नैराश्यापासून आनंदाकडे | From depression to deep happinessFrom depression to deep happiness

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

एकदा एक व्यक्ती डॉक्टरकडे गेला व म्हाणाला की माझं सर्व अंग दुखते. त्यामुळे मी फार दु:खी आहे. सगळ्या टेस्ट्स केल्या पण काहीही सापडत नाही. डॉक्टर म्हणाले तुला काहीही झालेले नाही, जा सर्कस पाहायला आणि तिथल्या विदुषकाला बघा, तुम्हाला आपणहून हसू येईल. ती व्यक्ती म्हणाली: “मीच तो विदूषक”.

इतरांचं मनोरंजन करणे एक गोष्ट आहे पण स्वत: आनंदी राहणे दुसरीच गोष्ट आहे. सुख हे कुठल्या प्रतिभेमुळे किंवा कौशल्याने येत नाही.अंतर्मुख होऊन आपलं खरं स्वरूप काय आहे, चेतनेचे स्वरूप काय आहे हे जाणल्याशिवाय आनंदाची अनुभूती होणे शक्य नाही. खर्‍या अर्थाने अंतर्मुख झाल्याने ध्यानात उतरता येते व फक्त ध्यानाद्वारेच आनंदाची अनुभूती मिळू शकते. 6 व्या शतकातील भारतीय तत्त्वज्ञ आणि विचारक आदि शंकराचार्य यांनी असे म्हटले आहे की जे क्षणिक आहे त्याचा त्याग करून जे चिरंतन आहे त्याच्याशी नाते जोडणे यातच खरा आनंद आहे. ते इतपत म्हणतात कि असं कोणते सुख आहे जे तुम्हाला वैराग्यामुळे प्राप्त होऊ शकत नाही?  संस्कृतमध्ये शब्द ‘एकांत’ म्हणजे ‘एकाकीपणाचा शेवट’. संगत/सोबत बदलून एकटेपणा दूर होत नाही, ती संगत अगदी समजूतदार असली तरी देखील. आपलं खरं स्वरूप जाणल्यानेच एकटेपणा दूर होऊ शकतो.

प्रसिद्ध नट रॉबिन विल्यम्स हजारोंना हसवायचा परंतु स्वत:मध्ये असलेला एकटेपणा तो दूर करू शकला नाही. याने स्पष्ट होते कि फक्त अध्यात्मिक शांतीच नैराश्याच्या गर्तेतून तुम्हाला बाहेर काढू शकते. बाहेरील वैभव, संपत्ती, वाहवाही व चापलुसी यामुळे आपल्या आतील असंतुष्टी दूर नाही करू शकत. रॉबिन विल्यम्स हयात असेपर्यंत त्याने लोकांना हसवले आणि मृत्यूनंतरही संदेश देऊन गेला कि सांसारिक गोष्टींच्या पलीकडे जाऊन त्या ईश्वरी सत्तेची अनुभूती यावी यासाठी प्रयत्न करा. त्या ईश्वरी सत्तेची अनुभूती झाल्यावर दुःख दूर होऊन तुमच्यातील एक वेगळाच पैलू विकसित होईल ज्याला गहन शांती, परमानंदाच्या लाटा किंवा अनंततेची झलक म्हणता येईल आणि हे सगळं इतर कुठेही नसून आपल्यातच आहे. आपल्या फक्त तिथपर्यंत पोहोचायचे आहे.

एखाद्या मशीनचे मॅन्युअल असेल तरच त्याचा वापर करणे शक्य होते. आपलं जीवन सुरळीत चालण्यासाठी मॅन्युअल म्हणजे आध्यात्मिक-ज्ञान. ज्या प्रकारे गाडी चालविण्यासाठी स्टीअरिंग, क्लच, ब्रेक इत्यादींचा वापर करता आला पाहिजे त्याच प्रमाणे मनाला धृढ व स्थिर ठेवण्यासाठी आपल्यातील जीवनी ऊर्जेबद्दल मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. प्राणायाम हे संपूर्ण विज्ञान आहे. ज्यावेळेस आपल्यातील जीवनी शक्तीमध्ये चढउतार होत असतो त्याच प्रमाणात आपल्या भावनांमध्ये देखील तसेच चढउतार होत राहतात.

मनाच्या स्तरावर मनाला नियंत्रित करणे शक्य नसते. ह्याच कारणामुळे मानसोपचार तज्ञांचा सल्ला काही अंशी उपयोगी पडला तरी तो दीर्घकालीन उपाय म्हणून तितकासा प्रभावी ठरत नाही. केवळ सकारात्मकता लादून काहीही साध्य होत नाही आणि बर्‍यावेळेस त्याचे दुष्परिणामच दिसून येतात. अँटी डिप्रेसंट औषधांचा सुरुवातीला लाभ होत आहे असे वाटले तरी नंतर त्या प्रवृत्ती पासून मुक्त होण्याऐवजी व्यक्ती त्या औषधांच्या अधीन होऊ लागतो.

नेमके इथेच शवासांमध्ये दडलेलया रहस्यांचा उपयोग होतो. सुदर्शन क्रिया सारख्या श्वसन प्रकिया आपल्यातील प्राणशक्तीला व पर्यायाने मनाला संतुलित करतात. ध्यान केल्याने आपले आंतरिक पैलू उमलू लागतात आणि याचा परिणाम पूर्ण व्यक्तिमत्वावर जाणवतो. प्राणशक्तीचा वृद्धी झाल्यावर परिवर्तनाचा थेट अनुभव घेता येतो. बळजबरीने लादलेल्या मानसिक स्थितीपेक्षा हा अनुभव पूर्णपणे वेगळा असतो. व्यक्ती अधिक प्रसन्न राहू लागते, जास्त सृजनात्मक होऊ लागते व मनावर व भावनांवर अधिक नियंत्रण येऊ लागते.

नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी आणखी एक उपयुक्त गोष्ट म्हणजे समाज सेवा. ‘समाजासाठी मी काय करू शकतो’ याचा विचार करा. असे “माझे काय” याच्या पलीकडे जाऊन मोठ्या कार्यात स्वतःला झोकून दिलं तर जीवनाची दिशा बदलून जाईल. सेवा, त्याग व सामाजिक कार्यात जो समुदाय अग्रेसर असतो, त्या समाजात नैराश्य व आत्महत्या करण्याची प्रवृत्ती दिसत नाही. सिख समुदाय हा याचे एक उत्तम उदाहरण आहे.

जीवन आनंद आणि वेदना यांचे मिश्रण आहे. वेदना अपरिहार्य आहे परंतु दुःख वैकल्पिक आहे. जीवनाप्रती एक व्यापक दृष्टीकोन ठेवला तर आपल्याला कष्टदायक काळातून पुढे जाण्याची शक्ती मिळते. या जगाला तुमची आवश्यकता आहे याची जाणीव ठेवा. जीवनात अनंत संभावना दडलेल्या आहेत. त्यामुळे हे जीवन परमेश्वराने दिलेली एक सुंदर भेट आहे असा दृष्टिकोन बाळगा आणि मग बघा, हे जीवन स्वत:साठीच नाही तर इतरांसाठी देखील आनांदाचा झरा बनून जाईल.

Leave a Reply

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>