यमुना आणि विश्व सांस्कृतिक महोत्सव | Yamuna and the World Culture Festival

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

नद्यांचे पुनररुजीवन आणि सफाई कामाच्या बाबतीत आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था सर्वात अग्रेसर आहे. गेल्या अनेक वर्षापासून आमचे स्वयंसेवक भारतातील १६ नद्यांचे पुनररुजीवन करण्याचे कार्य करत आहेत. कॉमनवेल्थ गेम्स नंतर ‘मेरी दिल्ली मेरी यमुना’ प्रकल्पांतर्गत ५००० पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी ६ आठवडे दररोज सेवा करून यमुना नदीतून ५१२ टन कचरा काढला. असे असताना आम्ही तेथे विश्व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केल्याने यमुना पात्राचे नुकसान झाले, असे म्हणणे हास्यास्पद आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगला यमुनेच्या तीरावर विश्व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यासाठी दिल्ली विकास प्राधिकरणाने अधिकृत परवानगी दिली होती. जर ही परवानगी दिली गेली नसती तर हा कार्यक्रम अन्य कोठेही केला गेला असता.

 

malwadebrisafter

 

कित्येक वर्षापासून यमुनेच्या तीराचा वापर बेकायदेशीरपणे कचरा टाकण्याकरिताच होत होता. खाली दिलेल्या छायाचित्रामध्ये या क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात कचरा पडल्याचे दिसत आहे. या महोत्सवाच्या तयारीसाठी येथून सर्व कचरा हटवला गेला, काही जंगली गवत काढले गेले परंतू एकही वृक्ष तोडला गेला नाही. स्टेज बरोबरच इतर बांधकामे तात्पुरत्या स्वरुपाची होती जी महोत्सवानंतर काढता येणार होती, जेणेकरून ते मैदान त्याच्या मूळ स्वरुपात पण कचरा विरहित असे परत देता यावे. यमुनेचा तीर सपाटच होता म्हणून हे सिद्ध होते की येथे पूर्वी शेती होत होती. पर्यावरण मंत्रालयाच्या परवानगीने या मैदानात लोकांना चालता यावे, बसता यावे असे सपाटीकरण केले गेले.

सतरा ओढ्यांमधून नदीमध्ये होणारा विषारी द्रव्यांचा निचरा आणि नदीचे होणारे प्रदूषण यामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे यमुनेच्या तीरावर तीन मिनिटे थांबणे अवघड होते मग तीन दिवस सांस्कृतिक महोत्सव करणे एक दिव्यच होते. ज्या कार्यक्रमाला राष्ट्रपती, पंतप्रधान आणि १५५ देशातील सन्माननीय प्रतिनिधी उपस्थित राहणार होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने आर्ट ऑफ लिव्हिंग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नद्यांचे संरक्षण आणि यमुनेच्या स्वच्छतेप्रती जागृती निर्माण करू इच्छित होते. यमुनेचे प्रदूषण कमी व्हावे, त्यातील विषारी द्रव्यांचे प्रमाण कमी व्हावे आणि दुर्गंधी कमी व्हावी यासाठी कित्येक महिन्यांपासून लाखो कुटुंबांनी एन्झाईम बनवायला सुरवात केली होती. स्वयंपाकघरातील भाज्या आणि फळे यांच्या कचऱ्यापासून नैसर्गिक एन्झाईम बनायला तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागतो. हे एन्झाईम पूर्णपणे सेंद्रिय असते आणि याची स्वच्छता प्रक्रिया पूर्ण जैविक आहे.

IMG_0048 (1)

यमुनेमध्ये एन्झाईम सोडल्यावर पंधरा दिवसातच त्या पाण्यातील प्रदूषणाचे प्रमाण कमी होऊ होत असल्याचे स्पष्टपणे जाणवू लागले. विषारी द्रव्यांचे प्रमाण घटले आणि दुर्गंधी फारच कमी झाल्याची स्थानिक लोकांनी माहिती दिली. या पाण्याकडे न फिरकणारे पक्षी आणि म्हशी, जनावरे देखील आता पाण्यात शिरू लागले होते.

अशा या निर्जन क्षेत्राची एवढ्या भव्य महोत्सवासाठी निवड करून आर्ट ऑफ लिव्हिंगने एक आव्हान स्विकारले आणि त्याचे रुपांतर स्वच्छ आणि हरित क्षेत्रामध्ये केले. अगदी पशू पक्षांना देखील हा बदल जाणवला.

 

IMG_0043 (1)

 

यमुनेवर एन्झाईमचा प्रभाव | Impact of enzyme on the Yamuna.

 • यमुनेची साफसफाई करण्यासाठी दिल्लीतील आमच्या लाखभर स्वयंसेवक कुटुंबांनी एन्झाईम तयार केले होते. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या भाज्या आणि फळ फळावळ यांच्या साली आणि टाकाऊ पदार्थांपासून बनवले जाते. याला वापरात आणण्यासाठी तीन महिने लागतात.
 • काही आठवड्यापूर्वी यमुनेच्या आस पास असह्य दुर्गंधी होती. बारापुला ओढ्यात एन्झाईम वापरल्यानंतर काही दिवसांनी स्थानिक लोकांनी सांगितले की दुर्गंधी बरीच कमी झाल्यामुळे आम्ही आत्ता चांगले झोपू शकतो.
 • त्यांनी अलीकडे पशु पक्षांना यमुनेकडे फिरकताना देखील पाहिले नव्हते परंतू काही दिवसांपासून पाण्यामध्ये म्हशी आणि पक्षांना पाण्याजवळ पाहून खूप आश्चर्य वाटले. एन्झाईममुळे प्रदूषण फार कमी झाले आहे हे यावरून सिध्द होते.
 • आम्हीदेखील एन्झाईम वापरण्यापूर्वी आणि नंतर यमुनेच्या पाण्याचे नमुने तपासल्यानंतर पाण्याच्या गुणवत्तेत मोठा फरक आढळला.

