इराकी जनतेने अनुभवली उत्पातातही शांती | Iraqis Experience Peace Amidst Turmoil

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

अनेक वर्षांपासून इराकच्या जनतेला जो त्रास सहन करावा लागत आहे, त्याच्या तीव्रतेचा अंदाज येणे कठीण आहे. सध्याच्या अस्थिरतेमुळे त्यात भरच पडली आहे. सांप्रदायिक विभाजनामुळे भविष्यात ही निश्चितता कायम राहणार असेच दिसत आहे. आज इराक मध्ये कोणालाही सुरक्षित वाटत नाही.

इराकी नागरिकांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग ने हाती घेतलेल्या मदत कार्याबद्दल मी समाधानी आहे. गेल्या आठवड्यात आमचे दोन स्वयंसेवक क्रिस्टोफ ग्लेझर आणि मावाहिब अल शाबानी यांनी कुर्दिस्तानमध्ये जाण्याचे धाडस केले आणि संसदेच्या 35 सदस्यांना नेतृत्व आणि शांती प्रस्थापित करण्याचे प्रशिक्षण दिले.

Parlimentarians along with Art of Living faculty members at the leadership program by Art of Living in Kurdistan-Iraq

श्वासन प्रक्रिया आणि ध्यानांच्या माध्यमातून खासदारांनी गहन शांती अनुभवली. राजकीय आणि वैचारिक मतभेद विसरून, सर्व एकमेकांशी संवाद सादु लागले, त्यांच्या अनुभवांची देवाण-घेवाण झाली आणि त्यांनी एकमेकांच्या भावना समजावून घेतल्या. सगळ्यांचं असं मत होतं की जर अश्या प्रकारच्या कार्यक्रमात अधिकाधिक लोक सामील झाले तर ते इराकमध्ये लवकरच शांती नांदू लागेल.

Art of Living Course for Kurdistan, Iraq politicians

त्यांच्यापैकी काहींनी सांगितले की या कार्यशाळेने आम्हाला “मी इतरांना जाणून आहे” या पासून “माझा इतरांवर विश्वास आहे” इथपर्यंत बदल घडवला.
खरं तर, इराकमध्ये या दीर्घ काळ चालणारा संघर्ष दूर करणे आवश्यक आहे. अनेकांनी मान्य केले कि वरवरच्या मतभेदांच्या पलीकडे जाऊन पाहिले तर प्रत्येकाच्या मनात इराकी जनतेची सेवा करणे हेच ध्येय होते. Skype वरून मी जेव्हा त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा मला वाटते की त्यांच्यातला हा (इराकी जनतेची सेवा करणे) समान दुवा धरून चाललो तर तिथे लवकरच शांती प्रस्थापित होईल, प्रगती होईल.

सर्व खासदार आणि मंत्र्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग प्रोग्राम केला पाहिजे असे सर्व सहभागींचे म्हणणे होते. अनेक वर्षे विनाशकारी संघर्ष भोगत असलेल्या या देशात शांती प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होत आहेत हे खरोखरच दिलासा दणारे आहे.

काही अनुभव:

“संपूर्ण संसदेने हा कोर्स अवश्य केला पाहिजे आणि मंत्र्यांनी पण केला पाहिजे.”

“जर इराकच्या प्रत्येक नागरिकाने हा कोर्स केला तर आम्ही शांततेत जगू!”

“पूर्वी आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो, वैयक्तिकरित्या एकमेकांना जाणून घेऊ इच्छित नव्हतो. पण आता आम्ही एकमेकांवर विश्वास ठेवतो !”

“गेल्या 10 वर्षांत मी पहिल्यांदाच व्यवस्थित झोपू शकलो. माझ्या पूर्ण कुटुंबाने हा कोर्स करावा अशी माझी इच्छा आहे. माझया पूर्ण कुटुंबाबरोबर मी याचा अभ्यास करू इच्छितो !”

“आमच्यावर इतके आघात झाले आहेत की आम्ही व्यवस्थित झोपूही शकत नाही, येथे मला गहन विश्रांती मिळाली आहे. इथे मला खूप सुखद अनुभव आला आणि आता मी व्यवस्थित झोपू शकते.”

“आमच्याकडे चार वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत, परंतु जर आपण खुल्या मानाने एकत्र बसून बोललो तर सर्व अडचणींचे निराकरण होऊ शकते.”

“माझा असा समज होता की आपल्यामध्ये नेतृत्व क्षमता एकतर जन्मजात असते किंवा अजिबात नसते. पण आता आम्हाला समजलं की आपण ती शिकणे शक्य आहे.”

“आम्ही एकाच कुटुंबातले आहोत असे मला आता वाटत आहे!”

Leave a Reply

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>