वैश्विक विचार वैश्विक बोल | Think global, talk global

जागतिकीकरणाच्या या युगात भारतीय नेत्यांना जागतिक मंचावर बोलण्यासाठी सतत निमंत्रित केले जाऊ लागले आहे. म्हणून आपल्या राजकीय नेत्यांनी स्वतः तयारी करून जागतिक दृष्टीकोणातून आपले विचार स्पष्टपणे मांडणे गरजेचे झाले आहे.

राजधानी दिल्ली कडून घेण्यासारखा धडा | A Capital Lesson

दिल्ली विधानसभा निवडणुकांनी हे दाखवून दिलं आहे की लोकशाहीत जनतेला गृहीत धरता येत नाही. इतक्या प्रमाणात मतदान होणे चांगलेच आहे. निकालात पण लोकांचे स्पष्ट एकमत दिसले.

पुनर्विचार करण्याची वेळ : भगव्याची लाट आणि धर्मनिरपेक्षतेचे पतन | Time to rethink : Saffron surge and the secular debacle

“दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं,” ही जुनी म्हण आहे. भारतीय राजकीय परिस्थितीचे उत्तम वर्णन या म्हणीद्वारे करता येईल. कॉंग्रेसच्या नेतृत्वातील युनायटेड प्रोग्रेसिव अलायन्स (युपीए) ही आघाडी स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेते पण त्यांचे वरवरचे पदर काढून बघितले तर ते जातीयवादी असल्याचे स्पष्ट होते.

शर्यत सुरू होऊ द्या… पण जरा लवकर ! | Let the race begin… but early!

भारतात निवडणुका जाहीर झाल्या की देश भ्रष्टाचार, पक्षबदल, पक्षफुटी, अराजकता, गुन्हे आणि गैरसमजाच्या चिखलात फेकला जातो. बहुतेकवेळा उमेदवारांचे नांव अगदी शेवटी शेवटी घोषित केले जाते. त्यामुळे मतदारांना त्यांच्या भावी नेतृत्वाचा चेहरा पण पहायला मिळत नाही मग त्यांच्याशी संवाद साधने तर लांबची गोष्ट असते.

संधी हुकली, आशा धुळीला मिळाल्या | Hope quashed, Opportunity missed

प्रसिद्धीसाठी फुटकळ वल्गना, स्वतःमधील विसंगती, अति महत्वाकांक्षा आणि अनियंत्रित कारभार ह्यामुळे आप पक्षाची सकारात्मक प्रतिमा डागाळली गेली आणि लवकरच बरेच सन्माननीय लोक निराश होत पार्टी सोडून गेले. आता अरविंदचे म्हणणे आहे की या निवडणुकीत खंडीत जनादेश आणि दोन वर्षाच्या काळामध्ये मध्यवर्ती निवडणुका आल्या तरी ठीक आहे. ह्यातून राष्ट्राची अर्थव्यवस्था आणि सुरक्षा या बाबत त्याची भूमिका किती असंवेदनशील आणि निष्ठुर आहे हेच दिसून येते.