संधी हुकली, आशा धुळीला मिळाल्या | Hope quashed, Opportunity missed

प्रसिद्धीसाठी फुटकळ वल्गना, स्वतःमधील विसंगती, अति महत्वाकांक्षा आणि अनियंत्रित कारभार ह्यामुळे आप पक्षाची सकारात्मक प्रतिमा डागाळली गेली आणि लवकरच बरेच सन्माननीय लोक निराश होत पार्टी सोडून गेले. आता अरविंदचे म्हणणे आहे की या निवडणुकीत खंडीत जनादेश आणि दोन वर्षाच्या काळामध्ये मध्यवर्ती निवडणुका आल्या तरी ठीक आहे. ह्यातून राष्ट्राची अर्थव्यवस्था आणि सुरक्षा या बाबत त्याची भूमिका किती असंवेदनशील आणि निष्ठुर आहे हेच दिसून येते.