पुनर्विचार करण्याची वेळ : भगव्याची लाट आणि धर्मनिरपेक्षतेचे पतन | Time to rethink : Saffron surge and the secular debacle

“दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं,” ही जुनी म्हण आहे. भारतीय राजकीय परिस्थितीचे उत्तम वर्णन या म्हणीद्वारे करता येईल. कॉंग्रेसच्या नेतृत्वातील युनायटेड प्रोग्रेसिव अलायन्स (युपीए) ही आघाडी स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेते पण त्यांचे वरवरचे पदर काढून बघितले तर ते जातीयवादी असल्याचे स्पष्ट होते.