानाश, मानसिक आघात अशा समस्यांना कधीकधी तोंड द्यावे लागते. त्याच्या निराकरणासाठी अध्यात्मिक ज्ञान दिले जाईल. या शिबिराचा उद्देश हाच आहे की, त्यांच्या चेहेऱ्यावरचे स्मित परत यावे, आणि गहिऱ्या शांतीची अनुभूती मिळावी, मन शांत आणि सुस्पष्ट असावे, भावना सुखद व्हाव्यात, ज्यामुळे त्यांना अजून चांगल्या प्रकारे सेवा करण्यासाठी उर्जा मिळेल, ते तंदुरुस्त राहतील, निरामय मानसिक आरोग्य लाभेल आणि ते अधिक कार्यक्षम होतील.

देशभरातल्या वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी अशा अनेक शिबिरांची मालिका आयोजित केली जाते आहे , त्यातील हे पहिलेच शिबीर आहे.

श्रीमती नीरु सिंग,आयएएस, यावेळी म्हणाल्या की, “वेगळ्या वाटेने विचार करण्याची दृष्टी लाभलेले आणि या शिबिराचे आयोजन करणारे ESIC हॉस्पिटल आणि कॉलेजचे डीन डॉ. श्रीनिवास यांचे आम्हाला आभार मानायला हवे. पहिल्या शिबिरात ६५ डॉक्टर्स सहभागी होत आहेत. शिबिरात सहभागी होणाऱ्या डॉक्टर्सला शिकविल्या जाणाऱ्या प्रक्रियांचा प्रभाव कसा असेल याचे संशोधन करण्याची योजना संस्थेतर्फे केली जात आहे.”

या शिबिराचे उद्घाटन माननीय गृहराज्यमंत्री श्री. जी. कृष्णन रेड्डी यांचे हस्ते, गुरुदेव श्री श्री रवि शंकरजी यांच्या पवित्र उपस्थितीत होत आहे.

श्रीमती सिंग म्हणाल्या की, “१३ मे हा गुरुदेवांचा जन्मदिन असल्याने, यापेक्षा अधिक पवित्र दिवस या महत्वाच्या कार्याच्या शुभारंभासाठी मिळाला नसता.”

या शिबिराचे संचालन स्वतः डॉक्टर असलेल्या श्रीमती नीरु सिंग आणि डॉ. यामिनी यांचेद्वारे केले जात आहे. हे शिबीर रोज दोन तास असे चार दिवसांचे राहील. त्यानंतर सहभाग्यांना आठवड्यातून एकदा होणाऱ्या पाठपुरावा सत्रात नियमितपणे सामील केले जाईल.