Sri Sri Ravi Shankar has founded courses that provide techniques and tools to live a deeper, more joyous life. He has established nonprofit organizations that recognize a common human identity above the boundaries of race, nationality and religion. His goal is to uplift people around the globe, to reduce stress, and to develop leaders so that human values can flourish in people and communities.


कोरोना व्हायरस परिस्थिती - लोक आणि सरकार यांच्या समर्थनार्थ | Corona Virus Situation - Supporting people and the government

शांती पुढाकार


कोरोना व्हायरस परिस्थिती - लोक आणि सरकार यांच्या समर्थनार्थ  | Corona Virus Situation - Supporting people and the government

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English

२० मार्च २०२०
बेंगळुरू, भारत

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यु पाळण्याच्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद द्यावा आणि स्वतःचे आरोग्य धोक्यात असूनही आवश्यक सेवा पुरविण्यासाठी अथक परिश्रम घेत असलेल्या लोकांचे कौतुक करावे असे श्री श्री रवि शंकर यांनी लोकांना आवाहन केले.

भाषांतरित ट्विट –

आतापर्यंत भारताने कोरोना-व्हायरसशी लढतांना उत्कृष्ट कामगिरी केली आहे, परंतु आपल्याला अजुन बरीच सावधगिरी बाळगायची आहे. म्हणून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी ह्यांनी यांनी दिनांक २२ मार्च रोजी जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले आहे त्याला आपण पूर्ण पाठिंबा देऊ. अत्यावश्यक सेवा पुरवून जे लोक आपल्यासाठी या आपत्तीचा सामना करत आहेत अशा लोकांचे आपण प्रशंसा/ कौतुक करू या.


जे लोक स्वेच्छेने स्वत:चे वेतन कपात स्वीकारू शकतात अशा लोकांनी कोरोना विषाणूच्या परिस्थितीमुळे विपरित परिणाम झालेल्या रोजंदारीवरील मजुरांचा आणि कमी पगार असलेल्या कामगारांचे आर्थिक ओझे स्वेच्छेने स्वीकारून मानवतेचा भक्कम संदेश देण्याची विनंती त्यांनी केली.

तुमच्या आसपासच्या भागात असलेल्या रोजंदारीवरील मजुरांचा आणि कमी पगाराच्या कामगारांचा आर्थिक बोजा कमी करण्याकरिता आणि त्यांची काळजी घेण्याकरिता जे लोक स्वेच्छेने स्वत:चे वेतन कपात स्वीकारू शकतात अशा लोकांनी वेतन कपात करून आणि एकत्रितपणे देणगी गोळा करावी जेणेकरून त्यांचा आर्थिक बोजा सामाजिकपणे वाटून घेता येईल. समाजातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेण्याइतपत पुरेशी मानवता अजूनही शिल्लक आहे याची आपण त्यांना हमी/ पुष्टी देऊ या.


गेल्या काही दिवसांपासून श्री श्री कोरोना विषाणूजन्य परिस्थितीशी झुंज देण्याचे उपाय विविध माध्यमांद्वारे लोकांसमोर मांडत आहेत.

श्री श्री यांचा संदेश इथे वाचा.