जल्लीकट्टू आंदोलन – एक चिंतनीय धडा | Jallikattu – Lessons from the stir

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

जल्लीकट्टू – सामूहिक ऊर्जेला दिशा दाखवणे आवश्यक !

जल्लीकट्टूसाठी “मरीना स्प्रिंग” सारख्या निव्वळ जनसामान्यांतून उस्फुर्तपणे निर्माण झालेल्या चळवळीचा अंत व्यक्तिगत आणि काही संस्थांच्या सुप्त घुसखोरी आणि श्रेयवादामध्ये होणे आणि चळवळ हाताबाहेर जाणे हे दुर्दैवी असले तरी चेन्नईमध्ये जे घडले ते अशा खेळांवरील बंदीच्या निर्णयांबाबतीत जनसामान्यांच्या काय भावना आहेत, हे प्रशासनाला समजावणारे आहे.

शेवट गोड अपेक्षित !

जल्लीकट्टू वरील बंदी न्यायालयाने काढून टाकल्यावर आपल्या चळवळीच्या यशाचा आनंद साजरा करणाऱ्या निदर्शकांना हाताळणे जमले नाही. कोणत्याही चळवळीचा, उठावाचा समारोप व्यवस्थित होणे गरजेचे असते. याच्या अभावामुळे या चळवळीतील जनसामान्यांचा आशावाद आणि उस्फुर्त ऊर्जा अगदी सहजपणे गैर मार्गाने वळवली गेली.

शांतपणे झालेल्या या यशस्वी चळवळीचा शेवट काही आतताई तरुणांमुळे विघातक मार्गाने जाण्यापूर्वी आंदोलनकर्त्यांनी परतायला हवे होते. याचा शेवट कायम स्मरणात राहील अशा लक्षणीय समारोपाने होणे गरजेचे होते. भव्य स्वरूपात सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम, सत्संग अशा मार्गांनी उत्साही वातावरणात आणि सकारात्मक मार्गाने समारोप होणे सहज शक्य होते.

परंपरा टिकून आहे हे जाणवले

जल्लीकट्टूची चळवळ एक आदर्श चळवळ होती. विशेषतः विद्यार्थांनी आपला प्राचीन खेळ जल्लीकट्टूच्या जपणुकीसाठी आणि स्वाभिमानासाठी सुरु केलेली शांतपणे सुरु झालेली अर्थपूर्ण चळवळ. कोणत्याही सांघिक प्रयत्नांशिवाय अगदी काही दिवसांमध्ये लाखो आंदोलनकर्ते यात सामील झाले होते हेच मनाला भावणारे होते. देशातील परंपरेसाठी आणि आपल्या स्वाभिमानासाठी युवा वर्ग अद्याप जागरूक आहे हे येथील संस्कृतीप्रती सजगता दर्शवते. ‘जल्लीकट्टू वुईथ तमिळ प्राईड’ या गाण्याला यु ट्यूब वर लाखो प्रेक्षक मिळाले असे मला सांगण्यात आले. जेंव्हा युवा वर्गामध्ये आपल्या प्राचीन परंपरांबद्दल अभिमान निर्माण होतो आणि ते तिला आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनवतात तेंव्हा त्यांचे जीवन तर अर्थपूर्ण बनतेच, तसेच त्यांच्यामध्ये उपयुक्त असे सामर्थ्य आणि शौर्य जागृत होते.

समाज विघातकांपासून सावधान

जेंव्हा लोक एखाद्या भावनिक विषयासाठी हजारोंच्या संख्येने जमा होतात, तेंव्हा असा समुदाय निर्भीड असतो. अश्या उत्तेजित समुदायामध्ये, त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय संपल्यावर त्यांच्या भावना शांत करून, सौम्य करून तो समुदाय विसर्जित करण्याची क्षमता असावी लागते. हे माझ्या ध्यानात आल्यावर मी सतत लोकांना जागृत राहण्यासाठी सुचित करत होतो.

चेन्नईत घडलेल्या प्रकारामुळे हे लक्षात आले की सामाजिक हितासाठी अशा समुदायाला शहाणपणाने, सहनशक्ती आणि चिकाटीने समाज विघातक आणि विध्वंसक घटकांपासून दूर ठेवणे आवश्यक असते.

