Sri Sri Ravi Shankar has founded courses that provide techniques and tools to live a deeper, more joyous life. He has established nonprofit organizations that recognize a common human identity above the boundaries of race, nationality and religion. His goal is to uplift people around the globe, to reduce stress, and to develop leaders so that human values can flourish in people and communities.


कोविड १९ चा सामना करण्यासाठी- जगताची पुनर्रचना | Shaping a New World Together - Responding to Covid-19 scenario

नेतृत्व आणि नैतिकता


कोविड १९ चा सामना करण्यासाठी- जगताची पुनर्रचना | Shaping a New World Together - Responding to Covid-19 scenario

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

७ एप्रिल, २०२०
बेंगळुरू, भारत

‘वर्ल्ड फोरम फॉर एथिक्स इन बिझनेस’ (व्यापारात नैतिकता आणण्यासाठी विश्व मंच) द्वारे आयोजित “शेपिंग अ न्यू वर्ल्ड टुगेदर – नेव्हिगेटिंग द वेल बिईंग, एथिक्स अँड बिझनेस नाऊ अँड पोस्ट कोरोना” (एकत्रितपणे नवीन जगाला आकार देणे – आता आणि कोरोना नंतर “आरोग्य, नैतिकता आणि व्यवसायासाठी – कोरोना दरम्यान आणि कोरोनापश्चात जगताची पुनर्रचना) या परिषदेच्या उद्घाटनपर सत्रात श्री श्री रवि शंकरजींनी मार्गदर्शन केले.

कोरोना व्हायरसच्या साथीमुळे संपूर्ण जगासमोर ज्या विविध समस्या उभ्या ठाकल्या आहेत, त्याच्या उपायांवर चर्चा करण्यासाठी या परिषदेत विविध क्षेत्रातील जागतिक स्तरावरील नेत्यांनी भाग घेतला. सध्याच्या परिस्थितीत लोकांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचे महत्व तसेच सध्याच्या कोविड-१९ शी निगडित समस्या आणि त्यानंतर उभे ठाकणारे प्रश्न यावर देखील त्यांनी चर्चा केली.

भाषांतरित ट्विट –

‘वर्ल्ड फोरम फॉर एथिक्स इन बिझनेस’ (व्यापारात नैतिकता आणण्यासाठी विश्व मंच) सोबत व्हिडिओ परिषदेत चर्चा केली, ज्यात जागतिक स्तरावर विख्यात असलेले पॉंटीफिकल अकॅडमी ऑफ सायन्सेस आणि पॉंटीफिकल अकॅडमी ऑफ सोशल सायन्सेसचे चान्सलर बिशप डॉ. मार्सेलो सांचेझ सोरोंडो तसेच युरोपियन संसदेच्या उपाध्यक्षा होली सी डॉ. कटरिना बार्ली यांनीही भाग घेतला. १/४

टीम रॅम, काँग्रेस सदस्य, यूएसए, डॉ. गीता कृष्णन गोपालकृष्ण पिल्लई, टेक्निकल ऑफिसर, ट्रॅडिशनल कॉम्प्लिमेंटरी अँड इंटिग्रेटीव्ह मेडिसीन युनिट, जागतिक आरोग्य संघटना डॉ. संजय प्रधान, जागतिक बँकेचे माजी उपाध्यक्ष २/४

ट्युनिशियाचे माजी अध्यक्ष महामहिम मोहमद मोंसेफ मार्झुकी, स्लोव्हेनियाचे माजी पंतप्रधान मे लॉज्झे पिटर्ले, युरोपियन संसदेचे माजी सदस्य मि. जो लिनेन
स्विस फेड कप टिमचे कोच मि.हेंझ गुंटार्थ, UNEP चे माजी प्रमुख मि. एरीक सोल्हेम ३/४

मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रोफेसर प्रो. डेरॉन एसमोग्लू, एलिझाबेथ आणि जेम्स किलीयन

आम्ही सध्याच्या कोविड-१९ च्या विविध समस्यांवर आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या प्रश्नांवर तसेच या परिस्थितीत लोकांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे किती महत्वाचे आहे यावर चर्चा केली. ४/४


wfeb covid call with Sri Sri Ravi Shankar - april 2020

भाषांतरित ट्विट –

‘वर्ल्ड फोरम फॉर एथिक्स इन बिझनेस’ (व्यापारात नैतिकता आणण्यासाठी विश्व मंच) ने काल जागतिक नेत्यांसोबत “शेपिंग अ न्यू वर्ल्ड टुगेदर – नेव्हिगेटिंग द वेल बिईंग, एथिक्स अँड बिझनेस नाऊ अँड पोस्ट कोरोना” या विषयावर विचारमंथन चर्चेचा आरंभ केला, याचे यजमान पद #WFEB चे संस्थापक श्री श्री रवि शंकरजी यांनी भूषविले.

अधिक माहिती या ठिकाणी लवकरच देण्यात येईल. #COVID19