श्री श्रीं बद्दल
हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी
श्री श्री रवि शंकर जी हे मानवतावादी आणि अध्यात्मिक नेते तसेच शांती आणि मानवी मूल्यांचे दूत आहेत. तणावमुक्त आणि हिंसामुक्त जग हे त्यांच्या जीवनाचे उदिष्ट्य असून त्यांनी आपल्या कार्यातून लाखो लोकांना हे उदिष्ट्य प्राप्त करण्यासाठी प्रेरित केले आहे. त्यांनी आणि लोकांनी अर्थपूर्ण आणि आणखी आनंदी जीवन जगावे यासाठी कार्यक्रम तयार करून काही प्रक्रिया आणि साधने दिली आहेत त्याचबरोबर व्यक्ती लिंग, वर्ण, राष्ट्र आणि धर्म इत्यादी सीमांच्या पार जाऊन मानवतेची ओळख करून घेण्यासाठी गैर-लाभकारी संस्थांची (NGO) स्थापना केली आहे.
सुदर्शन क्रिया®
हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी
आत्म विकासाच्या प्रक्रियेत श्री श्रीं च्या अद्वितीय योगदानांपैकी एक म्हणजे सुदर्शन क्रिया, श्वास घेण्याचे एक शक्तिशाली तंत्र जे शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक आरोग्य सुखकर करते. त्यामध्ये श्वासाच्या विशिष्ट नैसर्गिक लयींचा समावेश आहे, ज्यामुळे शरीर, मन आणि भावनांमध्ये सुसंवाद साधला जातो.