योग आणि ध्यान ही आजची काळाची गरज आहे | Yoga and meditation are the need of the hour

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

मानसिक आरोग्य ही आज जगभरात सर्वात मोठी समस्या झालेली आहे. पूर्ण जगभर कोरोनाची सारखी महामारी पसरलेली असताना आणि लोक लॉकडाऊनमध्ये अडकलेले असताना, त्यांच्या हृदयात आणि मनात चिंता व्यापून आहे. यावर मात करण्यासाठी योग आणि ध्यान हा सर्वोत्तम उपाय आहे.

योग आणि ध्यान, दोन्हीही जगातल्या कानाकोपऱ्यात पोहोचवले पाहिजेत, हे अत्यावश्यक आहे आणि मी तर म्हणेन ही आजची काळाची गरज आहे कारण त्याचे फायदे प्रचंड आहेत.

आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासोबतच योगामुळे आपण शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त आणि भावनात्मक स्तरावर स्थिर राहतो. योगाच्या नियमित सरावाने आपली उर्जा नेहमी उच्च स्तरावर राहते, ज्यामुळे आपल्या उत्साहात वाढ होते.आपण आपल्या स्पंदनातून जास्त व्यक्त होत असतो आणि योगाने आपली स्पंदने सकारात्मक आणि आकर्षक होतात.

प्रत्येक नागरिकाला योग करण्याची संधी उपलब्ध आहे की नाही याची खात्री करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ज्यांना आपल्या आत आंतरिक शांतीचा अनुभव आला, त्यांनी ते सर्वांना सांगायलाच हवे. मी प्रत्येक योगसाधक आणि योगशिक्षकाला उत्कटतेने सांगू इच्छितो की, त्यांनी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून हे अमुल्य ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवत या जगाला योग्य मार्गावर आणण्यासाठी आपले अंशतः योगदान द्यावे.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या या प्रसंगी आपण आपला निश्चय दृढ करू या आणि तसे कार्यान्वित होऊ या. ध्यानाबद्दल आणि पर्यावरणाच्या सजगतेबद्दल लोकांना ज्ञात करू या.

येत्या काही वर्षात आपण मोठ्या पार्क्समध्ये विशाल संख्येने जमून एकत्र योग करू आणि एकमेकांना प्रेरित करू अशी आशा बाळगू या. पण या वर्षी पूर्ण जगभरात होणाऱ्या ऑनलाईन कार्यक्रमांवरच समाधान मानू या.

संबंधित लेख | Related posts

दररोज दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7.30 वाजता गुरुदेव श्री श्री रविशंकर जीं बरोबर लाइव ध्यानामध्ये सहभागी व्हा।

Leave a Reply

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>