यमुना आणि विश्व सांस्कृतिक महोत्सव | Yamuna and the World Culture Festival

नद्यांचे पुनररुजीवन आणि सफाई कामाच्या बाबतीत आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था सर्वात अग्रेसर आहे. गेल्या अनेक वर्षापासून आमचे स्वयंसेवक भारतातील १६ नद्यांचे पुनररुजीवन करण्याचे कार्य करत आहेत. कॉमनवेल्थ गेम्स नंतर ‘मेरी दिल्ली मेरी यमुना’ प्रकल्पांतर्गत ५००० पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी ६ आठवडे दररोज सेवा करून यमुना नदीतून ५१२ टन कचरा काढला. असे असताना आम्ही तेथे विश्व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केल्याने यमुना पात्राचे नुकसान झाले, असे म्हणणे हास्यास्पद आहे.