नद्यांचे पुनर्जीवन, जीवनाचे पुनर्जीवन | Reviving rivers, Reviving life

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

फेब्रुवारी २०१३ मध्ये आर्ट ऑफ लिविंगच्या स्वयंसेवकांच्या एका छोट्या ग्रुपने बेंगलुरूच्या बाहेरील क्षेत्रामधील, चाळीस वर्षापासून कोरड्या असलेल्या कुमुदवती नदीचे पुनर्रुजीवन करण्याच्या उद्देश्याने एक प्रकल्प सुरु केला. मी आनंदाने येथे उल्लेख करू इच्छितो कि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या लोक न्यायालयाने त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांची स्तुती करून राज्यातील जिल्हा प्रशासनाला जल स्त्रोतांना पुनर्जीवित करण्यासाठी याच प्रकल्पाला अंमलात आणण्याचे निर्देश दिले.

वृक्षतोड, वाळू माफिया आणि अनियोजित विकास कार्यांमुळे निव्वळ नद्यांनाच प्रदूषित केले नाही, तर येथील जैविक विविधतेला विनाशाच्या उंबरठ्यावर आणून उभे केले आहे. आत्ता पर्यावरणाच्या रक्षणाच्या जागृतीसाठी उभे राहण्याची वेळ आली आहे. कुमुद्वती नदी कायापालट प्रकल्पाचे कमीतकमी खर्चात झालेल्या प्रकल्पाचे उल्लेखनीय आणि स्पष्ट परिणाम समोर आले आहेत. या परियोजनेचा लाभ २८१ गावांना होईल आणि बेंगळूरू शहराचा पाणीपुरवठा सुधारेल.

Before cleaning

ही परियोजना सुरु करणाऱ्या स्वयंसेवकाच्या छोट्या ग्रुपला सरकार आणि स्थानिक लोकांचा संशय आणि निराशावाद यांचा सामना करावा लागला. पण ते कार्यरत राहिले आणि त्यांनी या परियोजानेची गरज समजावून सांगण्यासाठी ग्रामीण जनता आणि सरकार यांच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले. ही परियोजना जशी जशी कार्यरत होत गेली शेकडोंच्या संख्येने स्वयंसेवक यात सामील झाले. ग्रामीण युवकांसह टी शर्ट घातलेले, फावड्याने खोदकाम करणारे प्रसन्न, शहरी युवक पाहणे एक सुखद अनुभव होता. या परियोजनेमुळे शहरी – ग्रामीण संबंधाचे सुखद आणि दुर्लभ दर्शन झाले.

After cleaning

Building check dams

भूजलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणारे खुपसे निलगिरी वृक्ष नदीच्या पात्रात उगवले होते. त्यांना उपटून टाकून त्याजागी हजारो पिंपळ, कडूनिंब, पोंगेमियाची रोपे ओळीने लावली गेली. भूस्खलन नियंत्रित करण्यासाठी आणि जमिनीतील ओलावा टिकवून राहण्यासाठी छोटे दगडांचे बांध बांधले गेले. या सर्व आणि इतर अनेक उपायांमुळे लवकरच भू जल स्तर उंचावला आणि नदी पात्रातील पाण्याची पातळी देखील वाढली. ४० वर्षापासून निव्वळ नकाशात असणारी हि नदी जिवंत होऊन वाहू लागली. त्या पूर्ण क्षेत्रातील संपूर्ण जैविक विविधतेचा पुनरुध्दार आता व्हायच्या मार्गावर आहे.

After cleaning

याच सारखे पुनर्जीवन प्रकल्प आता कर्नाटकातील अर्कवती, वेदवती आणि पलार नदी, तामिळनाडूतील नागनदी आणि महाराष्ट्रातील घरणी, तेरणा, बेनीतुरा, तावरजा इ. नद्या आणि बाभळगांव तलाव यांवर सुरु करण्यात आले आहेत. यापैकी बरेच प्रकल्प पूर्ण होत आले आहे.

हजारो स्वयंसेवकाचे अथक प्रयास आणि अखंड उत्साहामुळेच हे शक्य झाले आहे. खुपश्या स्वयंसेवकांना देशांतर्गत आणि बाहेरील अन्य भागातील अश्याच प्रकल्पांमध्ये सेवा करण्यासाठी मी प्रोत्साहित करतो. हीच ईश्वर आणि मानवतेची खरी सेवा आहे.

Leave a Reply

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>