विश्व सांस्कृतिक महोत्सव | The World Culture Festival

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

आर्ट ऑफ लिव्हिंगची ३५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित विश्व सांस्कृतिक महोत्सवात (WCF) जगभरातील अनेकविध संस्कृतींना एकाच व्यासपीठावर एकत्र आणले गेले.

‘विविधतेत एकता’ हा संदेश प्रतिध्वनीत / सर्वदूर प्रसारित करण्यासाठी विविध देशांतील ३७००० हुन अधिक कलाकारांनी सात एकर जागेत उभारलेल्या अतिभव्य मंचावर आपल्या कला सादर केल्या.

 • विविधता, अनेकता आणि स्वीकृतीचा उत्सव साजरे करणारे तीन दिवस
 • वसुधैव कुटुंबकम
 • १५५ देश, ३७ लाखाहून अधिक प्रेक्षकांची उपस्थिती, एक परिवार

WCF Day 1 : /entry/prime-minister-modi-kicks-off-the-world-culture-festival-in-new-delhi/

WCF Day 2 : /entry/world-culture-festival-sets-stage-for-inter-faith-convergence/

WCF Day 3 : /entry/gurudev-sri-sri-ravi-shankar-message-of-faith-co-existence-and-happiness/
[/buttons]

Download World Culture Festival 2016 “Reflections” 

भाषांतरित ट्विट्स –

प्लेट्सवर उभारलेले पाया नसलेले सात एकर जागेवर पसरलेले जगातले सर्वात विशाल व्यासपीठ. स्थापत्य शास्त्रातील चमत्कार? की अदभूत साहस?

आमचे वेबकास्ट पार्टनर ‘लाईव्ह स्ट्रीम’च्या अहवालानुसार विश्व सांस्कृतिक महोत्सवाचा वेबकास्ट १८८ देशांतील ७,३६,४६७ ठिकाणांहून पाहिला गेला.


विश्व सांस्कृतिक महोत्सवात अनेक विचारवंतांनी जगापुढे आपले विचार मांडले, त्याची ही झलक:

विश्व सांस्कृतिक महोत्सवाचे वक्ते – पहिला दिवस

 

