योगाद्वारे अनंततेशी एकरूपता | Yoga: Bending it to Infinity!

जगभरात चौथा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. अन्तस्तम फुलविणारी हि प्राचीन कला प्रकाशझोतात येण्याची हीच योग्य वेळ आहे. गेल्या चार वर्षात योगाला जागतिक स्तरावर लाभलेली मान्यता, त्याची लोकप्रियता ह्यामुळे त्याच्या मार्गातील सारे अडथळे दूर सारले गेले. योगसाधनेकडून असलेल्या प्रचंड अपेक्षा, त्याबद्दल असलेल्या धारणा आणि त्यात असलेली बहुमुखी प्रतिभा हेच दर्शवते कि आधुनिक जगातल्या बऱ्याच व्याधींवर रामबाण उपाय आहे.

एकसारखे, तरीदेखील भिन्न | Same Yet Different

निसर्गामध्ये प्रत्येक क्षणात सहजता आणि रचनात्मकता प्रकट होत असते. दररोज सकाळी सूर्योदय होत असला तरी प्रत्येक दिवशी प्रत्येक सूर्योदय काही वेगळ्या प्रकारे सुंदर असतो. तद्वत जीवनातील अनुभवांना पाहिले तर सारे काही प्रतिदिन एकसारखे असून देखील अगदी भिन्न असते. हेच सत्य आहे. आणखी एक वर्ष संपते आहे आणि नवीन वर्ष सुरु होत आहे.

पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याची मीमांसा | Reflections on Prime Minister Modi’s Swearing in Ceremony

सार्वजनिक कार्यक्रम म्हटला, म्हणजे शिष्ठाचार व प्रचलित चाली-रूढी यांचा समावेश हा असतोच. त्यांच्याशिवाय मनुष्य आणि समाज राहू शकत नाही. समारंभ मग तो धार्मिक असो किंवा इतर कोणताही, समाजासाठी चाली-रूढी आवश्यक आहेत. आज देखील भारतात सरकारी समारंभ ब्रिटिश-कालीन पद्धतीनुसार होतात. ह्या रटाळ परंपरांना बदलण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथ ग्रहण सोहळा याचेच एक उदाहरण होते.

सिंहावलोकन आणि भविष्याचा वेध । Looking Back, Looking Ahead

आनंद हा आपल्या चेतनेचा मूळ स्वभाव असल्यामुळे उत्सव साजरा करण्यासाठी कोणतेही कारण पुरेसे असते. नववर्षाची वेळ अशी आहे की जेव्हा संपूर्ण जगाला उत्सवाच्या वातावरणाने व्यापून टाकलेले असते. सरलेल्या वर्षावर एक नजर टाकत त्यातून आपण काय धडा घेतला ह्याची नोंद घेण्याची ही एक संधी असते.