इतर क्षेत्रामध्ये खास करून शेतीसाठी एन्झाईमचा बहुमुल्य उपयोग

 • शेती पध्दतीत अन्य कोणताही बदल न करता निव्वळ एन्झाईम फावराल्यामुळे शेती उत्पादनात कमीतकमी १०% वाढ झाली.
 • एन्झाईमच्या वापरामुळे अन्न धान्याच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा झाली. पिक निरोगी आणि एकसारखे आले. पिके हिरवी गार आली. वाळून पिवळे झालेले गव्हाचे पिक १० दिवसात हिरवे गार झाले.
 • उच्च प्रतीचे धान्य आल्यामुळे चांगला बाजारभाव मिळाला.
 • प्रयोग शाळेतील संशोधना अंती समजले की साधारण गव्हाच्या पिकापेक्षा एन्झाईम मारलेल्या गव्हामध्ये आर्द्रता, प्रोटीन, स्टार्च आणि ग्लूटोनमध्ये चांगलीच वाढ झाली होती.
 • एन्झाईमच्या वापरामुळे जनावरांचा चारा एका कापणीच्या हंगामात चार वेळा उगवला. हे कोणी ऐकलेले नाही सहसा एका हंगामात एकच पीक येते.
 • बटाटा नेहमी छोटा, मध्यम आणि मोठ्या आकारात येतो. परंतु एन्झाईमच्या फवारणीमुळे छोटा बटाटा आलाच नाही, सगळे बटाटे मोठे आणि एकाच आकाराचे उगवले. न पिकणारा हिरवा बटाटा उगवलाच नाही. एकरी १० क्विंटलचे जास्तं उत्पादन मिळाले.

एन्झाईम वापराचे अन्य निष्कर्ष

 • मलेशियामध्ये निव्वळ चार दिवसांत एका प्रदूषित जलाशयाच्या पाण्याच्या गुणवत्तेमध्ये उल्लेखनीय सुधारणा झाली.
 • प्रकाश उत्सर्जन करणाऱ्या उपकरणाशेजारी एक एन्झाईमची बरणी शेजारी ठेवल्याने प्रकाश उत्सर्जनामध्ये एक चतुर्थांश कमी जाणवली.
 • एन्झाईमचा वापर भांडी घासण्यासाठी केल्याने भांडी घासणाऱ्याच्या हातातील जखमा भरून निघाल्या.
 • एन्झाईमच्या वापराने नापीक जमिनीचे रुपांतर सुपीक जमिनीत झाले.
 • एन्झाईमच्या वापरामुळे जलाशयाची जल धारण क्षमता वाढली आणि आजूबाजूच्या पर्यावरणाचे पुनररुजीवन झाले.

आर्ट ऑफ लिव्हिंगने पर्यावरण क्षेत्रामध्ये सुरु केलेले सेवा प्रकल्प

 • ‘मेरी दिल्ली-मेरी यमुना’ प्रकल्पांतर्गत २०१० साली आमच्या स्वयंसेवकांनी दिल्लीमध्ये जागृती निर्माण करण्यासोबत यमुना नदीतून अंदाजे ५१२ टन कचरा काढला.
 • कित्येक वर्षांपासून आमचे स्वयंसेवक देशभरातील १६ कोरड्या नद्यांच्या पुनर्रुजीवनसाठी कार्यरत आहेत.
  • महाराष्ट्र
   • लातूर: घरनी, तावर्जा, रेना, जना, मुद्गल
   • उस्मानाबाद : तेरना, राजेगावी , बेनितुरा
   • जालना: नारोला
   • नागपुर: वेना
   • जळगांव: वाघुर
   • सांगली ,सातारा: मान
  • कर्नाटक
   • बेंगलुरु: कुमुदवती
   • चिकमंगलूर: वेदवती
   • कोलार: पलार
  • तामिळनाडू
   • वेल्लोर: नागनदी
 • २०१४ मध्ये कर्नाटकातील उच्च न्यायालयाच्या लोक न्यायालयाने आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नद्या पुनररुजीवन संबंधित उत्तम कार्याला मान्यता दिली असून राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाला जल स्त्रोतांना पुनररुजीवन करण्याचे प्रकल्प सुरु करण्याचे निर्देश दिले.
 • केरळच्या पंपा नदीत तीर्थयात्रेकरूंनी डुबकी मारून नदीत सोडलेल्या कचऱ्यांपैकी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी ६०० टन कचरा काढला. तसेच स्वयंसेवकांनी तीर्थयात्रेकरूंच्या सोबत चर्चा करून आत्ता नदी स्वच्छ ठेवण्याचा आग्रह केला.
 • आम्ही संयुक्त राष्ट्र संघाच्या ‘Stand Up & Take Action’ प्रकल्पांतर्गत जगभरात लाखो वृक्ष लावले आहेत.
 • हे उपक्रम जगभरातील प्रादेशिक स्तरावर अनेक पर्यावरणा विषयी सेवा उपक्रमांच्या कक्षेबाहेरचे आहे.

Leave a Reply

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>