 • श्री श्री रवि शंकरजी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक – “आज आम्ही संपूर्ण जगाला एकतेचा महत्वापूर्ण संदेश देत आहोत, ज्याची आज नितांत गरज आहे. आपल्यात कितीही विविधता असली तरीही आपण सारे एकजुटीने राहू शकतो आणि या वेगळेपणासोबत एकमेकांना स्नेह देऊ शकतो. विविधता हा निसर्गाचा गुणधर्म आहे आणि म्हणूनच या विविधतेवर आपण प्रेम करू या.
  ज्ञान, संस्कृती, कला, संगीत आणि समाज सेवेच्या माध्यमांद्वारे द्वारे शांतता आणि एकोप्याचा संदेश आपण सर्वत्र देऊ या.”
 • श्री. नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत – “ही या अभियानाची (आर्ट ऑफ लिविंग) शक्ती आहे ज्याच्या आधारावर आज इतके साऱ्या देशांतील लोक एकत्र येऊन येथे एकजूट दर्शवित आहेत”
 • कमांडर सर्वोत्तम राव, अध्यक्ष, व्यक्ती विकास केंद्र (VVKI), आर्ट ऑफ लिव्हिंगची संलग्न संस्था  – आर्ट ऑफ लिव्हिंगच्या समाजसेवेच्या कार्यात स्वयंसेवकांची प्रमुख भूमिका असते. केवळ भारतातच दरवर्षी १५००० प्रशिक्षकांद्वारे जवळपास सहा लाख स्वयंसेवकांना प्रशिक्षित केले जाते. आणि त्यातले बरेच जण आपापल्या परिसरात सुधारणा करण्यासाठी कार्यरत होतात.”
 • न्या. आर. सी. लाहोटी, भारताचे माजी सरन्यायाधीश – “विश्व सांस्कृतिक महोत्सव हा जगभरातील संस्कृतींचा संगम आहे आणि मानवी इतिहासाच्या या वळणावर त्याची नितांत गरज आहे.”
 • श्री हकुबन, शिमोमुरा, जपानचे माजी शिक्षण, संस्कृती, क्रीडा, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री – “आमचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी मला हा संदेश द्यायला सांगितले: “मला अंतःकरणातुन असे वाटते की आर्ट ऑफ लिव्हिंग आणि परम आदरणीय श्री श्री रवि शंकरजींच्या माध्यमातून आपण जगभरात शांतीचा संदेश पसरवू शकतो.””
 • शेख मोहम्मद बिन हमद अल शरिकी, अल फ़ुजैरा, युनायटेड अरब अमिरातचे राजपुत्र – आर्ट ऑफ लिव्हिंग गेल्या ३५ वर्षांपासून जगभरातल्या व्यक्ती आणि समुदायांच्या उत्थानासाठी योग, प्राणायाम, व्यसनमुक्ती शिबिरे यांच्याद्वारे विविध प्रकल्पांच्या माध्यमातून कार्यरत आहे आणि आरोग्यसंपन्न तसेच अध्यात्मिक जीवन प्रदान करीत सुसंवाद साधत आहे.”
 • मिचेल ए. एस. अधीन, उपाध्यक्ष, सुरीनाम – “मला अशा आहे की WCF द्वारे आपण आपल्या संकुचित प्रवृत्तीच्या व वैयक्तिक चेतनेच्या पलीकडे जाण्यासाठी प्रेरणाश्रोताचे कार्य करेल.”
 • जुआन मॅनुएल सॅनटोस, अध्यक्ष, कोलंबिया – “श्री श्री रवि शंकरजी आणि त्यांची आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था आजच्या संघर्ष आणि हिंसेने ग्रासलेल्या धरतीवर शांतीचा संदेश घेऊन आलेले अग्रदूत आहेत. त्यांची शिकवण आहे की आनंद आणि शांती आपल्यात निहित असते आणि आयुष्य खऱ्या अर्थाने जगण्यासाठी त्याच्याशी केवळ जोडले जाणे आवश्यक आहे.”
