लोकशाहीचे स्तर | Layers of Democracy

ग्राम आणि तालुका पातळीवर मतदारांनी कोणता पक्ष आहे ते बघू नये तर आपल्या भागातील उमेदवाराचे कर्तृत्व आणि तो लोकांशी कितपत जुळलेला आहे ते बघावे. राष्ट्रीय पातळीवर निवड करताना सर्वोच्च पदावर प्रबळ नेतृत्व देण्याचा दृष्टिकोन असायला हवा. राज्य पातळीवर मात्र संतुलित द्रीष्टीकोन हवा असतो. ह्या सर्व बाबतीत, उमेदवाराचा स्वभावगुण आणि वर्तणूक अतिशय महत्त्वाची ठरते.