पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याची मीमांसा | Reflections on Prime Minister Modi’s Swearing in Ceremony

सार्वजनिक कार्यक्रम म्हटला, म्हणजे शिष्ठाचार व प्रचलित चाली-रूढी यांचा समावेश हा असतोच. त्यांच्याशिवाय मनुष्य आणि समाज राहू शकत नाही. समारंभ मग तो धार्मिक असो किंवा इतर कोणताही, समाजासाठी चाली-रूढी आवश्यक आहेत. आज देखील भारतात सरकारी समारंभ ब्रिटिश-कालीन पद्धतीनुसार होतात. ह्या रटाळ परंपरांना बदलण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथ ग्रहण सोहळा याचेच एक उदाहरण होते.