 • श्री. कारू जयसूर्या, श्रीलंका संसदेचे अध्यक्ष – “आर्ट ऑफ लिव्हिंगने हजारो लोकांचे आयुष्य आणि त्यांचा मानसिकता या परिवर्तन आणले आहे. गुरुदेवांच्या मानवतेच्या उद्धारासाठी घेतलेल्या दृढ संकल्पाला माझ्या शुभेच्छा.”
 • येवगनी कुयवाशेव्ह, रशियाच्या स्वेरद्लोव्स्क प्रांताचे गव्हर्नर – “मी या विश्व सांस्कृतिक महोत्सवाला लोक, राष्ट्र आणि राष्ट्रीयत्व यामधील वैश्विक संवाद या दृष्टिकोनातून बघतो.”
 • डॉमनिक दे विलेपीन, फ्रान्सचे माजी पंतप्रधान – “आपल्यापैकी अगदी प्रत्येकजण बदल घडवून आणण्यासाठी हातभार लावू शकतो हे सत्य आहे. इतर संस्कृती आणि धर्मांचे स्वागत करणे, आपल्या रोजच्या जीवनातला आराम आणि सुरक्षेचा त्याग करत चांगल्या जगाची उभारणी करणे हे आपले कर्तव्य आहे. युद्धाच्या भावनेवर मात करण्यासाठी शांततेची शस्त्रे शोधणे आपले कार्य आहे.”
 • श्री रेज़्ज़र्ड कजारनेकी, युरोपियन संसदेचे उपाध्यक्ष: – “संस्कृतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा राष्ट्रे आणि लोकांना जोडणार आहे.”
 • डेस मेलब्रेड, सांस्कृतिक मंत्री, लाटव्हिया – “संस्कृती मुळे जग एकत्र येते. भिन्न संस्कृतींमुळेच जगातल्या अनेक आव्हानांना सामोरे जाण्याचा विभिन्न दृष्टिकोनातून बघता येते.”
 • श्री. कमल थापा, नेपाळचे उपपंतप्रधान: – “”विविधतेत एकता दर्शविणारा हा विशाल मेळावा आहे. हा मेळावा म्हणजे गुरुदेव श्री श्री रवि शंकर यांच्या विश्व शांततेस दिलेल्या योगदानास यथोचित अभिवादन आहे.”
 • वैद्य देवेंद्र त्रिगुणा, अध्यक्ष, अखिल भारतीय महासंमेलन: – “या महोत्सवासाठी साऱ्या जगभरातुन येथे लोक जमलेले आहेत, आणि माझा दृढ विश्वास आहे की एकेकाळी विश्वगुरु म्हणून विख्यात असलेला भारत देश आर्ट ऑफ लिव्हिंगची मूल्ये आणि प्रेम व शांतीचा संदेश पसरवित पुन्हा आपले उच्च स्थान प्राप्त करू शकतो.”
 • सारुनास बिरुटीस, सांस्कृतिक मंत्री, लिथुआनिया गणराज्य: – “संस्कृती आणि विविधता मानवजातीच्या गरजा कशा पूर्ण करू शकतात याचे भव्य उदाहरण म्हणजे हा विश्व सांस्कृतिक महोत्सव. वसुधैव कुटुंबकम हे खऱ्या अर्थाने या भव्य मेळाव्याचे वैशिष्ठ (spirit) ठरलेले आहे.
 • शेख नाहयान बिन मुबारक अल नाह्यान, कॅबिनेट मंत्री; संयुक्त अरब अमिरातचे संस्कृती व ज्ञान विकास मंत्री: – “आपल्या देशातील जनता संघर्ष, युद्ध आणि विनाश याऐवजी सहिष्णुता, करुणा आणि संवाद या मूल्यांद्वारे एकमेकांशी व्यवहार करेल हे बघणे राष्ट्रप्रमुख म्हणून आपले कर्तव्य आहे.”

