पर्यावरण संरक्षणाला मूल्य प्रदान करणे | Adding ‘value’ to Environment Care

विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती साधतानाच पर्यावरणातही सुसंवाद राखणे हेच या शतकातील आव्हान आहे. केवळ अध्यात्मिक मूल्येच हा समतोल साधायला मदत करू शकतात.

नद्यांचे पुनर्जीवन, जीवनाचे पुनर्जीवन | Reviving Rivers, Reviving Life

फेब्रुवारी २०१३ मध्ये आर्ट ऑफ लिविंगच्या स्वयंसेवकांच्या एका छोट्या ग्रुपने बेंगलुरूच्या बाहेरील क्षेत्रामधील, चाळीस वर्षापासून कोरड्या असलेल्या कुमुदवती नदीचे पुनर्रुजीवन करण्याच्या उद्देश्याने एक प्रकल्प सुरु केला. मी आनंदाने येथे उल्लेख करू इच्छितो कि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या लोक न्यायालयाने त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांची स्तुती करून राज्यातील जिल्हा प्रशासनाला जल स्त्रोतांना पुनर्जीवित करण्यासाठी याच प्रकल्पाला अंमलात आणण्याचे निर्देश दिले.