व्यक्तींना सक्षम बनवून समाजामध्ये स्थायी बदल घडवून आणल्याबद्दल गुरुदेव श्री श्री रवि शंकर जींच्या प्रयत्नांची नोंद घेऊन भू-स्थानिक विश्व मंच (जीओस्पेशियल वर्ल्ड फोरम) द्वारा " जीओस्पेशियल वर्ल्ड अवॉर्ड फॉर सोसायटल इम्पॅक्ट" ने त्यांना सन्मानित केले.
व्यवसायातील नितीमत्ता, उत्तम प्रबंधन आणि सामायिक मुल्ये जपण्यासाठी गेल्या चौदा वर्षांपासून झटत जागतिक पातळीवर पुढाकार घेणाऱ्या संघटनेच्या वर्ल्ड फोरम फॉर एथिक्स ईन बिझनेस (व्यवसायातील नितीमत्तेकरीता जागतिक मंच),च्या मंचावर श्री श्रींनी पर्यावरण क्षेत्रातल्या विचारवंतांना संबोधित केले.
कोरोना व्हायरसच्या जागतिक साथीने सर्वांच्या शारीरिक हालचालींवर अनेक बंधने आली असतानाही, गुरुदेवांना सर्वांशी ऑनलाईन माध्यमांतून संपर्कात राहण्यात कसलाही अडथळा आलेला नाही.
'वर्ल्ड फोरम फॉर एथिक्स इन बिझनेस' (व्यापारात नैतिकता आणण्यासाठी विश्व मंच) द्वारे आयोजित "शेपिंग अ न्यू वर्ल्ड टुगेदर - नेव्हिगेटिंग द वेल बिईंग, एथिक्स अँड बिझनेस नाऊ अँड पोस्ट कोरोना" (एकत्रितपणे नवीन जगाला आकार देणे - आता आणि कोरोना नंतर “आरोग्य, नैतिकता आणि व्यवसायासाठी - कोरोना दरम्यान आणि कोरोनापश्चात जगताची पुनर्रचना) या परिषदेच्या उद्घाटनपर सत्रात श्री श्री रवि शंकरजींनी मार्गदर्शन केले.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आंतरराष्ट्रीय केंद्रातील नयनरम्य विशालाक्षी मंडपात ही परिषद पार पडली. या परिषदेचा शुभारंभ ४०० सामर्थ्यशाली महिलांनी सामाजिक परिवर्तनाबद्दल त्यांच्या असलेल्या कळकळीचा वृत्तांत मोहक पण तितक्याच परिणामकारक शैलीत वर्णन करून झाला.
‘प्रमोटिंग डिजिटल चाईल्ड डिग्निटी – फ्रॉम कॉन्सेप्ट टू ऍकशन ” (डिजिटल बाल आत्म सन्मानासाठी / प्रतिष्ठेसाठी प्रोत्साहन - संकल्पनेपासून कृतीपर्यंत) या आंतरराष्ट्रीय परिषदेला गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांनी संबोधित केले.
ब्रुसेल्सस्थित युरोपियन पार्लमेंटमध्ये गुरुदेव श्री श्री रवि शंकरजी यांनी ‘ध्यानातून मध्यस्तीकडे’ या शीर्षकाअंतर्गत असलेल्या कार्यक्रमात त्यांनी त्यांचा शांतीपूर्ण मध्यस्ती आणि त्याबाबतचा त्यांचा अहिंसेचा पाया असलेला दृष्टीकोन विशद केला.
तंत्रज्ञान, कला, साहित्य किंवा मानवीयता अशा विविध क्षेत्रात विद्यापीठच सर्वाना सर्वसमावेशक दृष्टी प्रदान करत असते. एक अशी दृष्टी ज्यामुळे जीवन काय आहे आणि एखाद्याने जीवन कसे जगावे हे समजते.
गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांना सोमवारी लॉस एंजेलिस, अमेरिका येथील म्युझियम ऑफ टॉलरन्स येथे आयोजित समारोहात प्रतिष्ठित साइमन वेसेन्थल सेंटरचा ‘आंतरराष्ट्रीय नेतृत्व पुरस्कार’ प्रदान करून गौरवान्वित करण्यात आले.
सुन्नी वक्फ बोर्ड, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड चे सन्माननीय सदस्य आणि इतर, गुरुदेव श्री श्री रविशंकरजींना भेटले आणि अयोध्या समस्येवर कोर्टा बाहेर तोडगा काढण्यासाठी त्यांनी आपला पाठिंबा दर्शविला.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात देखील मानवीयतेचं स्थान अबाधित राहावं असे आवाहन करीत सोमवारी म्युनिच येथील जर्मन पेटंट ऑफिसमध्ये आयोजित "वर्ल्ड फोरम फॉर एथिक्स इन इनोव्हेशन" (व्यवसायासातील नीतिमत्तेसाठी जागतिक व्यासपीठ) या परिषदेचं उदघाटन झालं.
तज्ञ समितिने दाखल केलेला अहवाल हा फक्त एकाच सॅटेलाईट इमेजचा (उपग्रहाद्वारे घेतलेले छायाचित्र) चा अहवाल असून हे छायाचित्र दिनांक ५ सप्टेंबर २०१५ च्या पावसाळी हंगामातील आहे आणि या अहवालाच्या आधारावर आयोजित कार्यक्रमाची जमीन ही भुजल जमीन आहे असे दाखवण्यात आलेले आहे. परंतु खरं पाहता न्यायाधिकरणाची दिशाभूल करण्यासाठी वास्तविक तथ्याची जाणूनबुजून छेडछाड केलेली आहे.
हा अहवाल पूर्णपणे सदोष, अवैज्ञानिक आणि पक्षपाती आहे. NGT समोर आम्ही महत्वपूर्ण मुद्दे मांडले आहेत ज्याद्वारे समिती स्पष्टपणे पक्षपाती असल्याचे उघड होते. याबाबतीत आमच्या याचिकेवर अद्यापही सुनावणी झाली नाही. आमचा या समितीवर मुळीच विश्वास नाही. पक्षपाती वर्तणुकीमुळे ती समिती स्वतःच आपली पात्रता गमावून बसली आहे.
गुरुदेव श्री श्री रविशंकरजी २९ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान दक्षिण अमेरिका आणि मध्य अमेरिकेच्या २० दिवसाच्या शांतता अभियान दौ-यावर आहेत. गुरुदेव या अभियानाबाबत बोलताना म्हणाले, “शांतीपूर्ण वातावरणात कोणीही शांत राहू शकतो. शांतीचे महत्व तेंव्हाच असते जेंव्हा कलह असतो”
“मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी घाबरून जाऊ नये. उच्च मूल्याच्या चलनाचे विमूद्रीकरण देशासाठी लाभदायक आहे. यामुळे भ्रष्टाचार, काळा पैसा आणि दहशतवादाला आळा बसेल."
गुरुदेव श्री श्री रविशंकरजी ज्यांचा विश्व शांतीचा संदेश संघर्षाच्या गर्तेत सापडलेल्या देशांकरीता एक वरदान ठरत आहे, ते गेल्यावर्षी भयंकर दहशतवादी हल्ल्यात विध्वंस झालेल्या पॅरिस मध्ये फ्रेंच संसदेच्या सदस्यांना संबोधित करतील.