Sri Sri Ravi Shankar has founded courses that provide techniques and tools to live a deeper, more joyous life. He has established nonprofit organizations that recognize a common human identity above the boundaries of race, nationality and religion. His goal is to uplift people around the globe, to reduce stress, and to develop leaders so that human values can flourish in people and communities.


गुरुदेव श्री श्री रवि शंकरजींनी कोलंबियन जनतेला शांततेला आणखी एक संधी देण्यासाठी आवाहन केले | Sri Sri Ravi Shankar Calls on Colombians to Give Peace Another Chance

शांती पुढाकार


गुरुदेव श्री श्री रवि शंकरजींनी कोलंबियन जनतेला शांततेला आणखी एक संधी देण्यासाठी आवाहन केले | Sri Sri Ravi Shankar Calls on Colombians to Give Peace Another Chance

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

२ सप्टेंबर २०१९
वॉशिंग्टन डीसी, युएसए

जून २०१५ मध्ये कोलंबियाच्या सर्वात मोठ्या विद्रोही गटाने, एफएआरसीच्या नेत्यांनी (FARC) आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवि शंकर यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या कार्यक्रमादरम्यान, एफएआरसीने सर्वांसमक्ष जाहीर केले की ते सामाजिक न्याय मिळविण्यासाठी अहिंसेची गांधीवादी तत्त्वे स्वीकारतील.

अलीकडेच, फार्क (एफएआरसी) ने पुन्हा शस्रास्र उचलून संघर्ष नव्याने सुरु करण्यासाठी साद देऊन या बंडखोर गटाने शस्त्रास्त्र बंदी करून शांतता प्रस्थापित करण्याच्या करारावर स्वाक्षरी केल्यावर जवळपास तीन वर्षांनंतर, पुन्हा हिंसाचाराकडे वळण्याचा आपला हा हेतू व्यक्त केला आहे.

फार्क (एफएआरसी) आणि कोलंबिया सरकारशी झालेल्या संभाषणाचा दाखला देऊन श्री श्री रवि शंकर यांनी पुन्हा एकदा एफएआरसीचा कमांडर इव्हॅन मर्केझ आणि कोलंबियाचे अध्यक्ष इव्हॅन ड्यूक यांना शांततेला पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन केले आहे.

श्री श्रीं नी दोन्ही पक्षांना शांततेत चर्चेच्या माध्यमातून मतभेद मिटवण्याचे आवाहन केले आहे.

श्री श्री म्हणाले, “दोन्ही पक्षांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. जे मुद्दे आपण चर्चेच्या माध्यमातून सोडवू शकतो त्या मुद्द्यांवरून शांतता भंग होत आहे हे पाहून वाईट वाटते.”

गेल्या तीन वर्षांपासून शांती कायम आहे हे पाहता कोलंबियाने महत्त्वपूर्ण आर्थिक प्रगती केली आहे आणि तेथील नागरिकांच्या सुरक्षिततेतही सुधारणा केली. दुर्दैवाने, देश परत वाईट आणि कठीण दिवसांकडे परत येत आहे असे दिसते.

श्री श्रींनी दोन्ही पक्षांना हिंसाचाराबाबत संयम ठेवण्याचे आवाहन केले असून कोलंबियामध्ये कायमस्वरुपी शांततेप्रती असलेल्या आपल्या प्रतिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.

गुरुदेव श्री श्री रवि शंकर म्हणाले, “दिवसेंदिवस वाढत चाललेली दरी कमी करण्यासाठी आणि ही प्रक्रिया सुलभ होण्यास मध्यस्त म्हणून योगदान देण्यास मी पुन्हा प्रस्तुत आहे.”

संबंधित लेख :