जीवन चरित्र | Biography

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

गरुदेव श्री श्री रवि शंकरजी हे नांव आत्ता अध्यात्मिक आणि मानवतावादी नेते म्हणून जगभर अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांनी तणावमुक्त आणि हिंसामुक्त समाजाच्या निर्मितीसाठी जगभर अभूतपूर्व चळवळ सुरु केली आहे. आर्ट ऑफ लिविंग, इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन वॅल्यूज (IAHV) सारख्या विविध संस्थांची निर्मिती करून त्याद्वारे असंख्य प्रोग्रॅम आणि प्रशिक्षणांच्या माध्यमातून १५६ देशातील ४५ करोड पेक्षा जास्त व्यक्तींपर्यंत गरुदेव पोहोचले आहेत. व्यक्तींने जागतिक, राष्ट्रीय, धार्मिक आणि वैयक्तिक स्तरावर येणाऱ्या आव्हानांना हाताळण्यासाठी सज्ज राहण्यासाठी, सक्षम आणि परिवर्तनशील बनण्यासाठी गरुदेव श्री श्रीं नी अद्वितीय आणि प्रभावी प्रोग्रॅम बनवले आहेत.

प्रारंभ | The Beginning

१९५६ साली दक्षिण भारतात जन्मलेले गरुदेव अत्यंत प्रतिभासंपन्न आणि नैसर्गिक ईश्वरी देणगी प्राप्त असे बालक होते. अगदी चौथ्या वर्षीच त्यांना प्राचीन संस्कृत साहित्य असलेली भगवत् गीता मुखोद्गत होती. त्या वयात ते सतत ध्यानात असत. वैदिक साहित्य आणि भौतिकशास्त्र दोन्हीमध्ये ते पदवीधर आहेत.

१९८२ साली भारतातील कर्नाटक राज्यामधील शिमोगा मध्ये गरुदेव दहा दिवस मौनामध्ये गेले असता त्यांना प्रभावी श्वसन प्रक्रिया ‘सुदर्शन क्रिया’ प्राप्त झाली. कालांतराने हिच सुदर्शन क्रिया आर्ट ऑफ लिविंग शिबिरांचा गाभा बनली.

पहिल्या संस्थांची स्थापना | Founding the First Organizations

गरुदेव श्री श्रीं नी आर्ट ऑफ लिव्हिंग नामक आंतरराष्ट्रीय, विना लाभकारी, शैक्षणिक आणि मानवतावादी संस्थेची स्थापना केली. त्यामधील शैक्षणिक आणि आत्म विकासाच्या प्रोग्रॅममुळे व्यक्तींना ताण तणाव काढून टाकून निरोगी जीवनाच्या सौख्याच्या अनुभवासाठी प्रभावी साधन प्राप्त होते. याचा लाभ समाजातील काही घटकांनाच झाला नाहीतर याची परिणामकारकता जगभर आणि समाजातील सर्व घटकांमध्ये सिद्ध झाली आहे.

शाश्वत विकास प्रकल्पे, मानवी मुल्यांची जोपासना आणि संघर्ष निवारणामध्ये समन्वय साधणे या उद्देशाने १९९७ मध्ये त्यांनी आर्ट ऑफ लिविंगशी संलग्न अशी इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन वॅल्यूज (IAHV) या संस्थेची स्थापना केली. भारत, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत या संस्थांचे स्वयंसेवक ग्रामीण भागातील शाश्वत विकासाचे नेतृत्व करीत आहेत. त्यांचे हे सेवाकार्य ४०,२१२ गांवापर्यंत पोहोचले आहे.

