गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी श्री. अर्जुन मुंडा,( केंद्रीय मंत्री, जनजाती कार्य) आणि श्रीमती रेणुका सिंग सरुता ( राज्यमंत्री, जनजाती कार्य) यांचे समवेत उत्कृष्टतेच्या दोन केंद्रांचा शुभारंभ केला. ही केंद्रे पंचायत राजच्या संस्था आणि शेतकरी वर्गाला सबळ करण्यासाठी नेतृत्व निर्माण करण्यावर आपले लक्ष केंद्रित करतील.
व्यक्तींना सक्षम बनवून समाजामध्ये स्थायी बदल घडवून आणल्याबद्दल गुरुदेव श्री श्री रवि शंकर जींच्या प्रयत्नांची नोंद घेऊन भू-स्थानिक विश्व मंच (जीओस्पेशियल वर्ल्ड फोरम) द्वारा ” जीओस्पेशियल वर्ल्ड अवॉर्ड फॉर सोसायटल इम्पॅक्ट” ने त्यांना सन्मानित केले.
असंख्य रुग्णांना सेवा देताना येणारा धडकी भरणारा ताण निवळण्यासाठी आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना आपल्या आतच काही मिनिटे तरी गहिरी शांतता अनुभवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगने १३ ते १६ दरम्यान आपले प्रणेते आणि जागतिक स्तरावरील अध्यात्मिक गुरू, गुरुदेव श्री श्री रवि शंकरजी यांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनाखाली ऑनलाइन मेडिटेशन अँड ब्रेथ वर्कशॉपचा (ऑनलाईन ध्यान आणि श्वसन प्रक्रिया कार्यक्रम) शुभारंभ केला आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंग ने देशभरातील बऱ्याच शहरांमध्ये रोजंदारी काम करणाऱ्या आणि करोना व्हायरस लॉकडाऊन चा परिणाम झालेल्या लोकांना राशन पुरवले. IAHV आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त पुढाकाराने सुरु केलेल्या #iStandWithHumanity या प्रकल्पाला फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्राने ने खुल्या दिलाने पाठिबा दिला.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यु पाळण्याच्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद द्यावा आणि स्वतःचे आरोग्य धोक्यात असूनही आवश्यक सेवा पुरविण्यासाठी अथक परिश्रम घेत असलेल्या लोकांचे कौतुक करावे असे श्री श्री रवि शंकर यांनी लोकांना आवाहन केले.