परत तीच वेळ आली आहे | It’s That Time Again

आपल्या आयुष्याच्या अनेक रहस्यांपैकी ‘काळ’ हे एक मोठे गूढ आहे. काळ हा सर्वोत्तम कथाकार आहे आणि त्यासारखा कोणी साक्षीदारही नाही. बाह्य जगतात काळ प्रत्येकासाठी अगदी एकसारखा धावत असतो, तरीही, वेळ पटकन निघून जाते की रखडत जाते, हे प्रत्येकाच्या मानसिक अवस्थेवर अवलंबून असते.

एकसारखे, तरीदेखील भिन्न | Same Yet Different

निसर्गामध्ये प्रत्येक क्षणात सहजता आणि रचनात्मकता प्रकट होत असते. दररोज सकाळी सूर्योदय होत असला तरी प्रत्येक दिवशी प्रत्येक सूर्योदय काही वेगळ्या प्रकारे सुंदर असतो. तद्वत जीवनातील अनुभवांना पाहिले तर सारे काही प्रतिदिन एकसारखे असून देखील अगदी भिन्न असते. हेच सत्य आहे. आणखी एक वर्ष संपते आहे आणि नवीन वर्ष सुरु होत आहे.