Sri Sri Ravi Shankar has founded courses that provide techniques and tools to live a deeper, more joyous life. He has established nonprofit organizations that recognize a common human identity above the boundaries of race, nationality and religion. His goal is to uplift people around the globe, to reduce stress, and to develop leaders so that human values can flourish in people and communities.


दिल्लीत शांतता आणि एकोपा राखण्यासाठी आपण सारे प्रतिबद्ध होऊ या | Let us all commit to harmony and peace in Delhi

शांती पुढाकार


दिल्लीत शांतता आणि एकोपा राखण्यासाठी आपण सारे प्रतिबद्ध होऊ या | Let us all commit to harmony and peace in Delhi

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

“मी तुम्हा सर्वांना दिल्लीमध्ये शांतता आणि एकोप्याचे वातावरण राखण्याचे आवाहन करतो. कित्येक जीव गमावले गेलेत आणि अनेक दुकानांची नासधूस झाली आहे. गतकाळात झालेली ही सर्वात दुर्दैवी घटना आहे आणि ते ही आपल्या देशाच्या राजधानीत. आपण कसल्याही अफवा ऐकू नयेत आणि त्यासोबत वाहवत जाऊ नये. आपण सारे एकजुटीने राहू या. काही भागात लोक एकमेकांच्या मदतीला धावून आले आहेत, मग ते कोणत्याही धर्माचे आणि जातीचे का असेना. ते एकमेकांचे रक्षण करण्यासाठी एकत्र आलेले आहेत. आपण असेच करत राहू या. कोणत्याही समाजविघातक तत्वांना या परिस्थितीचा फायदा घेऊ द्यायचा नाही. अनेक दशकांपासून दिल्लीत जशी सौहार्द्रता आणि शांतता होती तशी ती राखण्याचा आपण संकल्प घेऊ या.”

भाषांतरित ट्विट –

समाजातील सर्व घटकांना शांतता राखण्याचे मी आवाहन करतो. ज्यांनी जीव गमावलेत त्यांच्या परिवारांच्या सदस्यांसाठी आमच्याकडून अंतःकरणातून शोक व्यक्त करतो. हीच वेळ आहे जेव्हा प्रत्येकाला शांततेसाठी ठामपणे उभे रहायचे आहे. काही भागांत लोकांनी दाखवून दिले की ते शांतता राखण्यासाठी कसे एकजुटीने राहू शकतात आणि समाजविघातक प्रवृत्तींना एकोप्याचा भंग करण्यापासून कसे दूर ठेऊ शकतात.