शांती प्रस्थापनेत येत असलेल्या आव्हानांवर मात | Overcoming Challenges to Peace
बहुतांशी मानवी संघर्ष द्विपक्षीय असतात. आक्रमण कोणीही केले तरी शेवटी नुकसान दोघांचेही होते. मतभेदाची सुरुवातच तेंव्हा होते जेंव्हा दोन्ही पक्ष आपल्या आपल्या मतावर आडून बसतात. संघर्ष संपवण्यासाठी दोन्ही पक्षांना व्यापक दृष्टीने समस्येकडे पाहून मोठ्या मनाने विचार करणे आवश्यक आहे. आपापसातील चर्चेतील विलंब तसेच चर्चा बंद होणे ही मतभेद वाढण्याची प्रमुख कारणे आहेत. परस्परातील चर्चा हा मतभेद दूर करण्याचे महत्वपूर्ण साधन आहे.