Sri Sri Ravi Shankar has founded courses that provide techniques and tools to live a deeper, more joyous life. He has established nonprofit organizations that recognize a common human identity above the boundaries of race, nationality and religion. His goal is to uplift people around the globe, to reduce stress, and to develop leaders so that human values can flourish in people and communities.


नवव्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत बालिकांचे प्रश्न आणि पर्यावरणावर प्रामुख्याने चर्चा | Girl Child and Environment take centre stage at the 9th International Women's Conference

नेतृत्व आणि नैतिकता


नवव्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत बालिकांचे प्रश्न आणि पर्यावरणावर प्रामुख्याने चर्चा | Girl Child and Environment take centre stage at the 9th International Women's Conference

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आंतरराष्ट्रीय केंद्रातील नयनरम्य विशालाक्षी मंडपात ही परिषद पार पडली. या परिषदेचा शुभारंभ ४०० सामर्थ्यशाली महिलांनी सामाजिक परिवर्तनाबद्दल त्यांच्या असलेल्या कळकळीचा वृत्तांत मोहक पण तितक्याच परिणामकारक शैलीत वर्णन करून झाला.

१४ फरवरी, २०१९
बंगलोर, भारत

स्त्री पुरुषांचे विषम प्रमाण बदलण्यासाठी पंजाबात सुरू केलेली चळवळ आणि मुलीचा जन्म हा उत्सव म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू करणे असो, लॅटिवीयन लोकसंस्कृतीला जागतिक सांस्कृतिक नकाशावर आणण्याचे काम असो, नेपाळच्या संसदेत, वारसा हक्कात आणि सामाजिक न्यायामध्ये अधिक प्रतिनिधित्व मिळण्यासाठी तिथला कायदा बदलणे असो, भारतातील पहिलीच महिला IPS अधिकारी म्हणून दिल्ली पोलीस दलात कळकळीने सेवा करणे असो, अशा विविध क्षेत्रात नवव्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत भाग घेणाऱ्या या महिला वक्त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.

Inaugural event of the International Women’s Conference

उदघाटन सत्रात केंद्रीय मंत्री हरसिम्रत कौर, उच्च न्यायालयाच्या न्या. गीता मित्तल, पुदुच्चेरीच्या राज्यपाल डॉ. किरण बेदी, युरोपियन संसदेच्या लाटव्हियाच्या सदस्या डेस मेलबार्ड, गोव्याच्या माजी राज्यपाल श्रीमती मृदुल सिन्हा, उत्तराखंडच्या राज्यपाल श्रीमती बेबी राणी मौर्या, नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती न्या. सपना प्रधान मल्ला, फ्रेंच पत्रकार आणि पर्यावरणवादी व माजी पर्यावरण मंत्री निकोलस ह्युलोट या वक्त्यांनी आपली मते मांडली.

या परिषदेत इतर गणमान्य व्यक्तींमध्ये अभिनेत्री आणि कर्नाटक भाजपाच्या प्रवक्त्या श्रीमती मालविका अविनाश, कर्नाटकचे आमदार डॉ. उदय गरुडाचर यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती मेदिनी गरुडाचर आणि आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त कलाकार रेखा हेब्बर राव यांचा समावेश होता.

आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या अध्यक्षा आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या निदेशक श्रीमती भानुमती नरसिंहन आपल्या उदघाटनपर भाषणात परिषदेची पार्श्वभूमी निश्चित करताना म्हणाल्या “जीवनाचे मंडळ पूर्ण करण्यासाठी करुणा, वैराग्य आणि उत्कटता या तिन्ही गोष्टींना महत्व असते. त्या पुढे म्हणाल्या, “जेव्हा आपल्याला एखाद्या कामाबद्दल उत्कटता असते, तेव्हा त्याचे परिणाम त्या कामातूनच दिसून येतात. त्यामुळे सर्व पर्यायामधून जे सर्वोत्तम आहे ते आपण पारखायची क्षमता येते. आपले काही विशिष्ट ध्येय असेल व सोबतच त्या सर्वोच्च शक्तीवर आपली अटळ श्रद्धा असल्यास आपण म्हणतो की हे किंवा यापेक्षा अधिक चांगले असेल ते घडो आणि तेव्हा आपल्याला वैराग्याचे बळ लाभते. करुणा म्हणजे विशाल दृष्टीकोणातून बघणे…आपली नाळ कशी सर्वांशी जुळलेली आहे ते बघणे.”

