Sri Sri Ravi Shankar has founded courses that provide techniques and tools to live a deeper, more joyous life. He has established nonprofit organizations that recognize a common human identity above the boundaries of race, nationality and religion. His goal is to uplift people around the globe, to reduce stress, and to develop leaders so that human values can flourish in people and communities.
५० देशातील १५०००० पेक्षा जास्त लोक महाशिवरात्री उत्सवामध्ये सहभागी | Over 150,000 people from 50 Countries join Maha Shivaratri Celebrations

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी
२१ फेब्रुवारी, २०२०
बेंगळूरू, भारत
आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर, बेंगळूरू येथे महाशिवरात्रीच्या प्रसंगी ५० देशातून आलेल्या १५०००० लोकांनी एकत्र येऊन ध्यानाचा अनुभव घेतला, सोबतीला वैदिक मंत्रोच्चार, टाळ-चिपळ्या आणि तबल्याच्या साथीने पारंपारिक संगीताने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते.
रुद्रम-पठण, ध्यान व संगीत यांचा समावेश असलेला हा सोहळा सायंकाळी प्रारंभ झाला व २२ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजता रुद्रम होमाने याची सांगता झाली.
या उत्सवाचे महत्व सांगताना गुरुदेव श्री श्री रवि शंकरजी म्हणाले, “तीन प्रकारच्या शांतीची आवश्यकता असते. एक आहे भौतिक शांती, एक आहे आपल्या दुसरी सभोवतालच्या वातावरणाची, तिसरी शारिरीक, मानसिक शांती आणि आपली आत्मिक शांती. शिवरात्री या तिन्ही स्तरामध्ये शांती आणि समाधान देणारी पारलौकिक दैवी चेतना आहे. ”
गुरुदेव श्री श्री म्हणाले, ”हजारो वर्षांपासून लोक शिव तत्वाची आराधना करीत आहेत, अनुभूती घेत आहेत. शिव म्हणजेच शांती आणि सौंदर्य असलेले अनंत तत्व. शिव हे स्थिरता आणि नृत्य यांचा संयोग आहे.”
पुढे ते म्हणाले, “ध्यान करण्यासाठी आणि आपल्यातील प्रगाढ चेतनेशी संपर्क साधण्याचा विशेष दिवस म्हणजे शिवरात्री. हे भारताशी संबंधित असले तरी याचा परिणाम आणि अनुभव वैश्विक असल्याने यामध्ये सहभागी होऊन याचा अनुभव घेण्यासाठी जगभरातून अनेक लोक इथे येतात.”
Who is Shiva? The wise have always responded to this question with a counter question – Who is not Shiva? Shiva is both the material cause & the Cause of all causes in the existence.#Mahashivratri
— Sri Sri Ravi Shankar (@SriSri) February 21, 2020
भाषांतरित ट्विट –
शिव कोण आहे? ज्ञानी लोक या प्रश्नाचे उत्तर म्हणून प्रतिप्रश्न करतात – शिव कोण नाही? भौतिक जगताचे कारण तसेच या अस्तित्वाच्या कारणाचे कारण असे दोन्ही म्हणजेच शिव.
Glimpses from #MahaShivaratri celebrations last night. pic.twitter.com/NtSczsfPO7
— Sri Sri Ravi Shankar (@SriSri) February 22, 2020
भाषांतरित ट्विट –
काल रात्री # महाशिवरात्री उत्सवाची झलक.
150,000 people celebrated #MahaShivaratri in @BangaloreAshram. 190 other locations in India also held celebrations. pic.twitter.com/FXODJZhB7d
— Sri Sri Ravi Shankar (@SriSri) February 22, 2020
भाषांतरित ट्विट –
बेंगळूरू आश्रमामध्ये १५०००० लोकांनी महाशिवरात्री साजरी केली तर भारतातील १९० ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात आला.
या प्रसंगी “सारेगामा मिनी कारवां” चे उद्घाटन झाले. ज्यामध्ये केवळ आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे निवडक श्री श्री रवि शंकरजींची ४००+ प्रवचने, मंत्रोच्चार, भजने आणि ध्यान अंतर्भूत केलेली आहेत.