 

विश्व सांस्कृतिक महोत्सवाचे वक्ते – दुसरा दिवस

 

 • स्वतंत्रानंद महाराजजी, ऋषिकेश, भारत: – “या जगातील सारे धार्मिक आणि आध्यात्मिक धर्मग्रंथ तसेच जगातले सर्व अध्यात्मिक गुरू केवळ एकच गोष्ट समजावत आले आहेत, ते म्हणजे प्रेम, करुणा, सेवा, सहिष्णुता आणि साहचर्य. जगभरातल्या सगळ्या अध्यात्मिक नेत्यांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी अध्यात्माची जी ज्योत प्रज्वलित केली आहे, तिचा कोणत्याही गोष्टीचा भडका उडण्यासाठी गैरवापर होता कामा नये याची खात्री करून घ्यावी.”
 • श्री श्री निर्मलानंदनाथ स्वामीजी, आदिचुंचनगिरी महासंस्थान मठाचे प्रमुख, भारत: – “गुरुदेव श्री श्री रवि शंकरजी हे साऱ्या धर्मामध्ये सुसंवाद साधणारे म्हणून जाणले जातात. श्री श्री आपल्या प्राचीन तत्वज्ञानाचा प्रसार करीत आहेत, तसेच ते सत्य आणि सर्व धर्मांचे सार आपल्या देशात एकत्र आणण्यासाठी प्रयत्नरत आहेत. ते आपल्या संस्कृतीचा वारसा जतन करीत आहेत.”
 • मा. जगद्गुरू श्री शिवरात्री देशीकेंद्र महास्वामीजी, जगद्गुरू श्री वीरसिंहासन मठ, भारत: – “श्री श्रींनी विश्व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करून प्रयत्नाने समुदायातील आपसांतले संदेह दूर होतील, आणि आपसांत सलोखा प्रस्थापित होईल. या महोत्सवात विविध संस्कृतींना एकत्र आणण्याची ताकत आहे आणि त्याचा उपयोग संघर्ष निर्माण करण्याचे साधन म्हणून नाही तर शांतता प्रस्थापित करण्यासाठी होणार आहे.”
 • श्री वरुथियन संपथन, विरोधी पक्षनेता, श्रीलंका: – “आम्हाला असे जग निर्माण करायचे आहे ज्यात तेथील सर्व रहिवासी सुखनैव राहू शकतील. शांतीपूर्ण सहअस्तित्व समृद्धीकडे नेणारे असते. जबाबदार नेते आणि धोरणकर्ते म्हणून शांततेचे हे महान उद्दिष्ट पार पाडण्यासाठी आपल्याला कठोर मेहनत घ्यावी लागेल. प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचू शकेल असा हा अद्भुत कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आम्ही कार्यक्रम आयोजकांचे अभिनंदन करतो.”
 • श्री राम जेठमलानी, वरिष्ठ वकील आणि राज्यसभा सदस्य, भारत: – “आपल्याला शक्य तेवढी मानवजातीची पीडा कमी कशी करता येईल हे शिकायला हवे. हेच आपल्या अस्तित्वाचे मूळ ध्येय असायला हवे. आणि हाच आपला सर्वोच्च धर्म आहे ज्याबद्दल मी बोलू शकतो. आपल्याला अशा लोकांची काळजी घ्यायला हवी, जे दुःखाने ग्रासलेले आहेत आणि आपल्यासारखे आनंदात नाहीत.”
 • दलाई लामा : – “अहिंसा आणि आंतर-धार्मिक सद्भावाच्या बाबतीत भारताने बाकी जगासमोर एक आदर्श प्रस्तुत केला आहे आणि माझा विश्वास आहे की विश्व सांस्कृतिक महोत्सवामागे हाच भाव आहे.”
 • ज्ञानी गुरबचन सिंहजी, अकाल तख्त जत्थेदार, भारत : – “आर्ट ऑफ लिव्हिंगने एक महत्त्वाचा टप्पा गाठत मोठी सफलता प्राप्त केली आहे आणि गुरुदेव श्री श्री रवि शंकरजींनी अवघ्या ३५ वर्षाच्या छोट्या कालखंडात उच्च आणि लक्षणीय ध्येय गाठले आहे – ते म्हणजे संपूर्ण मानवतेला एका सूत्रात बांधले आहे.”
 • आदरणीय डॉ. जेराल्ड एल. डुरली, प्रॉव्हिडंस मिशनरी बाप्टिस्ट चर्च चे पादरी, संयुक्त राज्य अमेरिका: – “आज आपण भाऊ आणि बहिणींसारखे एक घट्ट नाते जोडत इथे जमलो आहोत, ज्यामुळे हे जग एक सुंदर स्थान झाले आहे – ज्यात सारे एकत्रितपणे भीती, अज्ञान, तिरस्कार दूर करून तेथे प्रेम, आशा आणि विश्वास रुजविण्यासाठी प्रार्थना आणि कार्य करीत आहेत.”
 • वेन. धम्म मास्टर हसिन ताओ, संस्थापक, विश्व धर्म संग्रहालय, तैवान : – “प्रेम आणि करुणा याला बुद्धीची जोड असणे हाच सर्व धर्मांचा सार आहे. मला वाटते की प्रेम आणि करुणेचा ज्ञानासोबत उपयोग केला तर या जगाचे सारे दुःख दूर सारून आपण सर्व समस्या सोडवू शकतो.”
