जन्माष्टमीचा खरा मतितार्थ | The Deeper Meaning of Janamashtami

कृष्णाला ‘माखनचोर’ म्हणूनही ओळखतात. दूध हे पोषकद्रव्यांचे सार आहे आणि दही हे दुधाचेच रूप आहे. दही घुसळल्यावर त्यातून लोणी बाहेर येते आणि वर तरंगू लागते. हे पौष्टिक असते आणि हलकेफुलके असते, जड नसते. त्याचप्रमाणे जेंव्हा आपली बुद्धी घुसळली जाते तेंव्हा ती लोण्यासारखी होते.