न्याय व्यवस्थेला न्याय द्या | Being Judicious Judicially

एक काळ असा होता की न्यायव्यवस्था पिडीत लोकांसाठी आधाराचे कारण / माध्यम, निराश लोकांसाठी आशेचा किरण, गैरकृत्य करणाऱ्यांसाठी भीतीचे कारण आणि कायद्याचे पालन करणाऱ्यांसाठी आधारस्थान असे. बुद्धिमान आणि संवेदनशील लोकांसाठी घरासारखी होती. एक असे आधारस्थान होते जेथे गरीब आणि श्रीमंत दोघांनाही सहजपणे न्याय मिळत असे आणि न्यायाधीशाच्या खुर्चीवर स्थानापन्न व्यक्तीसाठी ते एक सन्मानाचे आणि अभिमानाचे पद होते. परंतु आजकाल गरीब व्यक्ती न्यायालयापर्यंत पोहोचू शकत नाहीत,