पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यु पाळण्याच्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद द्यावा आणि स्वतःचे आरोग्य धोक्यात असूनही आवश्यक सेवा पुरविण्यासाठी अथक परिश्रम घेत असलेल्या लोकांचे कौतुक करावे असे श्री श्री रवि शंकर यांनी लोकांना आवाहन केले.
गुरुदेव श्री श्रीं नी भारताच्या राजधानीमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी केलेल्या आवाहनानंतर त्यांनी स्वतः नवी दिल्लीतील दंगल ग्रस्त भागांना भेट दिली.
काही भागात लोक एकमेकांच्या मदतीला धावून आले आहेत, मग ते कोणत्याही धर्माचे आणि जातीचे का असेना. ते एकमेकांचे रक्षण करण्यासाठी एकत्र आलेले आहेत. आपण असेच करत राहू या. कोणत्याही समाजविघातक तत्वांना या परिस्थितीचा फायदा घेऊ द्यायचा नाही. अनेक दशकांपासून दिल्लीत जशी सौहार्द्रता आणि शांतता होती तशी ती राखण्याचा आपण संकल्प घेऊ या
फार्क (एफएआरसी) आणि कोलंबिया सरकारशी झालेल्या संभाषणाचा दाखला देऊन श्री श्री रवि शंकर यांनी पुन्हा एकदा एफएआरसीचा कमांडर इव्हॅन मर्केझ आणि कोलंबियाचे अध्यक्ष इव्हॅन ड्यूक यांना शांततेला पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन केले आहे.
व्हेनेझुएलामध्ये शांततापूर्ण संवादासाठी सन्मानीत श्री श्रींच्या प्रयत्नांचे अध्यक्ष मादूरो, श्री जुआन ग्वाइद (राजकीय नेते व राष्ट्रीय विधानसभेचे अध्यक्ष, व्हेनेझुएला) व विरोधी नेत्यांनी त्यांचे स्वागत व कौतुक केले.
श्री श्रींनी व्हेनेझुएलाला आठ वर्षांनंतर भेट दिली. त्यांनी अध्यक्ष मादुरो आणि उपाध्यक्ष डेल्सी रॉड्रीगेझ यांच्याकडे शांतता, संघर्षाचे निराकरण आणि पर्यावरण आदि विषयांवर आपले विचार मांडले. त्यांनी ताणतणाव समाप्त करण्यासाठी आणि देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांसोबत भेट घेण्याची आपली इच्छा व्यक्त केली.
"प्रगती आणि सर्वजातीय एकोप्याबद्दल ख्याती असलेले केरळ हे राज्य आज धुसमुसत आहे, याबद्दल वाईट वाटते. मी सर्वांना शांतता राखावी आणि सर्व हिंसात्मक कृत्याला आवर घालावा असे जाहीर आवाहन करतो."
राम जन्मभूमि - बाबरी मस्जिद प्रकरणातील प्रमुख मुस्लिम याचिकाकर्ते हाजी महबूब आणि मोहम्मद उमर यांनी एका निवेदनावर स्वाक्षरी केली ज्यात या समस्येवर दोन्ही पक्षात सामंजस्यपूर्ण (कोर्टाबाहेर) तोडगा निघावा असे म्हटले आहे. अयोध्येतील केवड़ा मस्जिदचे इमाम आणि टेढ़ी बाज़ार मस्जिदच्या इमामांनी देखील या निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे आंतरराष्ट्रीय सेंटर, बेंगळूरू येथे १०,००० लोकांच्या उपस्थितीत, महात्मा गांधींच्या १४९ व्या जयंती निमित्त युनायटेड पीपल्स लिबरेशन आर्मी (ULPA) च्या नेत्यांनी आपला आठ वर्षांचा संघर्ष त्यागून, आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी लोकशाही आणि शांततेचा मार्ग अवलंबू, अशी प्रतिज्ञा केली.