 • डॉ. अहमद बदरेद्दीन हसन, ग्रँड मुफ्ती आणि अध्यक्ष, सुप्रीम इफ्ता परिषद, सीरियन अरब गणराज्य: – “आमच्या देशात आम्ही शतकानुशतके भारताची सुंदरता आणि भारतीय सभ्यतेची स्वप्ने बघत आणि त्याबाबत बोलत आलो आहोत. म्हणूनचं मी ईश्वराला प्रार्थना करतो की आम्हाला शांतीच्या पंखाखाली ठेव आणि ती शांती आमच्यात दरवळू देत. साऱ्या पवित्र प्रेषितांची मातृभूमी असलेल्या मक्का आणि मदिनेतून, तसेच दमास्कस मधून मी भारत देश आणि भारताच्या लोकांना प्रणाम करतो.”
 • श्री राजनाथ सिंह, गृह मंत्री, भारत : – “भारतीय संस्कृतीची सर्वात महान विशेषता म्हणजे त्यांची व्यापक दृष्टी आणि मानसिकता. इथल्या साधुसंतांनी आणि ऋषीमुनींनी कधीही आपल्या कुटुंबाची कल्पना केवळ भारताच्या लोकांपुरती सीमित ठेवली नव्हती, तर साऱ्या जगतातील लोक आपल्याच कुटुंबाचे सदस्य आहेत असे ते मानत आले आहेत आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजे सारे जग एक परिवार असा संदेश जगाला दिला.”
 • परम पूज्य श्री रमेशभाई ओझा, संस्थापक, देवका विद्यापीठ आणि सांदीपनी विद्यानिकेतन, भारत: – “साऱ्या जगभरातून लोक येथे आपल्या देशाची कला, संस्कृती आणि संगीत परंपरा प्रदर्शित करण्यासाठी जमलेले आहेत. सारे जग जणू एकच परिवार असल्याप्रमाणे येथे एकत्र जमलेले दिसत आहे.”
 • श्रीमती सुषमा स्वराज, मा. परराष्ट्र मंत्री, भारत: – “या महोत्सवात सहभागी होण्यासाठी अगदी संकटग्रस्त आणि हिंसाचाराने ग्रस्त असलेल्या देशांतून सुद्धा लोक येथे आले आहेत. शांती, अहिंसा आणि प्रेमाच्या संदेशाला समर्थन देण्यासाठी जगाच्या अशाही भागातून लोक या मंचावर आले आहेत, जिथे हिंसा आणि कडव्या संघर्षासोबत लढा द्यावा लागत आहे. तुम्ही (गुरुदेव श्री श्री रवि शंकरजी) या अनोख्या महोत्सवात कला आणि संगीताचा अद्भुत मेळ सादर करण्याचे संचालन केले आहे.”
 • एच.ई.बिशप, मार्सेलो सांचेज सोरोंडो, रोम, इटली: – “बौद्ध, हिंदू, मुस्लिम, यहूदी आणि ईसाई धर्माचे अनुयायी निःसंदिग्धपणे ग्वाही देतील की आर्ट ऑफ लिव्हिंग हे लोकांना, त्यांच्या ज्या श्रद्धा आणि परंपरा आहेत त्या अजून दृढ होण्यासाठी मदतच करते. मानवाच्या अंतःकरणात शांतता रुजवीत धर्माधर्मात आणि जगातील राष्ट्रांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे आणि ते वृद्धिंगत करण्याच्या त्यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.”
 • परमपूज्य जगद्गुरु श्री शंकराचार्य वासुदेवानंद: – “आजपर्यंत तरी एकाच ठिकाणी मानवजातीचे एवढे मोठे संमेलन मी कधीच पाहिलेले नाही. या महोत्सवाचे प्रणेते श्री श्री रवि शंकरजी, वैदिक परंपरेचे एक साधक आणि सिद्ध पुरुष आहेत आणि त्यांनी भारतीय संस्कृतीचे सर्वत्र जतन करण्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे.”
 • श्री मनीष सिसोदिया, उप मुख्यमंत्री, नवी दिल्ली, भारत: – “माझा दृढ विश्वास आहे की भारताच्या विविध भागांतून आणि जगातल्या अनेक देशांतून संत आणि पवित्र अध्यात्मिक प्रभूतींची दिव्य परिषद येथे आयोजित केलीत, त्याने आम्हाला आशिर्वचन लाभले आहे. साऱ्या जगाचे आज भारताकडे लक्ष वेधले गेले आहे, आणि भारतीय संस्कृतीच्या सार्वभौमाची ही झलक, ‘वसुधैव कुटुंबकम’ चे मूळ तत्व, आज विश्व सांस्कृतिक महोत्सवाच्या सुंदर वास्तवीक रूपाने आमच्या समोर साकार झाले आहे.”
 • स्वामी रामभद्राचार्य, संस्थापक आणि प्रमुख, तुलसी पीठ, मथुरा, भारत : – “मी तुम्हा सर्वांना आग्रह करतो की आपल्याला मिळालेली जी सांस्कृतिक संपदा आणि वारसा आहे त्याचे संरक्षण, जतन करत त्याचा सार्थ अभिमान बाळगा तसेच सर्वत्र सर्व प्राणीमात्रांत एकच दिव्यता विद्यमान आहे याची अनुभूती घेण्यासाठी प्रयत्न करा.”