शांतीदूत | A Figure of Peace

श्री श्रीं नी जागतिक स्तरावर शांतता चर्चेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

भारतातील काश्मीर, आसाम आणि बिहार पासून ते कोलंबिया, कोसोव्हो, इराक आणि सीरिया ते कोटे दि आल्वोर पर्यंत श्री श्रींच्या विविध तणाव मुक्तीच्या प्रोग्रॅमचा जनमानसावर लक्षणीय परिणाम होऊन ते सशस्त्र संघर्षाकडून शांतीच्या मार्गाकडे परतत आहेत. जेंव्हा जगवाढणारी हिंसा आणि संघर्षाने वेढलेले असतांना श्री श्रीं लोकांना दुसरा मार्ग दाखवतात ज्यामुळे लोंकाना आंतरिक शांती प्राप्त होते आणि त्या व्यक्तीमध्ये आपुलकी, शांती आणि एकोप्याची भावना वाढीस लागते. जसे, २००३ पासून हजारो इराकींना आघात निवारण शिबिरामुळे लाभ मिळाला आहे.

राष्ट्रीय-सामुदायिक पातळीवर, गरुदेव श्री श्रीं च्या कार्यक्रमांनी मुख्य सामाजिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.

जसे, अमेरिकेमध्ये युवक नेतृत्व शिबिरे तेथील शहरे आणि शाळांमधील सामुहिक हिंसा, अमली पदार्थ आणि व्यसन या सामाजिक समस्या हाताळण्यास मदत करत आहेत. सुप्रसिद्ध असा प्रोजेक्ट वेलकम होम ट्रूप्स मुळे मायदेशी परतलेल्या सैनिकांचे जीवन आघात निवारण प्रोग्रॅममुळे अमुलाग्र बदलून गेले आणि या बाबतचे माहितीपट तयार आहेत.

भारतात, श्री श्री २००१-०२ मध्ये आणि २०१७ पासून पुन्हा अयोध्या संघर्षाचा शांततेने तोडगा काढण्यात गुंतले होते. त्यांच्या या प्रयत्नांना मान्यता म्हणून सुप्रीम कोर्टाने तो संघर्ष सोडविण्यासाठी त्यांना तीन मध्यस्थांपैकी एक म्हणून नेमले. 500 वर्षाचा जुना मुद्दा अखेर 2019 मध्ये संपुष्टात आला.

लॅटिन अमेरिकन देशात चालू असलेल्या सामाजिक आणि राजकीय पेचप्रसंगाचा शांततेत अंत करण्यासाठी व्हेनेझुएलामधील सत्ताधारी आणि विरोधी नेते यांच्यात एक समान आधार/मुद्दा शोधण्याचे ते काम करत आहेत.

सामाजिक जीवनातील नीतीमूल्यांच्या पुनर्रुजीवनासाठी श्री श्रींनी इंडिया अगेन्स्ट करप्शन आणि वर्ल्ड फोरम फॉर एथिक्स इन बिसनेस सारख्या मोहिमा पुढाकाराने सुरु केल्या आणि त्यांचे समर्थन केले.

गरुदेव श्री श्रीं नी सुरु केलेल्या ७०२ शाळा भारतामधील दुर्गम आणि आदिवासी भागामध्ये ७०,००० विद्यार्थ्यांना मोफत आणि अद्यावत शिक्षणाची सोय करून त्यांना जबाबदार नागरिक बनवत आहेत.

गरुदेव श्री श्रीं च्या नेतृत्वा खाली पर्यावरणाची निगा हा आपल्या संस्थेद्वारे सुरु केलेला सर्वात मोठा प्रकल्प आहे. याअंतर्गत ४७ नद्या आणि हजारो जलाशयांचे पुनर्रुजीवन सुरु आहे. आर्ट ऑफ लिविंगच्या स्वयंसेवकांनी ३६ देशामध्ये आणि २७ भारतीय राज्यांमध्ये ८.१ कोटी वृक्ष लावले आहेत.

आर्ट ऑफ लिव्हिंग तुरुंगातील प्रोग्रॅम (प्रीजन प्रोग्रॅम) कैद्यांना पुनर्वसनासाठी मदत करतो. जागतिक स्तरावर ८,००,००० कैद्यांना याची मदत झाली आहे. उरुग्वे मधील इंटीरिअर मंत्रालयाने ज्या कैद्यांनी आर्ट ऑफ लिविंग प्रीजन प्रोग्रॅम केला आहे त्यांची शिक्षा कमी केली आहे.