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी महात्मा गांधींच्या १४९ व्या जयंतीच्या वर्धापन दिनानिमित्त अमेरिकन शिष्टमंडळातील सर्वोच्च पोलिस, शिक्षणतज्ज्ञ आणि धोरण निर्मात्यांना संबोधित केले.
गुरूदेव श्री श्री रविशंकरजींनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आंतरराष्ट्रीय केंद्रात शुक्रवारी काश्मीरच्या संघर्ष पिडितांचे "पैगाम-ए-मोहब्बत" संमेलन आयोजित केले. यात आतंकवाद्यांची कुटुंबे, क्रॉस फायरिंगमुळे बळी पडलेल्यांची कुटुंबे, आणि काश्मीर मध्ये शहीद झालेले भारतीय सैनिकांची कुटुंबे असे सर्व मिळून २०० कुटुंबांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उत्तर-पूर्व राज्यांचे खरी शांती, समृध्दी आणि आनंद मिळवण्याचे अंतिम लक्ष्य साध्य करण्यासाठी गुवाहाटीच्या घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या करून दिवसभर चाललेल्या परिषदेचे समापन झाले.
कोलंबियामधील एफएआरसीचे (FARC) राजकारण आणि शांततेकडे संक्रमण होत असतांना, त्यांच्या नेत्यांनी या प्रांतात श्री श्रीं च्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
७१ व्या स्वतंत्रता दिवसाच्या पूर्वसंध्येला मणिपुरच्या बहिष्कृत उग्रवादी गटाच्या ६८ सदस्यांचा घरवापसी समारोह म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अशांत क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमध्ये एक महत्वाचे पाऊल आहे.
‘आय मेडीटेट आफ्रिका’ या उपक्रमाअंतर्गत आफ्रिका महाद्विपातल्या शाळा, कॉलेजेस, विश्वविद्यालये, तुरुंग, कारखाने, चर्च आणि कॉर्पोरेट ऑफिसेस अशा अनेक ठिकाणी पूर्ण महिनाभर सामूहिक शांती ध्यान/प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आणि याचे समापन “आफ्रिका दिवस” या दिवशी श्री श्रीं द्वारा निर्देशित शांती ध्यानाने झाले.
अध्यात्मिक नेते आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी दक्षिण आणि मध्य अमेरिकेतल्या जगातील सर्वात जास्त हिंसाग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या चालू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून लॅटिन अमेरिकेतील आठ देशातल्या तब्बल तेरा शहरांचा दौरा केला.
कोलंबिया मध्ये FARC संघटनेकडून अहिंसावादी तत्वांचे पालन करण्याचे वचन घेऊन आणि ऐतिहासिक शांतता करार घडविण्यास मोठे प्रयत्न करीत मागील दौरा यशस्वीपणे आटोपल्यावर, यावेळी कोलंबियन सरकारच्या समेटाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी आमंत्रित केल्याने गुरुदेव परत कोलंबियात आले आहेत.
मानवतावादी आणि आध्यात्मिक नेते गुरुदेव श्री श्री रविशंकरजी स्थापित आर्ट ऑफ लिव्हिंगने 'काश्मीर-बॅक टू पॅराडाईज' परिषदेचा एक भाग म्हणून काश्मिरातील सद्यस्थितीवर चर्चा घडवून आणण्यासाठी विविध गटांच्या लोकांना एकत्र आणले.
आज कोलंबियामध्ये अध्यक्ष सँटोस आणि एफ.ए.आर.सी (FARC) गट या दोघांत होणाऱ्या शांती कराराला मंजूरी देण्यासाठी सार्वमत चाचणी घेण्यात आली, त्यात हो आणि नाही असे मत देणाऱ्या गटात फारच कमी फरक होता. त्यात कराराच्या बाजूने ४९.८% मते पडली तर ५०.२% कोलंबियावासीयांनी त्यास नकार दर्शविला.