Sri Sri Ravi Shankar has founded courses that provide techniques and tools to live a deeper, more joyous life. He has established nonprofit organizations that recognize a common human identity above the boundaries of race, nationality and religion. His goal is to uplift people around the globe, to reduce stress, and to develop leaders so that human values can flourish in people and communities.
श्री श्रींच्या सोबत ध्यानमग्न आयर्लंड | ‘Ireland Meditates’ with Sri Sri

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी
१७ नोव्हेंबर, २०१९
डबलिन, आयरलैंड
डब्लिनमध्ये आयोजित सार्वजनिक कार्यक्रम ‘आयर्लंड मेडिटेटस्‘ मध्ये गुरुदेव श्री श्री रविशंकरजींच्या सोबत जगभरातून लाखभर लोकांनी ऑन लाईन ध्यान केले. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी ध्यानावर व्याख्यान देखील दिले आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला.
“ध्यान घर आहे तर सजगता ते प्राप्त करण्याचा मार्ग आहे. मार्गावरच थांबू नका. सतर्कता हा शब्द सध्या प्रचलित आहे. सतर्क असणे, सजग असणे ही चांगली गोष्ट आहे. परंतु ती ध्यानाची वरवरची स्थिती आहे.”
व्याख्यान देताना गुरुदेव म्हणाले, “ ध्यान म्हणजे मनाचे स्नान होय. जसे दातांच्या सफाईसाठी आपणास ब्रश करायला शिकवले आहे. तद्वत ध्यान प्रक्रियेमुळे आपल्या मनातील नकारात्मक भावना काढून टाकण्यासाठी मदत होते.” ते पुढे म्हणाले, “ध्यानाद्वारे संपूर्ण मानवतेशी संबंध स्थापित होतो. सर्वांच्या सोबत आपणास पूर्ण सहजतेचा अनुभव येतो.”
“ध्यान आणि सजगता एकच आहे काय?” या प्रश्नाचे उत्तर देताना गुरुदेव म्हणाले, “ध्यान घर आहे तर सजगता ते प्राप्त करण्याचा मार्ग आहे. मार्गावरच थांबू नका. सतर्कता आजकालची नवीन फॅशन झाली आहे. सतर्क असणे, सचेतन असणे चांगली बाब आहे. पण ती ध्यानाची वरवरची बाब आहे.”
आतंकवाद्यांना काय सांगाल? या प्रश्नाचे उत्तर देताना गुरुदेव म्हणाले, “मी त्यांच्याकडे पाहून स्मित करतो. त्यांची स्थिती माझ्या ध्यानात येते. त्यांना वाटते कि त्यांना कोणीही समजून घेत नाही. प्रेमामुळे लोकांच्यात बदल होतो. आपण सर्वजण प्रेम या तत्त्वाने बनलेले आहोत. विकृत्त प्रेमच क्रोध आणि घृणा बनते. याला थोडाश्या साफ सफाईची गरज असते. हिंसा ही कोणत्याही समस्येचे समाधान असू शकत नाही. हिंसा निव्वळ विनाश करते. जेंव्हा आपण त्यांच्यामध्ये ही सजगता आणू तेंव्हाच ते यातून बाहेर पडतील.”
This is my first visit to Ireland. People from all over the country joined for 'Ireland Meditates' at a beautiful theatre in Dublin. pic.twitter.com/DmUTiKtRqx
— Sri Sri Ravi Shankar (@SriSri) November 18, 2019
भाषांतरित ट्विट –
माझी आयर्लंडला ही पहिलीच भेट आहे. डब्लिन मधील सुंदर थिएटरमध्ये देशातील लाखभर लोकांनी ‘आयर्लंड मेडीटेट्स’ या कार्यक्रमामध्ये भाग घेतला.