जल्लीकट्टू आंदोलन – एक चिंतनीय धडा | Jallikattu – Lessons from the Stir

जल्लीकट्टूसाठी “मरीना स्प्रिंग” सारख्या निव्वळ जनसामान्यांतून उस्फुर्तपणे निर्माण झालेल्या चळवळीचा अंत व्यक्तिगत आणि काही संस्थांच्या सुप्त घुसखोरी आणि श्रेयवादामध्ये होणे आणि चळवळ हाताबाहेर जाणे हे दुर्दैवी असले तरी चेन्नईमध्ये जे घडले ते अशा खेळांवरील बंदीच्या निर्णयांबाबतीत जनसामान्यांच्या काय भावना आहेत, हे प्रशासनाला समजावणारे आहे.

गणतंत्र दिवस: एक अध्यात्मिक दृष्टीकोण | A Spiritual Angle to the Republic Day

आपण आईच्या गर्भात एकांतात ९ महिने असतो. ज्यावेळेस आपला जन्म होतो त्या वेळेपासून आपलं सामाजिक अस्तित्व चालू होते. तिसर्‍या वर्षांपासून…

लोकशाहीचे स्तर | Layers of Democracy

ग्राम आणि तालुका पातळीवर मतदारांनी कोणता पक्ष आहे ते बघू नये तर आपल्या भागातील उमेदवाराचे कर्तृत्व आणि तो लोकांशी कितपत जुळलेला आहे ते बघावे. राष्ट्रीय पातळीवर निवड करताना सर्वोच्च पदावर प्रबळ नेतृत्व देण्याचा दृष्टिकोन असायला हवा. राज्य पातळीवर मात्र संतुलित द्रीष्टीकोन हवा असतो. ह्या सर्व बाबतीत, उमेदवाराचा स्वभावगुण आणि वर्तणूक अतिशय महत्त्वाची ठरते.

शर्यत सुरू होऊ द्या… पण जरा लवकर ! | Let the Race Begin… but Early!

भारतात निवडणुका जाहीर झाल्या की देश भ्रष्टाचार, पक्षबदल, पक्षफुटी, अराजकता, गुन्हे आणि गैरसमजाच्या चिखलात फेकला जातो. बहुतेकवेळा उमेदवारांचे नांव अगदी शेवटी शेवटी घोषित केले जाते. त्यामुळे मतदारांना त्यांच्या भावी नेतृत्वाचा चेहरा पण पहायला मिळत नाही मग त्यांच्याशी संवाद साधने तर लांबची गोष्ट असते.

तेलंगणा – फुट टाका आणि शासन करा? | Telangana – Divide and Rule?

केवळ काही भागातील लोक आपले प्रभुत्व गाजवतात म्हणून त्यांना दूर लोटण्याने काहीही साध्य होत नाही. कोणत्याही भागाचा दीर्घकालीन विकास केवळ शिक्षण आणि सशक्तीकरणामुळे घडू शकेल, विभाजनाने नाही.