चला ! काश्मीरला पुन्हा स्वर्ग बनवूया | Let’s make Kashmir a Paradise Again

काश्मीरमध्ये शांती आणि स्थैर्य पुनःस्थापनेसाठी परिपूर्ण आणि बहु आयामी दृष्टीकोनाची आवश्यकता आहे.समाजातील सर्व घटकांच्या सहभागानेच काश्मीरमध्ये शांतता स्थापित होऊ शकते. त्यांनी मानवी मूल्यांवर आधारित दृष्टिकोनाबाबत एकमेकाशी, आपापसात चर्चा सुरु करायला हव्यात.

एकसारखे, तरीदेखील भिन्न | Same yet Different

निसर्गामध्ये प्रत्येक क्षणात सहजता आणि रचनात्मकता प्रकट होत असते. दररोज सकाळी सूर्योदय होत असला तरी प्रत्येक दिवशी प्रत्येक सूर्योदय काही वेगळ्या प्रकारे सुंदर असतो. तद्वत जीवनातील अनुभवांना पाहिले तर सारे काही प्रतिदिन एकसारखे असून देखील अगदी भिन्न असते. हेच सत्य आहे. आणखी एक वर्ष संपते आहे आणि नवीन वर्ष सुरु होत आहे.

दहशतवादाला प्रत्युत्तर | Responding to terror

पॅरिसमध्ये झालेल्या भयानक हल्ल्यामुळे जगभरातील सर्वांना हादरवून सोडले. हा फक्त युरोपियन जीवनशैलीवर नव्हे तर समस्त उदारमतवादी समाजाच्या सामान्य नीतीमुल्यांवर प्रहार होता. बऱ्याच वर्षापासून भारत अशा हल्ल्यांचा उपद्रव झेलतोय. इराक, अफगाणिस्तान आणि इतर देशात होणाऱ्या सततच्या अशा हल्ल्यांमुळे मानवी मानसिकता संवेदनाशून्य झाली आहे.