 

विश्व सांस्कृतिक महोत्सवात प्रमुख वक्ते – तिसरा दिवस

 

 • निखिल सेन, अध्यक्ष, एस.एस.आर.व्ही.एम. ट्रस्ट, भारत : – “गुरुदेव श्री श्री रवि शंकरजींचे प्रेम आणि करुणा पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. गुरुदेवांशिवाय इतर कुणालाही इतके भव्य सांस्कृतिक आयोजन करणे शक्य झाले नसते.”
 • मि. जेफ़ हॉक : – “या विश्व सांस्कृतिक महोत्सवात गुरुदेवांच्या ‘वसुधैव कुटुंबकम’ (विश्व एक परिवार) ध्येयाची केवळ सुरवात आहे आणि हीच वेळ आहे आपली प्रतिबध्दता आणि प्रेरणेला नवचैतन्य देण्याची आणि येथून निघून पूर्ण जगभरात एकाच वेळी एक एक व्यक्ती, परिवार आणि समुदायात परिवर्तन आणण्यासाठी वाटचाल सुरू करण्याची.”
 • केनियाच्या बंगोमा क्षेत्राचे उप-राज्यपाल श्री हिलेरी चोंगवोनी : – “आपल्याला एका परिवारा प्रमाणे एकत्र यायचे आहे आणि हीच सदभावना जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायची आहे. जगाच्या विविध भागांतून आणि वेगवेगळ्या खंडांतून येऊन इथे लोक एकत्र जमले आहेत, हे किती सुखावह आहे. या पृथ्वीतलावर आपण एकाच कुटुंबाप्रमाणे एक होऊ शकतो याचे हे प्रमाण आहे.”
 • श्री वेंकैया नायडू, केंद्रीय नागरी विकास मंत्री, भारत सरकार: – “ज्या निष्ठेने इतके सारे कलाकार आणि संगीतकार आपल्या पारंपरिक वेशभूषेत आपल्या कलेचा आणि सांस्कृतिक वारसा सादर करण्यासाठी ज्या शालीनतेने इथे एकत्रित झालेत, ते नक्कीच कौतुकास्पद आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी इतके विशाल कार्य शांतपणे आणि मेहनतीने केले, ते बघून तर मी आश्चर्य चकित झालो आहे.”
 • श्री केजेल मॅग्ने बोंडेविक, माजी पंतप्रधान, नॉर्वे : – “आपण सारे न्यायावर विश्वास ठेवतो. आपण सारे शांतीवर विश्वास ठेवतो. तर, आपण संवाद साधू या, आपण एकमेकांचे ऐकू या, समजून घेऊ या, एकमेकांचा आदर करू या, आणि जगभर सर्वसमावेशक बहुसांस्कृतिक समाजाची उभारणी करू या, ज्याप्रमाणे तुम्ही इथे करीत आहात.”
 • श्री मैथ्यू ऑफ़ॉर्ड, संसद सदस्य, कंजर्वेटिव्ह पार्टी, युनायटेड किंगडम : – “युनायटेड किंगडमचे पंतप्रधान श्री. डेव्हिड कॅमेरुन यांनी मला त्यांचा छोटासा संदेश द्यायला सांगितले आहे. ते म्हणतात, “मला श्री श्री रवि शंकरजींना युनायटेड किंगडमच्या भेटीचे आमंत्रण द्यायचे आहे. त्यांनी कृपया आमच्या संसद भवनात आणि हाऊस ऑफ कॉमन्सला भेट द्यावी. त्यांचे भव्य स्वागत केले जाईल याची मी हमी देतो.”
 • श्री हरनोन पेनागोस, संसद सदस्य, कोलंबिया : – “गुरुदेवांची शिकवण कोलंबियन लोकांच्या आशा पल्लवित करणारी ठरली आहे. कोलंबियावर जे लोक युद्ध लादत होते त्यांची मनोवृत्ती बदलण्यात आपले भरीव योगदान आहे. गुरुदेव, म्हणूनच मी तुम्हाला कोलंबियन संसद आणि व्यक्तिशः माझ्या वतीने तुमच्या प्रति परम आदर, कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करतो.”
 • श्री जो लेइनन, सदस्य, यूरोपीय संसद : – “हा महोत्सव म्हणजे संपूर्ण जगात सर्वात प्रभावी आणि अनोखे संमेलन आहे. मी तुम्हा सर्वांना गुरुदेव श्री श्री रवि शंकरजींनी दिलेली शिकवण जगण्याचा आग्रह करतो. जगाला भारताकडून प्रेरणा घेणे गरजेचे आहे. मला वाटते की योग, ध्यान आणि आयुर्वेद हा असा जागतिक वारसा आहे ज्याचे पालन सर्वत्र केले गेले पाहिजे.”
 • श्री निर्ज देवा, संसद सदस्य, युरोप : – “आपल्याला अजून काम करावे लागेल. अजून १०० करोड लोक भयानक दारिद्र्यात पिचत आहेत, त्यांना त्यातून बाहेर काढायचे आहे. आपल्याला आपले पाण्याचे स्रोत आणि पर्यावरण वाचवायचे आहे. मी आपण सर्वांना हे साध्य करण्यासाठी प्रतिज्ञा घेण्यास उद्युक्त करतो.”
 • श्री रविशंकर प्रसाद, केंद्रीय संचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री, भारत सरकार : – “विश्व सांस्कृतिक महोत्सवाच्या महाकुंभाद्वारे अध्यात्मिक तत्वे, अनुभव आणि या निखालस वातावरणाच्या माध्यमातून नवचैतन्य आणण्यास आपण मदत केली आहे आणि त्यामुळे शांती, करुणा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा ही प्रार्थना आहे.”
