सुदर्शन क्रिया® | Sudarshan Kriya®

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

सुदर्शन क्रिया

श्वास घेणे हे जीवनातील पहिले कार्य आहे. श्वासामध्ये आपण न शोधलेले जीवनाचे रहस्य सामावले आहे. सुदर्शन क्रिया ही अत्यंत सुलभ आणि अत्यंत प्रभावी अशी श्वसन प्रक्रिया आहे. यामध्ये श्वासाच्या विशिष्ट नैसर्गिक लयींचा समावेश आहे, ज्यामुळे शरीर, मन आणि भावनांमध्ये सुसंवाद साधला जातो.

या प्रक्रियेमुळे मानसिक ताण तणाव, थकवा आणि क्रोध, नैराश्य आणि औदासिन्य सारख्या नकारात्मक भावना नाहीश्या होऊन मन शांत आणि केंद्रित तसेच शरीर ऊर्जावान आणि स्वस्थ बनते.

उत्तम आरोग्याचा, दररोज श्वास घ्या !

श्वास हा सूक्ष्म प्राणशक्तीचा, जीवन ऊर्जेचा मुख्य स्त्रोत आहे. प्राणशक्ती ही शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा तसेच निरामय जीवनाचा पाया आहे. जेंव्हा प्राणशक्तीचा स्तर उच्च असतो तेंव्हा आपल्याला निरोगी, सजग आणि ऊर्जावान वाटत असते. सुदर्शन क्रियेमुळे दररोज आपल्या शरीरातील ९०% पेक्षा जास्त विषारी द्रव्ये बाहेर पडून ताण तणाव कमी होतो आणि आपल्या प्राणशक्तीचा स्थर उंचावतो.

रात्रीमागून दिवस येतो, ऋतू बदलत राहतात, झाडांची जुनी पाने गळून नवी पालवी फुटते – हे निसर्ग चक्र आहे.

निसर्गाप्रमाणेच आपल्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि भावनिक अशी जैविक लय असते. जेंव्हा ताण तणावामुळे, आजारामुळे ही नैसर्गिक लय बिघडते तेंव्हा आपण अस्वस्थ, असमाधानी, निराश आणि दुःखी होतो.

सुदर्शन क्रियेमुळे® आपल्या शारीरीक, मानसिक आणि भावनिक लयीमध्ये नैसर्गिकरीत्या समतोल आणि सुसंवाद साधला जातो. या समतोलामुळे आपण निरोगी आणि आनंदी होतो आणि आपल्या कार्यामध्ये आणि नातेसंबंधांमध्ये सुसंवाद प्राप्त होतो. संशोधनांती हे सिध्द झाले आहे कि सुदर्शन क्रियेच्या निव्वळ पहिल्या सरावापासूनच प्रोलॅक्टीन हे आपणास निरोगी राखणारे संप्रेरक स्त्रवू लागते आणि त्यात लक्षणीय वाढ होते.

सुदर्शन क्रियेमुळे शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक स्वास्थ्य प्राप्त होते आणि ही सुदर्शन क्रिया आर्ट ऑफ लिविंगच्या शिबिरांचा मुख्य गाभा आहे. सुदर्शन क्रियेचा नियमित सराव करणाऱ्यांनी आपला अनुभव नोंदवताना सांगितले आहे की त्यांना उत्तम प्रतिकार शक्ती, वाढीव सामर्थ्य प्राप्त होत आहे आणि त्यांच्या प्राणशक्तीचा उच्च स्तरही टिकून राहत आहे. जगातील करोडो लोकांना सुदर्शन क्रियेचा फायदा झाला आहे आणि त्यांचे जीवन उत्सव बनले आहे !

अधिक वाचा : सुदर्शन क्रियेचे आरोग्यदाई लाभ

संशोधन संग्रह श्वास विज्ञान

आर्ट ऑफ लिविंगच्या हॅप्पीनेस शिबिरामध्ये सुदर्शन क्रिया शिका.