लोकशाहीचे स्तर | Layers of Democracy

ग्राम आणि तालुका पातळीवर मतदारांनी कोणता पक्ष आहे ते बघू नये तर आपल्या भागातील उमेदवाराचे कर्तृत्व आणि तो लोकांशी कितपत जुळलेला आहे ते बघावे. राष्ट्रीय पातळीवर निवड करताना सर्वोच्च पदावर प्रबळ नेतृत्व देण्याचा दृष्टिकोन असायला हवा. राज्य पातळीवर मात्र संतुलित द्रीष्टीकोन हवा असतो. ह्या सर्व बाबतीत, उमेदवाराचा स्वभावगुण आणि वर्तणूक अतिशय महत्त्वाची ठरते.

शर्यत सुरू होऊ द्या… पण जरा लवकर ! | Let the race begin… but early!

भारतात निवडणुका जाहीर झाल्या की देश भ्रष्टाचार, पक्षबदल, पक्षफुटी, अराजकता, गुन्हे आणि गैरसमजाच्या चिखलात फेकला जातो. बहुतेकवेळा उमेदवारांचे नांव अगदी शेवटी शेवटी घोषित केले जाते. त्यामुळे मतदारांना त्यांच्या भावी नेतृत्वाचा चेहरा पण पहायला मिळत नाही मग त्यांच्याशी संवाद साधने तर लांबची गोष्ट असते.