 • श्री. अरुण जेटली, अर्थ आणि कॉर्पोरेट मंत्री, भारत सरकार : – “मी आश्चर्यचकित झालोय की अवघ्या ३५ वर्षाच्या छोट्याशा कालखंडात जगाच्या अनेक देशातील लोक कसे आर्ट ऑफ लिव्हिंगकडे ओढले गेलेत. गुरुदेवांचे हे स्तुत्य आणि अतुलनीय कार्य खरोखरच अदभुत आहेत. या भव्य महोत्सवाचे यजमानपद निभावण्यास भारताला आपण पात्र समजलात ही खरेच अभिमानाची गोष्ट आहे. आणि हा शांती व सौहार्दाचा संदेश दिल्लीतून सर्व जगभरात पोहोचेल.”
 • Mr. Amit Shah, President, Bharatiya Janata Party, India
  “सारं जग व्यापार आणि वाणिज्याच्या माध्यमातून एकत्र येण्याचा प्रयत्न करत असते. पण गुरुदेव, तुम्ही तर संस्कृतीच्या माध्यमातून सारं जग एकत्र आणण्यासाठी अतिशय यशस्वी उपक्रम घेतला आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचा हा कौतुकास्पद उपक्रम जगाच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल आणि जगाच्या इतिहासात आपले अनन्य स्थान राखेल.”
 • श्री अर्मिन लासेट, उपाध्यक्ष, सत्ताधारी ख्रिश्चन डेमोक्रेटिक पार्टी,जर्मनी : – “श्री श्रींच्या चेतनेने, या समजून घेण्याच्या भावनेने आणि महोत्सवाच्या चैतन्याने येत्या काही दिवसात, महिन्यात आणि वर्षात जग बदलून जाईल अशी मला आशा वाटते. शांतीच्या या प्रकल्पासाठी आपण सारे मिळून काम करू या.”
 • श्री ओलुसेगुन ओबासंजो, माजी राष्ट्रपति, नायजेरिया : – “विविध मतेमतांतरे असलेल्या या जगात, विश्व सांस्कृतिक महोत्सवाद्वारे आपल्यासाठी प्रस्तुत केलेल्या संस्कृतीला आपण मनातून दाद देऊ या. आपण नाचू या, गाऊ या, इतरांना आनंद देऊ या, आपणही मौज करू या आणि एकमेकांशी हात मिळवत एकत्र पुढे जाऊ या, कारण या जगात आपल्या अस्तित्वाचा हाच उद्देश आहे.”
 • श्री. पियुष गोयल, कोळसा मंत्रालय , भारत सरकार : – “येथे एकत्र जमलेल्या सर्वांनी, शांतता आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ चा – सर्व मानवजातीला आपल्या बहीण भावाप्रमाणे वागणूक देण्याचा संदेश – सर्व जगभरात पोहोचवायला हवा. ही शिकवण आज धर्म, राष्ट्रे आणि इतर साऱ्या बंधनांच्या पलीकडे नेणारी आणि मानवतेला जोडणारी आहे.”
 • श्री ज्योफ्री वान ऑर्डन, सदस्य, कंजरव्हेटिव पार्टी, यूनायटेड किंगडम : – “या अदभुत महोत्सवात भाग घेणाऱ्या कलाकारांचे, कार्यक्रमाच्या सर्व आयोजकांचे आणि कार्यकर्त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. आपण सारेच एकमेकांपासून काही ना काही शिकू शकतो. कर्तव्य, श्रद्धा आणि सहिष्णुता ही आपली मार्गदर्शक तत्वे असायला हवीत. शांततामय, स्वतंत्र राष्ट्रांचा जागतिक समुदाय आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ हे आपले ध्येय असले पाहिजे.”
 • श्री. सुरेश प्रभु, केंद्रीय रेल्वे मंत्री, भारत सरकार : – “विश्व सांस्कृतिक महोत्सव हा एक अनोखा महोत्सव आहे, ज्यात १५५ हून अधिक देश भाग घेत आहेत. हे म्हणजे जणू छोटे संयुक्त राष्ट्रसंघ आहे. संयुक्त राष्ट्रसंघात एक सुरक्षा परिषद असते, जी पूर्ण जगाच्या सुरक्षा व्यवस्थेची काळजी घेत असते. मला वाटते की हा महोत्सव विभिन्न संस्कृती आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील लोकांना एकत्र करून जगात सुरक्षा आणण्याचा उत्तम मार्ग आहे.”
 • श्रीमती सुमित्रा महाजन, अध्यक्ष, लोकसभा, भारत : – “मी खात्रीने सांगू शकते की प्रेमाचा हा संदेश साऱ्या जगभर पसरणार आहे. वसुधैव कुटुंबकम आणि कृन्वंतो विश्वम् आर्यम् – म्हणजे ‘आपण आदर्श, सुसंस्कृत आणि शांततामय समाजाची उभारणी करू या’ चा हा संदेश नक्कीच साऱ्या जगभरात पोहोचणार आहे.”
 • श्री. अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, नवी दिल्ली, भारत : – “हिंसेचे प्रत्युत्तर हिंसेनेच देणे हा तोडगा होऊ शकत नाही. हिंसा आणि घृणेवर, प्रेम आणि शांतीनेच मात करता येईल. आणि हाच संदेश गुरुदेव आज आपल्याला अध्यात्मिकता आणि त्यांच्या प्रेम आणि करुणेद्वारे देत आहेत.”