उपद्रवावर नियंत्रण

सुदैवाने या चळवळीमधील खरे निदर्शक समाजकंटकापासून आपोआप दूर झाले. खरेतर पोलीस कारवाई टाळता आली असती पण ती गरजेची झाली. परंपरा, मानवी संरक्षण आणि जनावरांची सुरक्षा यांचा सुवर्णमध्य साधणे गरजेचे आहे. जल्लीकट्टू हा तामिळनाडूतील बहुतांशी भागात पारंपारिक रीतीने खेळला जाणारा आणि पोंगल उत्सवाचा महत्वाचा भाग आहे. आपली संस्कृती कृषिप्रधान आहे आणि शेती करताना बैलांची होणारी मदत ही शेतकऱ्यांसाठी अगदी जीवनदायी आहे. म्हणून बैल हा शेतकऱ्याचा कुटुंबीयच बनतो, त्यांची पूजा केली जाते.

गेल्या काही दशकांमध्ये लक्षणीयरित्या कमी आणि दुर्मिळ होत चाललेल्या बैलांच्या स्थानिक वंशाच्या वाढीला प्रोत्साहन देणारा असा हा जल्लीकट्टू खेळ आहे. तामिळनाडू सरकारने नवीन कायदा मंजूर करून जल्लीकट्टूला परवानगी दिली असली तरी आपण आत्ता हा बैलांचा पारंपारिक खेळ त्याच्या खऱ्या उद्देश्याने आणि सुरक्षितपणे कसा खेळला जाईल हे पाहिले पाहिजे. सरकारने याबाबतीत सीसीटीव्हीची पाळत आणि बैलांची खेळापूर्वी आणि खेळानंतर वैद्यकीय तपासणी सह इतर कडक मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. दुखापती टाळण्यासाठी खबरदारी घ्यायला हव्यात.

कौशल्याची कसोटी

जल्लीतट्टूसारख्या खेळामध्ये क्वचित प्रसंगी कायद्याचे उल्लंघन होते आणि काही व्यक्ती प्राण्यांप्रती निर्दयीपणाने वागलेत. पण त्याचा उद्द्येश माणसांना आणि प्राण्यांना इजा पोहोचावी हा नाही आहे. खरेतर अशा खेळांसाठी खूप कौशल्य, एकाग्रता, शारीरिक क्षमता आणि सहनशक्तीची गरज असते. दक्षिण कर्नाटकात खेळत असलेल्या कंबाला या अशाच एका खेळात खेळाडू म्हैशीवर ठेवलेल्या जू चा दोरखंड धरून १४५ मीटर निव्वळ १३.५ सेकंदात पार करतात. म्हणजे १०० मीटर अंतर निव्वळ ९.३१ सेकंदात पार करतात आणि ऑलिंपिकचे रेकॉर्ड आहे ९.५८ सेकंदांचे. अशा खेळांना बंदी घालणे म्हणजे ग्रामीण युवकांचे हे क्रीडा कौशल्य दडपण्यासारखे आहे.

जल्लीकट्टू नंतर

आपल्या संस्कृतीची ही बाजू न्यायालयासमोर व्यवस्थित मांडली गेली नाही हे दुर्दैव आहे. परिणाम काय तर अशा खेळांवर प्राण्यांप्रतीचा निर्दयीपणा या कारणामुळे बंदी. जीवरक्षक कार्यकर्त्यांना जर खरेच प्राण्यांप्रती प्रेम असेल तर त्यांनी आपला रोख कत्तलखाने आणि खाटिकखान्यांवर बंदी घालण्यामध्ये वळवावा.

यासोबत जल्लीकट्टूमध्ये सुरक्षा आणि संरक्षण यांचे कडक पालन व्हावे आणि यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई व्हावी.

भाषांतरित ट्वीट – @Srisri


मी जल्लीकट्टू चे समर्थन करतो आणि आंदोलन शांततेत रहावे अशी विनंती करतो. सुप्रीम कोर्टा मध्ये योग्य तथ्यांसह नवीन अपील केले जाते त्यामुळे जरा धीर धरा.


६ दिवसांचे जल्लीकट्टू आंदोलन शांततेत पार पडले हा तामिळनाडूतील लोकांचा विजय आहे. उत्सव सुरू असताना दुर्दैवाने त्याला हिंसक वळण लागले. (१)


मी तामिळनाडूतील जनतेला शांत राहण्याचे आणि समाजविघातक घटकांना जल्लीकट्टू चळवळीचे शांततेचे स्वरूप अपहृत न करू देण्याचे आवाहन करतो (२)


सम्बंधित लेख:

Leave a Reply

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>