शिवरात्री – शिवतत्वाची जागृती | Shivaratri – Enlivening the Shiva Tattva

या ऐहिक जगतापलीकडे जाऊन अनंत, पवित्र आणि परम आनंदमयी शिवतत्वाच्या सर्वोच्च तेजोवलयात विश्रांत होण्याची शिवरात्री ही एकमेव विशेष वेळ आहे. शिवाची अनेक सामग्रींद्वारे केली जाणारी बाह्यपूजा गुंतागुंतीची वाटत असली तरी शिवपूजेसाठी ज्ञान, समत्व आणि शांती हीच सर्वोत्तम फुले आहेत असे म्हटले जाते. आपल्या अंतरात्म्यात शिवतत्वाचा उत्सव साजरा करणे हीच खरी शिवरात्री होय.