सामाजिक परिवर्तनासाठी सोशल मीडिया | Social media for social transformation

प्रसार माध्यमे समाजाचा महत्वपूर्ण स्तंभ आहेत. प्रसार माध्यमांकडून केवळ घटनांचा फक्त अहवाल दिला जातो असे नाही तर ते जनमत ही तयार करतात. ह्यामुळे लोकशाहीत माध्यमांना शक्तिशाली स्थान प्राप्त झाले आहे, आणि जिथे सत्ता असते तिथे त्या सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते.

सुसंवादाचा स्वर | A Tune of Harmony

अकबरुद्दीन ओवैसीच्या वक्तव्याने मध्यंतरी बराच गोंधळ उडाला. हे द्वेषयुक्त भाषण भयंकर धक्कादायक होतेच पण त्यापेक्षा भयानक बाब म्हणजे तेथील श्रोत्यांकडून त्याला मिळालेला टाळ्यांचा प्रतिसाद. यामुळे आपल्या सतत विस्तारित होत असलेल्या समाजातील एक विशिष्ट समुदाय बाजूला फेकला जाण्याचा धोका संभवतो.