श्री श्रीं ची जागतिक स्तरावरील भव्य अशी स्वयंसेवकांची टीम मानवी आघात आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्त लोकांना जगभर सर्वतोपरी मदत करण्यात अग्रेसर असते. यामध्ये मेक्सिको, हैती, अमेरिका, जर्मनी, नेपाळ, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, जपान अशी कित्येक नांवे आहेत.

वैयक्तिक स्तरावर श्री श्रीं च्या आत्म विकास कार्यक्रमांमुळे जगभरातील कोट्यावधी लोकांना तणाव मुक्त आणि शांत, स्वस्थ आणि निरामय जीवन प्राप्त होण्यासाठी मदत झाली आहे. या कार्यक्रमांमध्ये आजच्या आधुनिक जीवनशैलीसाठी उपयुक्त अश्या प्राचीन योग प्रक्रिया आणि श्री श्रींनी मानवजातीला दिलेली सुदर्शन क्रिया ही संजीवक अशी प्रभावी श्वसन प्रक्रिया आहे जिच्यामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य प्राप्त होते. नामांकित वैद्यकीय संस्थांनी केलेल्या स्वतंत्र संशोधन अवहालामध्ये या प्रक्रियांमुळे तणावाचे उन्मूलन तसेच कॉर्टीसॉल (तणाव निर्माण करणारे संप्रेरक) ची पातळी कमी होऊन प्रतिकार शक्ती मजबूत होते, असे नमूद केले आहे.

जेथे संपूर्ण जग हे धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय आणि सांस्कृतिक पातळीवर विभागलेले असताना, श्री श्रींचा संदेश ‘वसुधैव कुटुंबकम्’ – हे संपूर्ण विश्व एक परिवार हा आहे आणि ते म्हणतात विविध धर्म, संस्कृती आणि परम्परा यांचे मूळ प्रेम, करूणा, शांती आणि अहिंसा या मानवी मूल्यांमध्ये आहे. न भूतो न भविष्यति असा ‘विश्व सांस्कृतिक महोत्सव २०१६’ हे याचेच प्रतिबिंब होय. सर्व धर्म आणि संस्कृतींच्या विविधतेचा उत्सव साजरा करत या महोत्सवात १५५ देशातील साडे सदतीस लाख लोक एकत्र आले आणि जगभरातून आलेल्या ३६,६०२ नर्तक आणि संगीतकारानीं ७ एकरच्या स्टेजवर नेत्रदीपक सादरीकरण केले.

श्री श्रीं ना कोलंबिया, मंगोलिया आणि पॅराग्वे या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांसह जगभरातील खुपसे पुरस्कार मिळाले आहेत. विशेष आणि प्रतिष्ठित सेवेबध्दल भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्म विभूषण’ सन्मानाने सन्मानित केले आहे. हा पुरस्कार असाधारण और विशिष्ट सेवेसाठी दिला जातो. जगभरात त्यांना २१ विविध ऑनररी डॉक्टरेट नी सन्मानित केले आहे. ‘द्वेष आणि दुःख यावर प्रेम आणि ज्ञान यांनी विजय मिळवता येऊ शकतो’ हा साधा पण शक्तिशाली संदेश घेऊन श्री श्री दरवर्षी जवळपास ४० देशांमध्ये प्रवास करत असतात.

काही आंकडेवारी | Impact in numbers:

भारतामध्ये | Across India

 • भ्रष्टाचार निर्मुलन चळवळ गतिमान करण्यासाठी आणि परस्पर विश्वास वाढीमध्ये महत्वाची भूमिका.
 • भारतातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील ७०२ शाळांमधून ७०,००० विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण.
 • ४७ नद्या आणि हजारो जलाशयांचे पुनर्रुजीवन सुरु आहे ज्यामुळे भू जलाचा स्तर वाढला असून, त्याचा लाभ लाखो गांवकऱ्याना होत आहे.
 • ४३,९८० स्वच्छता अभियान, ९०,५०० वैयक्तिक स्वच्छता शिबिरे, २७,४२७ वैद्यकीय तपासणी मोहिमा, १,६५,००० तणाव मुक्तींची शिबिरे घेतली गेली ज्याचा लाभ ५.६ कोटी व्यक्तींना होत आहे.
 • ६२,००० शौचालये बांधली, ३,८१९ घरे बांधली, १,२०० कूप नलिका आणि १,००० बायो गॅस प्रकल्प बांधले.
 • ३,०४,४५३ युवकांना व्यावसायिक आणि स्वयंरोजगार निर्मितीक्षम प्रशिक्षण दिले आहे.
 • भारतातील तसेच नेपाळमधील ७२० गावें सौर ऊर्जा आधारित दिव्याद्वारे प्रकाशमान केली आहेत. ज्यामुळे १,६५,००० पेक्षा जास्त लोकांना लाभ झाला आहे.
 • युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिरामधून २,४९,४०८ पेक्षा जास्त युवकांना प्रशिक्षित केले आहे. जे ७०,००० खेड्यातील विविध विकास प्रकल्पांमध्ये सहभागी झाले आहेत.
 • भारताच्या उग्रवादी प्रभावित विविध प्रांतातील ७,४०० जहाल सशस्त्र बंडखोरांना शस्त्रे खाली ठेवायला भाग पडून, हिंसा रोखून त्यांना मुख्य प्रवाहात सामील केले आहे.
 • २२ राज्यामधील २२ लाख शेतकरी आणि युवकांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण दिले आहे.

(अधिक माहिती साठी येथे क्लिक करा)

मध्य पूर्व देशांत | Middle East

 • इराकमध्ये ५०,००० लोकांना जीवन कौशल्य आणि आघात मुक्ती कार्यक्रम प्रदान करण्यात आले आहे. ४,३०७ इराकी महिलांना स्वयं रोजगार निर्मितीचे प्रशिक्षण दिले. तेथील तणावग्रस्त भागामध्ये तणाव कमी करण्यासाठी आघात राहत शिबीर घेण्यासाठी २०० पेक्षा जास्त शांतिदूत प्रशिक्षित केले आहेत.
 • इराक, इस्त्राईल, पॅलेस्टाईन, सिरीया, जॉर्डन, लेबनान, किर्गिस्तान, श्रीलंका, बाल्कन आणि अफगाणीस्थानातील युध्द प्रणव क्षेत्रातील १,५०,००० पेक्षा जास्त युध्द प्रभावीत व्यक्ती, ज्यामध्ये बाल सैनिक देखील होते, अश्या व्यक्तींना आघात मुक्ती शिबिरांचा लाभ झाला आहे.

अमेरिकेमध्ये | In the United States

 • २००८ पासून २२ राज्यातील १४७ शाळांमधून ८४,००० विद्यार्थी आणि २,३०० शिक्षकांनी शाळांसाठी असलेल्या ‘येस’ शिबिरात भाग घेतला आहे.
 • ‘वेलकम होम ट्रूप्स प्रोग्रॅम’ द्वारे २,००० युध्द सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांना स्काय मेडीटेशन वर्कशॉप द्वारे ध्यानाचा लाभ देण्यात आला. ज्यामुळे त्या व्यक्तींना आपला युध्दानंतरचा तीव्र तणाव कमी करून शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या पुनःप्राप्तीसाठी एक साधन मिळाले आहे.
 • १९९२ पासून १०,००० पेक्षा जास्त कैदी आणि त्यांच्या सुधार गृहामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी प्रीजन स्मार्ट शिबिराचा लाभ घेतला आहे. हा कार्यक्रम कैद्यांची मानसिकता, दृष्टीकोन आणि वागणूक यामध्ये मुलभूत बदल करतो आणि याद्वारे त्यांना हिंसाचाराचे चक्र तोडून आणि पुनः पुनः गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्याचे उदिष्ट प्राप्त करण्यास मदत होते आहे.

 

जीवन चरित्र डाउनलोड करा पुनरावलोकन वर्ष संग्रह


सन्मान आणि पुरस्कार संगोष्ठी आणि चर्चा आध्यात्मिक ज्ञान