Sri Sri Ravi Shankar has founded courses that provide techniques and tools to live a deeper, more joyous life. He has established nonprofit organizations that recognize a common human identity above the boundaries of race, nationality and religion. His goal is to uplift people around the globe, to reduce stress, and to develop leaders so that human values can flourish in people and communities.


ग्रामीण विकास: आदिवासी युवकांचे सक्षमीकरण | Rural development: Empowering tribal youth

सेवा आणि सामाजिक कार्यक्रम


ग्रामीण विकास: आदिवासी युवकांचे सक्षमीकरण | Rural development: Empowering tribal youth

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English

बंगळूरू, भारत
२७ ऑक्टोबर, २०२०

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी श्री. अर्जुन मुंडा,( केंद्रीय मंत्री, जनजाती कार्य) आणि श्रीमती रेणुका सिंग सरुता ( राज्यमंत्री, जनजाती कार्य) यांचे समवेत उत्कृष्टतेच्या दोन केंद्रांचा शुभारंभ केला.

“आदिवासी संस्कृती कडून बरेच काही शिकण्याची आपल्याला गरज आहे.” गुरुदेव आपल्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हणाले, “मी जेव्हा त्यांच्या भागात प्रवास केला, तेव्हा ते कसे आपल्या आजूबाजूचा परिसर आणि वातावरण स्वच्छ ठेवतात हे प्रत्यक्ष मी पाहिले आहे. आपल्याला त्यांची संस्कृती आणि जीवनशैलीचे जतन करावे लागेल, आणि त्यांना जे हवे त्याबाबत मदतीचा हात पुढे करावा लागेल. गुरुदेवांनी बोलताना घाटशिला इथे आर्ट ऑफ लिव्हिंग द्वारे चालविण्यात येणाऱ्या आदिवासी शाळेचा उल्लेख केला, ज्यात मुलांना त्यांच्या आदिम संस्कृती आणि परंपरा याबाबत शिकविले जाते, सोबतच त्यांना आधुनिक शिक्षण आणि व्यावसायिक कौशल्ये शिकविली जातात ज्यायोगे त्यांना बेकारीचा सामना करावा लागणार नाही याची खात्री केली जाते. अशा सातशे हून अधिक शाळा देशभरातील ग्रामीण आणि आदिम भागात चालविल्या जात आहेत.

भाषांतरित ट्विट –

अर्जुन मुंडा ( जनजाती कार्य, केंद्रीय मंत्री) आणि श्रीमती रेणुका सिंग सरुता ( राज्यमंत्री, जनजाती कार्य) यांचे समवेत उत्कृष्टतेच्या दोन केंद्रांची सुरुवात केली. ही केंद्रे पंचायत राजच्या संस्था आणि शेतकरी वर्गाला सबळ करण्यासाठी नेतृत्व निर्माण करण्यावर आपले लक्ष केंद्रित करतील.


पहिल्या उत्कृष्टता केंद्राद्वारे संस्था अनुसूचित जमातीच्या ९०० युवकांना आपल्या समुदायात बदल घडवून आणणारे दूत म्हणून प्रशिक्षित करतील. हा प्रकल्प झारखंडच्या ५ जिल्हे आणि ६ वेगवेगळ्या पंचायत समितीतील ३० खेड्यात चालविला जाईल.

जनजाती कार्य विभागाचे केंद्रीय मंत्री मा. अर्जुन मुंडा या वेळी म्हणाले की, आज सुरु केले गेलेला हा प्रकल्प समुदायाच्या निर्मितीसाठी आणि पंचायत राजच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाची आहे. त्यांची नैसर्गिक जीवनपद्धती टिकून राहण्यासाठी संवैधानिक अधिकार, विकास आणि त्यांची सामाजिक संरचना यामध्ये सुसंवाद साधला जावा यासाठी गुरुदेवांच्या उपस्थितीत हा प्रकल्प सुरु करत आम्ही सकारात्मक पावले उचलली आहेत. ग्रामीण आणि आदिम भागातील सबलीकरणाचे हे एक उत्तम उदाहरण राहील. सामाजिक विकासाच्या दृष्टीकोणातून मुळातच गोडवा असलेल्या या आदिम समुदायांची प्रगती होणे महत्वाचे आहे. पर्यावरण टिकवून ठेवण्यासाठी ते कटिबद्ध असल्याने ते चिरंतन राहील याची खात्री पटते.”

जनजाती कार्य विभागाच्या राज्यमंत्री श्रीमती रेणुका सिंग यावेळी म्हणाल्या की, “ हे सांगताना मला आनंद होतोय की, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आधाराने आमचे मंत्रालय मागासवर्गीय जमातीच्या प्रगतीसाठी काम करेल जेणेकरून त्यांना आत्मनिर्भर होता येईल, त्यांना गौरव मिळेल आणि पंचायत राजच्या संस्थांना बळ प्राप्त होईल.

युवकांना आपले व्यक्तिमत्व आणि नेतृत्वगुण विकसित करत समुदायामध्ये सेवा करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग आपल्या यशस्वी झालेल्या समुदायांच्या सबलीकरणाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करीत त्यांना प्रशिक्षित करेल. याप्रमाणे केलेली सुरुवात प्रशिक्षित युवकांच्या मदतीने या गावांमध्ये दीर्घकालीन प्रभाव टाकण्यासाठी सातत्य राखेल.

दुसरे उत्कृष्टता केंद्र महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यात दहा हजार आदिवासी शेतकऱ्यांना शाश्वत नैसर्गिक शेती बद्दल प्रशिक्षित करण्यावर भर देईल.

श्री श्री इंस्टीट्यूट ऑफ अग्रीकल्चर सायन्सेस अँड टेक्नोलॉजी (SSIAST) ही संस्था भारतभरात नैसर्गिक शेतीचा प्रसार करीत २२ लाख शेतकऱ्यांसोबत कार्यरत आहे. SSIAST ने आता महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात “मेकिंग आत्मनिर्भर ट्रायबल फार्मर्स” हा प्रकल्प जनजाती कार्याच्या मंत्रालयासोबत हाती घेतला आहे.

या सध्याच्या तीन वर्षाच्या प्रकल्पात SSIAST दहा आदिवासी खेडी दत्तक घेणार आहे आणि दहा हजार शेतकऱ्यांना शाश्वत नैसर्गिक शेतीच्या तंत्राबद्दल प्रशिक्षित करणार आहे. स्थानीय युवकांपैकी १० जणांना मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षित करणे आणि त्यांना या काळात शेतकऱ्यांना आधार देण्यास सांगणे असे याचे स्वरूप राहील. शेतकऱ्यांना PGS सेंद्रिय प्रमाणपत्र मिळेल याची खात्री SSIAST करून घेईल तसेच त्यांना मालाच्या विक्रीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. SSIAST स्थानिक जैवविविधतेचे जतन करण्यासाठी चैतन्यशील देशी बियाण्यांची बँक निर्माण करेल आणि बियाणे राखण्यासाठी शेतकऱ्यांना बळ देईल.

“हा प्रकल्प आदिवासी शेतकऱ्यांमध्ये आत्मनिर्भरता निर्माण व्हावी यावर लक्ष केंद्रित करेल. आदिवासी समुदायाच्या पारंपारिक पर्यावरणीय ज्ञानाचे जतन आणि पुनरुज्जीवन करणे आणि रासायनिक शेतीच्या नकारात्मक परिणामांपासून त्यांचे संरक्षण करणे हा त्यांचा उद्देश आहे.” असे SSIAST चे विश्वस्त डॉ. प्रभाकर राव यावेळी म्हणाले.