नेपाळ भूकंपग्रस्थांसाठी मदतकार्य | Nepal Earthquake Relief Efforts

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

आपदा राहत मदतकार्य

अकरावा दिवस

तांदूळ, घोंगड्या, औषधे आणि साफ-सफाईचे सामान घेऊन पहिली तुकडी पहाटे 3 वाजता सिंधुपाल चौक जिल्ह्याकडे निघाली. नंतर आणखी एक तुकडी त्याच जिल्ह्यात एका वेगळ्या ठिकाणी उतरली,त्यांनी तंबू आणि अन्न वितरित केले आणि लोकांनी मानसिक धक्क्यातून बाहेर पडावे यासाठी काही शिबिरे घेतली. एक स्वयंसेवक सकाळी कवरे गावाच्या दिशेने काही तंबू घेऊन निघाला आहे.

औषधं, तंबूचे साहित्य आणि घोंगड्यांनी भरलेला एक ट्रक धाडींग जिल्ह्याकडे रवाना झाला, जिथे स्वयंसेवकांची एक तुकडी आधीच पोहचलेली होती. एका स्थानिक व्यक्तीच्या विनंतीनुसार स्वयंसेवकांची दुसरी तुकडी तांदळाची पोती घेऊन धाडींगकडे निघाली. तिथेही काही शिबिरं करण्याचा बेत होता. पण असले काही झाले नाही कारण ज्या व्यक्तीने हे सगळे आयोजन केलेले तो म्हणाला की हे सर्व सामान मी स्वतः:च्या गोदामात ठेवतो व स्वतः: त्याचे वितरण करतो आणि पसार झाला. शिबिरात भाग घेण्यासाठी कोणीही तयार नाही असे तो म्हणाला. आम्ही काहीही करू शकलो नाही. अशा प्रकारची ही पहिलीच घटना होती.

अनाथाश्रम चालवणारी एक महिला आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटरमध्ये आली आणि तिथल्या मुलांसाठी दोन तंबू आणि काही घोंगडी मागितली. विनंती केलेली सामग्री त्वरित त्यांना देण्यात आली.

पाण्याच्या बाटल्या, तंबूचे साहित्य, घोंगड्या व औषधं घेऊन काठमांडू मधील किर्तिपूरकडे एक तुकडी रवाना झाली. तशाच तयारीनिशी बलजु बुधनिलकांठ ठाणकोट आणि भक्तपूर कडे वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी तुकड्या निघाल्या.

आर्ट ऑफ लिव्हिंग पोखरा येथे ट्रकद्वारे घोंगड्या, तंबू आणि मुलांसाठी अन्न पाठविण्यात आले होते जे त्यांना गोरखा जिल्ह्यात वितरीत करण्यात आले.

trauma relief at Kalika, Sindhupalchowk, Nepal

food and tent distrubution at Sindupalchowk, Nepal

tent distribution at Kalika, Sindhupalchowk, Nepal

trauma relief at katunje bhaktapur, Nepal

trauma relief at katunje bhaktapur1, Nepal

trauma relief at kritipur, Nepal

trauma relief at kritipur1, Nepal

trauma relief at kritipur2, Nepal

trauma relief at Sindhupalchowk

trauma relief at thankot

बारावा दिवस

बहरीनचे राजकुमार नेपाळमध्ये स्वतः: साहित्य वाटपासाठी हजर होते. श्री श्री यांच्याबद्दल त्यांना खूप आदर आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे मदत सामग्री पाठविण्यास ते आले होते. त्यांनी काठमांडूमधील पाटन हॉस्पिटल आणि बसंतपूरच्या प्रसूती रुग्णालयाला भेट दिली आणि तंबू, अन्न, पाणी आणि घोंगड्यांचे वितरण केले. आयएएचव्हीच्या संचालकांनी या भागात आपत्ती राहत ध्यान शिबिरे आयोजित केली.

बायोम कुसम संस्था, काठमांडू यांनी आयोजित केलेल्या मदत शिबिरासाठी अन्न मागितले होते, जे ताबडतोब देण्यात आले.

डोलाखा जिल्ह्यातील आर्ट ऑफ लिव्हिंगचा स्वयंसेवक मदतकार्यासाठी लागणारी सामग्री गोळा करण्यासाठी काठमांडू येथे होते. त्यांनी 5 व्ही.डी.सी. मध्ये वितरित करण्यासाठी 300 तंबू आणि 800 घोंगड्या घेतल्या. त्यांनी भेट दिलेल्या प्रत्येक विभागात आपत्ती राहत ध्यान शिबिरे आयोजित केली. तंबू आणि तांदूळ डोलाखाच्या एका वेगळ्या भागाकडे पाठविला गेला.

नुवाकोट जिल्ह्यात उपरती समाजाने वितरणसाठी व्यवस्था केली होती. आमच्या स्वयंसेवकांचे एक दल ध्यान शिबीर घेण्यास त्यांच्या बरोबर गेले होते.

जवळपासच्या गावातील लोकांनी मदत साहित्यांसाठी विनंती केल्याने आयएएचव्ही (IAHV) संचालकांसह ९ व्या दिवशी कवरे जिल्हा दौरा करून आलेल्या संघटनांचे पथक पुन्हा त्याच टीमबरोबर उद्या तेथे जाणार आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने त्यांना आघात राहत शिबिराबरोबर तंबू आणि तांदूळांचे पोते देण्यात आले.

आर्ट ऑफ लिव्हिंग-बीरगुंज मधील स्वयंसेवकांचे एक अन्य दल धाडींगमध्ये ध्यान शिबिरांसाठी व सामग्री वितरणासाठी आधीच उपस्थित आहे.

baharain prince at Maternity Hospital, Nepal

tents for dolakha, Nepal

trauma relief at Dhading by Birgunj team, Nepal

trauma relief at Dhading by Birjung team 2, Nepal

trauma relief at Maternity Hospital, Nepal

trauma relief at Maternity Hospital 2, Nepal

trauma relief at Nuwakot, Nepal

trauma relief at Nuwakot 2, Nepal

Leave a Reply

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>