Sri Sri Ravi Shankar has founded courses that provide techniques and tools to live a deeper, more joyous life. He has established nonprofit organizations that recognize a common human identity above the boundaries of race, nationality and religion. His goal is to uplift people around the globe, to reduce stress, and to develop leaders so that human values can flourish in people and communities.


कोविड परिचर्चा - वैद्यकीय जगत | Covid Conversations - Medical Fraternity

सेवा आणि सामाजिक कार्यक्रम


कोविड परिचर्चा - वैद्यकीय जगत | Covid Conversations - Medical Fraternity

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English

कोविड – १९ च्या साथीशी लढा देताना वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना आपले भावनिक ताणतणाव निवळण्यासाठी श्री श्रीं नी दिला मदतीचा हात

कोविड-१९ या रोगाची जगभर साथ पसरलेली असताना या लॉकडाऊनच्या काळात आपली सेवा दिल्याबद्दल कौतुक करीत श्री श्रीं नी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांचे अभिनंदन केले आहे आणि त्यांना स्वतःची अगत्याने काळजी घेण्याबद्दल उत्कटतेने सांगितले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या संपूर्ण तीस हजार शिक्षकांची कार्यशक्ती त्यांच्यासाठी उपलब्ध असल्याची ग्वाही देत, अत्यावश्यक सेवा देण्याच्या प्रयासात, त्यांना आपला ताण दूर करण्यासाठी आणि उत्साह आणि उमेद नव्याने जागवण्यासाठी मदत देण्यास हे शिक्षक तत्पर आहेत असे सांगितले.

भाषांतरित ट्विट –

आपल्या देशाची काळजी घेणारे डॉक्टर्स, वैद्यकीय सेवक आणि पोलीस – या सर्वांना मी आवाहन करतो की, त्यांनी आपल्या आरोग्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नये, तसेच आंतरिक बळ लाभण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी थोडे ध्यान करीत जावे.

भारताच्या विविध वैद्यकीय संघटनांच्या डॉक्टर्स सोबत चर्चात्मक सत्र पार पडले. त्यात वैद्यकीय जगताला सामना करावी लागणारी विविध आव्हाने आणि त्यावर सकारात्मक उपाय याबाबत चर्चा झाली.

श्री श्रीं नी वैद्यकीय जगताला संबोधित केले:

  • ८०००० हून अधिक डॉक्टर्स आणि ४०००० वैद्यकीय विद्यार्थ्यांचे एकत्रीकरण असलेली फिजिशियन्स अँड हेल्थकेअर वर्कर्स ऑफ अमेरिका (AAPI). कोणत्याही वेळी, अमेरिकेतील सात पैकी एक व्यक्ती भारतीय मूळ असलेल्या डॉक्टर्सच्या निगराणीखाली असते.
  • द फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकॉलॉजीकल सोसायटीज ऑफ इंडिया (FOGSI) ही २५८ संस्था आणि ३७ हजाराहून अधिक सदस्य असलेली व्यावसायिक संघटना आहे.
  • ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगीस्ट्स (AOICD) ही औषधोत्पादन क्षेत्रातल्या किरकोळ आणि घाऊक व्यवसायात गुंतलेल्या जवळपास आठ लाख सदस्यांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे.
  • श्री श्रीं सोबतच्या चर्चेत जगभरातील प्रमुख डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सच्या चमूंनी भाग घेतला.


कोविडग्रस्तांच्या मदतीचा एक भाग म्हणून लॅटिन अमेरिकेत १७५० हून अधिक आरोग्य क्षेत्रातील लोक @artofliving ऑनलाईन ब्रेथ अँड मेडीटेशन वर्कशॉपमध्ये भाग घेत आहेत. या बाबतीत पुढाकार घेण्याबाबत टीचर्स आणि स्वयंसेवकांच्या चमूचे मनस्वी अभिनंदन.

या जागतिक साथीशी सामना करताना वाटणारी भीती आणि चिंता वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी व्यक्त केली.
ताणतणावांचे व्यवस्थापन करण्याचे तंत्र शिकणाऱ्या डॉक्टर्सना संबोधित करताना श्री श्रीं नी त्यांच्या धैर्याची, वचनबद्धतेची आणि त्यांच्या विचारांच्या स्पष्टतेची भरभरून प्रशंसा केली.

डॉक्टर्स म्हणाले, “ या जागतिक साथीबद्दल आम्ही अजूनही अज्ञानात आहोत आणि त्याबाबतचे ज्ञान सीमित आहे…आणि म्हणूनच त्याबद्दल काळजी वाटत आहे…तसेच त्यामुळे लागणाऱ्या लांछनाला तोंड देत आहोत…तसेच आमचा परिवार आमची चिंता करतो, त्याचीही काळजी वाटते. या चिंतेतून मुक्त होण्यास हातभार लावल्याबद्दल आभारी आहोत.