स्त्रीत्व, अध्यात्म आणि संयुक्त कार्य यांचा उत्सव साजरा करण्यासाठी गेल्या १५ वर्षापासून आयोजित होणाऱ्या या परीषदेत जवळपास ११० देशांतील ४२५ आंतरराष्ट्रीय वक्त्यांनी आणि सहा हजाराहून अधिक प्रतिनिधींनी भाग घेतला आहे.

मा. केंद्रीय मंत्री श्रीमती हरसिम्रत कौर यांनी तुलनेने नव्या असलेल्या शीख धर्मातील संपन्नता आणि समानता तसेच बदल घडवून आणण्यात प्रेरक ठरलेल्या अध्यात्माची भूमिका यावर आपले विचार मांडले.

श्रीमती कौर म्हणाल्या, “प्रत्येक व्यक्तीच्या आत अध्यात्मिक अंश असतोच, त्याला चेतविण्यासाठी कुणाची तरी गरज असते…अध्यात्मिक जीवन म्हणजे आपल्या आवेगाला योग्य दिशा देणे. अशा दिशेने, जिथे आपली निर्मिती करणाऱ्या जगन्नित्याला विशाल कार्यासाठी अभिप्रेत होते…तुमच्या जीवनात गुरू असले आणि तुम्ही त्यांचा मार्ग अनुसरीत असलात, तर तुमचे आयुष्य सहजसोपे आणि तणावमुक्त होते.

भाषांतरित ट्विट –

#IWC2020 मध्ये आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या महिला जगभरातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी आणि बळ देण्यासाठी आल्या आहेत.पुडुचेरी च्या राज्यपाल , डॉ किरण बेदी , उत्तराखंड च्या राज्यपाल श्रीमती बेबी राणी मौर्या, केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री श्रीमती हरसिमरत बादल १/३

इक्वेडोरचे माजी अध्यक्ष रोसालिया आरटीग , गोव्याच्या माजी राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा, नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मा. सपना प्रधान मल्ला, जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती गीता मित्तल, लाटव्हियाच्या युरोपियन संसदेतील सदस्या डेस मेलबार्ड, फ्रान्सचे माजी पर्यावरण मंत्री हुलॉट २/३

हंस फाउंडेशनच्या माता श्री मंगलाजी, कर्नाटक भाजपच्या प्रवक्त्या श्रीमती मालविका अविनाश, टेहरी गढवालच्या महाराणी आणि खासदार, महाराणी माला शाह, नेल्सन मंडेला यांची नात एंडिलिका मंडेला, वेगन सिलेब्रिटी शेफ लॉरेन व्हॉन डेर पूल आणि इतर अनेक गणमान्य व्यक्ती ३/३


तसेच दुसऱ्या वक्त्या मा. न्यायमूर्ती सपना प्रधान मल्ला यांनी नेपाळमध्ये महिलांना न्याय मिळू देण्यात अडचणी, मानवाधिकार, लैंगिक शोषण, वारसाहक्क आणि विवाहात, घटस्फोट, नोकरी आणि नागरिकता आदी मध्ये भेदभाव यावर प्रकाश टाकला. त्या काही पुरुष सदस्यांसहित इतर अनेकांचा सहयोग घेत खंबीरपणे लढल्या आणि आज महिलांना वाढीव प्रतिनिधित्व मिळाले आहे.

भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी श्रीमती किरण बेदी यांनी त्या अवघ्या नऊ वर्षाच्या असताना एका व्यक्तीला तो आपल्या पत्नीला मारत असताना कसे रोखले आणि त्यावेळी आपण न्याय मिळवून देण्याप्रती आपण कसे प्रतिबद्ध आहोत याची त्यांना प्रथमच कशी जाणीव झाली याबद्दल सांगितले. तसेच त्यांनी जी गोष्ट आपल्याला अति प्रिय आहे त्याबद्दल कधीही तक्रार करायची नाही हे आपण कसे शिकलो याबद्दल ही सांगितले. न्यायाबद्दल बोलताना न्या. गीता मित्तल म्हणाल्या,”आपल्याला सारे पूर्वग्रह बाजूला सारत निरपेक्षपणे वस्तुस्थितीचे मूल्यमापन करून मगच निकाल द्यावा. मी कधीच चुकले नाही असे नाही, पण कुणालाही आपली बाजू ऐकली गेली नाही अशी तक्रार नसावी.”

400 women leaders from across the world assemble for the International womens conference

परिषदेच्या पुढील सत्रात जे ख्यातनाम वक्ते आपले विचार मांडणार आहेत, त्यात अमेरिकेचे वेगन सिलेब्रिटी शेफ आणि कुकबुकचे लेखक लॉरेन व्हॉन डेर पूल, सर्वांगीण जीवनशैलीचे कोच ल्युक कुटीन्हो, लेखिका आणि पर्यावरण तज्ञ श्रीमती वंदना शिवा यांचा समावेश आहे.

गुरुदेव श्रीश्री रवि शंकरजी आणि माईंड व्हॅलीचे सीईओ विशेन लाखीयानी यांच्यात झालेले चर्चासत्र ‘द अननोन फॅक्टर’ हे परिषदेचे प्रमुख आकर्षण होते.

भाषांतरित ट्विट –

माईंड व्हॅली चे संस्थापक विशेन लाखीयानी यांच्याद्वारे संचालित चर्चात्मक सत्र ‘द अननोन फॅक्टर’ – चेतनेचे विभिन्न पैलू आणि त्याची रोजच्या जीवनातली उपयुक्तता, ध्यानाचे तंत्र, आपले मन नियंत्रित ठेवायला त्याची होणारी मदत आणि त्याचा नातेसंबंधावर होणारा सकारात्मक प्रभाव या बाबींवर आम्ही चर्चा केली.


या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्र आयोजित केले आहेत, जसे, सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सोशल मीडिया संसाधनांचा सृजनामक वापर, सकारात्मक योगदान देणाऱ्यांचा दृष्टिकोन कसा हवा, आरोग्याचे भान राखणारी जीवनशैली कशी असावी, पर्यावरणाचे जतन करतानाच आपले हित आणि प्रसन्नता कशी राखावी, विविधतेत एकता साजरी करणारी संस्कृती कशी जोपासावी यावर सांगोपांग चर्चा इत्यादी.

या कागद विरहित परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे मिशन ग्रीन अर्थ २०२० (हरित विश्व मिशन), ज्यात येत्या पाच वर्षात एक करोड रोपांची लागवड आणि त्याची देखभाल करणे हा संकल्प घेतला गेला.

launch of mission green earth

भाषांतरित ट्विट –

प्रख्यात ब्राज़ीलियाई गायिका फ़ैंटाइनहो पियानो वर ९ व्या अंतर्राष्ट्रीय महिला सम्मेलनाचे थीम गीत गातांना. # IWC2020


भाषांतरित ट्विट –

सुप्रसिद्ध भारतीय पार्श्वगायिका हेमा सरदेसाई यांनी # IWC2020 च्या थीम गीताची भावपूर्ण प्रस्तुति केली. ज्याने प्रत्येकाला मंत्रमुग्ध करून ताल धरायला लावला.