उत्तराखंड मदतकार्य | Uttarakhand Relief Work

उत्तराखंडच्या दुर्घटनाग्रस्त भागात अडकून पडलेल्या लोकांच्या मदतीसाठी आमचे स्वयंसेवक जे काही करीत आहेत त्याचे अहवाल मला प्राप्त होत आहेत. तिथे जे प्रचंड मदतकार्य चालू आहे त्याची कल्पना तुम्हाला द्यायची आहे.

जनसमूहा कडून चळवळीकडे नेते ते नेतृत्व | Leadership: From mob to movement

लोकांप्रती गाढ प्रेम आणि करुणेचे प्रकटीकरण म्हणजे नेतृत्व. त्यातून आपल्या तत्वांप्रती प्रतिबद्धता प्रतीत होते. त्या अर्थाने, काही ना काही अंशी नेतृत्वगुण प्रत्येक व्यक्तीत सुप्तरूपात असतात. पण त्यांचं पोषण करताना काही आव्हाने येतात.

बंदी घालणे हे प्रत्येकवेळी प्रभावी माध्यम होऊ शकत नाही | A ban doesn’t always work

‘विश्वरुपम्’ या कमल हसनच्या चित्रपटावरील विवादाबद्दल आणि त्यावर तामिळनाडु मध्ये घातलेल्या बंदीबाबत बरीच चर्चा सुरु आहे.

गंमत म्हणजे काही महिन्यांपूर्वी असाच एक चित्रपट आला होता, ज्यात साऱ्या हिंदू रूढी आणि प्रतिके म्हणजे फसवेगिरी असते आणि सारे अध्यात्मिक नेते दांभिक असल्याचे चित्र रंगविले होते.

नवीन सुरवात | A New Beginning

आपल्याला असं वाटतं की आपण या जगाचा एक भाग आहोत, पण खरेतर हे जगंच आपला भाग आहे. आपण आपलं जग आपल्या मनात सामावून असतो आणि आपल्या भोवतालचं जग अशांत असलं तर आपलं मन शांत राहू शकत नाही. जेव्हा प्रौढावस्थेत येणारे पेचप्रसंग अकाली अल्पवयातच सुरू होतात समाजात हिंसा आणि मादक द्रव्यांचा प्रादुर्भाव होतो व अशांतता वाढते, मानवता केवळ आदर्शवादी भासते, आनंद, प्रेम, करुणा केवळ पुस्तकात आणि पडद्यावरच उरतात, भ्रष्टाचार आणि गुन्हे हे जीवन जगण्याची पद्धत म्हणून स्वीकारले गेले की काय असे वाटू लागते आणि मग समाजातील या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला प्रबळ होऊन उभे राहावे लागेल हे जाणून घ्यायचा हा संकेत असतो.