महात्मा गांधींकडून अज्ञात शिकवण | Unknown Lessons from the Mahatma

आपण गांधीजींच्या कडून काय शिकू शकतो हे पाहण्याची गांधी जयंती एक संधी आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवन आपण काय काय करावं आणि काय करू नये याची सतत शिकवण देत असते. त्याग-भाव, सर्वांचा स्वीकार, सत्संग यावर अतूट श्रद्धा, देशाच्या प्रगतीसाठी सतत झटत राहण्याचे लक्ष्य आणि समाज कल्याण यासारखे गांधीजींचे आदर्श आपल्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादाई आहेत. परंतु त्यांच्या जीवनात काही असे पैलू देखील होते जे आपण काय करू नये याची शिकवण देतात.