 • गुरुदेव श्री श्री रवि शंकरजी, अध्यात्मिक नेते आणि आर्ट ऑफ़ लिविंगचे संस्थापक, भारत : – “जेव्हा आपण मजबूत आणि आतून स्थिर असतो, तेव्हाच आपण पूर्ण जगाला सुरक्षितता आणि संरक्षण देऊ शकतो. जेव्हा आपण आतूनच अस्थिर असतो, तेव्हा हे करणे शक्य नसते. प्रत्येकाचे हृदय आणि मन एकत्र जोडणे हेच आपले कार्य आहे आणि ते आपण हसतमुखाने करत राहू या.”
 • श्री खिल राज रेगमी, माजी पंतप्रधान, नेपाळ : – “या विश्व सांस्कृतिक महोत्सवात जगभरातल्या लोकांचा सहभाग आणि उपस्थिती बघून मला वाटते की या महोत्सवामुळे ‘वसुधैव कुटुंबकम’ ला संजीवनी देण्याचा आर्ट ऑफ लिव्हिंगचा उद्देश साध्य झाला आहे.”
 • श्री आर.व्ही. देशपांडे, उच्च शिक्षण आणि पर्यटन मंत्री, कर्नाटक सरकार, भारत : – “या जगातले संघर्ष आणि युद्ध, त्यामुळे येणारे ताणतणाव आणि चिंतेच्या वातावरणातही आर्ट ऑफ लिव्हिंगने स्थापना झाल्यानंतर गेल्या ३५ वर्षांत स्पृहणीय कार्य केलेले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचा वैश्विक शांती आणि मानवतेच्या मूळ मूल्यांचा कायापालट करण्याचा संदेश कौतुकास्पद आहे.”
 • मायकल पर्लिस, अध्यक्ष आणि सी.ई.ओ., फोर्ब्स मीडिया एल.एल.सी., युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका : – “आम्हाला जाणवतेय की चांगली संगत बनण्यासाठी उत्तम मानवी मूल्ये आणि उच्च कोटीचे मानवी उद्देश गरजेचे आहेत.”
 • श्री कमल थापा, उपपंतप्रधान, नेपाळ : – “स्थिर अर्थव्यवस्था नसली तर दारिद्र्य, फसवणूक आणि लोकांच्या श्रद्धा आणि संस्कृतीवर अतिक्रमण हे वाढू लागते, ज्यामुळे सरतेशेवटी संघर्ष अटळ असतो. शांती ही लोकशाही, अर्थव्यवस्था आणि संस्कृतीवर अवलंबून असते. आपण समाजात सर्व समुदायांचा समावेश असल्याची खात्री करून घेणे अत्यावश्यक असते.”
 • श्री. ओलुसेगम ओबासांजो, नायजेरियाचे माजी अध्यक्ष : – “नेत्यांनी आज जागतिक पातळीवर विचार केला पाहिजे, स्थानिक पातळीवर, सहकार्याने व सर्वसमावेशकपणे वागायला हवे. कोणताही देश एकटाच प्रगती शकत नाही. म्हणून नेते सक्रिय असले पाहिजेत, त्यांनी एकत्र काम केले पाहिजे. या मुद्द्यांना सामोरे जाण्यासाठी वातावरण तयार करण्याची गरज आहे, जे भविष्यात शांतता राहील की नाही हे ठरवतील. ”
 • श्री किशोर बियानी, अध्‍यक्ष एवं ग्रुप सी.ई.ओ., फ्यूचर ग्रुप, भारत : “ग्राहकांशी संबंधित व्यापारजगत काही सिद्धांतावर आधारलेले आहे, आणि ते वाढत राहण्यासाठी निरंतर अभ्यास ठेवणे गरजेचे आहे. भविष्याकडे पाहता निरंतर व्यापारकार्यासोबतच तंत्रज्ञानातील अत्याधुनिक नाविन्यपूर्ण कल्पना राबवल्या गेल्या पाहिजेत.”
 • श्री निरज देव, संसद सदस्य, यूरोप : – “हे जग अतिशय वेगाने बदलत आहे आणि त्या बदलाचा एक भाग होणे आपल्याला गरजेचे आहे. सामाजिकरण हा भविष्यातला मार्ग / कल राहणार आहे. आपल्याला उदयमशीलतेला मारक कायदे कडून टाकले पाहिजे आणि कल्पकतेला प्रोत्साहन दिले पाहिजे.”
 • श्री. जी एल पेरिस, माजी परराष्ट्रमंत्री, श्रीलंका : – “श्रीलंका हा असा देश आहे ज्यात प्रत्येकाचा समावेश असेल अशा समाजाची उभारणी केली जाते. आमचा उत्कर्ष एकत्र विकसित होण्यात, विश्वास निर्माण करण्यात आणि आमच्या नागरिकांना आधार देण्यावर अवलंबून आहे. मला विश्वास आहे की या मार्गाने श्रीलंकेची प्रगती होत राहील.”
 • श्रीमती अरुंधति भट्टाचार्य, अध्यक्ष, भारतीय स्टेट बँक : – “नीतिमत्ता आणि नफा हे एकमेकांशी संबंधित आहेत. ज्या कंपन्या नीतिमत्तेनुसार चालतात, त्या दीर्घकाळ फायद्यात असतात. आम्ही खरोखरच अगदी निम्नस्तरातील व्यक्तीपासून ते वरच्या स्तरातील व्यक्तीपर्यंत प्रत्येकाच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्नशील असतो. एक देश आणि एक संघटन म्हणून विश्वास दर्शवत आणि नैतिक मूल्यांचे पालन करत आम्ही सातत्याने प्रगतिपथावरच राहू.”