धर्मांधता : तर्कसंगत की तर्कविसंगत | Fanaticism: Rational or Irrational

जेंव्हा सर्वांनाच घटनेने अभिव्यक्ति स्वातंत्र्य दिलेलं आहे, तेंव्हा मतभेद असणे स्वाभाविक आहे. पण मतभेदांना व्यक्त करण्याचा हिंसा हा मार्ग नव्हे. कोणीही आपली असहमती हिंसेद्वारे प्रकट करत असेल, तर त्याला भ्याडपणा म्हटलं पाहिजे. अलीकडेच धारवाडचे विख्यात विद्वान प्रो. एम. एम. कलबुर्गी यांनी मूर्तीपूजेच्या विरोधी आपले विचार प्रकट केले म्हणून त्यांची हत्या केली गेली. त्यांची हत्या निंदनीय आहे