कोविड-१९ : यावर आपण मात करू शकतो | COVID-19: We can beat it

हे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी

कोरोना विषाणूच्या महामारीने जागतिक पातळीवरील लढ्याचे सामाजिक, आर्थिक आणि अध्यात्मिक स्तरावर दूरगामी परिणाम होणार आहेत. अशावेळी निव्वळ या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लढा देण्याबरोबरच यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण प्राप्त करणे, अशा दोन्ही स्तरावरील आव्हांनाचा सामना करताना आपला कस लागणार आहे. ही महामारीची वेळ नक्कीच गलितगात्र होण्याची नाहीतर या महामारीला गांभीर्याने हाताळून जबाबदारी घेण्याची आहे.

या विषाणूवर मात करण्याची कृती सामुदायिक हवी आहे. यासाठी प्रत्येकाने खाजगी स्वच्छता राखणे, आपले हात सतत धूत राहणे, एकमेकांमध्ये सामाजिक अंतर राखणे इत्यादी खबरदारी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. सुरवातीला हे अवघड वाटेल परंतु सरावाने हे करणे कठीण नाही. तुमच्या हे ध्यानात येईल की पूर्वापार या सवयींचे बहुतांशी संस्कृती आणि परंपरांमध्ये पालन होत आले आहे. योगाच्या प्राचीन तत्वज्ञानामध्ये निव्वळ शारीरिकच नव्हे तर आंतरिक-मानसिक आणि सभोवतालच्या परिसराच्या स्वच्छतेवर विशेष भर दिला आहे.

महर्षी पतंजलींच्या योगसूत्रामध्ये अष्टांग योगाचे अगदी पहिले आणि वैयक्तिक अंग असलेल्या नियमांमध्ये प्रथम शौच किंवा स्वच्छता. शौच – पावित्र्य आणि स्वच्छता हे यौगिक जीवनाचा पाया आहे अशा प्रकारे स्वच्छतेबाबतीत समर्थन केले आहे. शौच याचा एक गर्भित अर्थ – अनावश्यक शारीरिक संपर्क आणि जवळीक टाळणे असा देखील आहे. सकस, सात्विक आणि रसायनमुक्त आहारामुळे आपणास आंतरिक स्वच्छता प्राप्त होते, याचाही अंतर्भाव शौच मध्ये होतो. पुरेसी निद्रा, व्यायाम आणि ध्यान इत्यादी – ज्यांच्यामुळे आपल्या यंत्रणेची स्वच्छता होते, त्यांचा देखील अंतर्भाव यामध्ये होतो. योगासने, प्राणायाम आणि ध्यान यांचा अंतर्भाव असलेल्या जीवनशैलीमुळे आपली प्रतिकार शक्ती प्रबळ होते त्यामुळे कोरोना विषाणूंचा प्रभावाला आपण दूर ठेवू शकतो.

अत्यंत महत्वाचे म्हणजे या गोंधळाच्या परिस्थितीमधून आपण स्वतःला विलग करून या विषाणूच्या संसर्गाची आणि प्रसाराची शक्यता कमी करू शकतो. घरातच थांबा, प्रवास आणि गर्दीत जाणे, सामाजिक कार्यक्रमांमध्ये जाणे टाळा. मी तर म्हणेन की अगदी धार्मिक प्रार्थना आणि विधी देखील टाळा. ध्यान आणि मानस पूजा आणि प्रार्थना या कर्मकांडापेक्षा उच्च दर्जाच्या आणि अत्यंत प्रभावी आहेत. थोडे निवांत होण्यासाठी, अंतर्मुख होण्यासाठी परस्परामधील सामाजिक अंतर आणि स्व-विलगीकरण या संधी आहेत असे समजा. यामुळे तुम्हाला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी, स्वतःची भूमिका आणि ध्येय धोरणे नक्की करण्यासाठी संधी आणि वेळ मिळाली आहे. कंटाळवाण्या गतिमान जीवनशैलीचे रहाटगाडगे मोडून काही सर्जनशील लेखन, पाककृती, संगीत, चित्रकला तसेच नवीन भाषा शिकणे यासारख्या उजव्या मेंदूची कामे करण्यात मग्न राहण्याची ही संधी आहे. दृश्यापासून आपले ध्यान हटवून हरवलेल्या दृष्टाला शोधण्याची ही वेळ आहे. विश्रांती आणि क्रियाशीलता यांच्या मध्ये समतोल साधण्याची ही वेळ आहे. जो सतत विश्रांती घेत असतो त्याची जीवनात प्रगती होत नाही आणि जो सतत कार्यमग्न असतो तो गाढ विश्रांतीच्या सुखापासून विमुख होतो.

विलगीकरण म्हणजे शिक्षा नव्हे. मौन आणि एकांतवास ही स्व सामर्थ्य आणि स्व नवचैतन्य प्राप्त करण्याची सामर्थ्यशाली साधने आहेत. या जगातील बहुतांशी भव्य आणि दिव्य कार्ये ही एकांतवासातच उदयास आली आहेत. जास्तीत जास्त ध्यान करा आणि या प्राप्त चैतन्यशाली एकांतवासाचा उपयोग आपले मानसिक सामर्थ्य, सर्जनशीलता, सहानुभूती आणि उत्पादकता वाढवण्यासाठी करा. तुम्हाला तुमच्या कुटुंबीयासोबत घालवण्यासाठी हा वेळ मिळाला आहे तर त्यांचे म्हणणे ऐका, त्यांच्याशी संवाद साधा आणि वाद टाळा.

आतापर्यंत भारताने कोरोना विषाणूच्या प्रसाराविरोधातील लढा उत्तम दिला असला तरी अजून खूप काही करावे लागणार आहे. या आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांनी एकमेकांची काळजी घेणे आणि एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे जीवनावश्यक साधन सामग्री आणि बचतीची रक्कम त्यांनी काटकसर करून ती अत्यंत गरजू लोकांसाठी मदत करावी. ज्यांना हे शक्य आहे त्यांनी बचत करून एक फंड निर्माण करून गोरगरीब, मजूर आणि कामगारांच्या रोजीरोटीची सोय करावी अशी मी विनंती करतो, जेणेकरून निर्माण होणारा आर्थिक बोजा स्थानिक स्तरावर विभागला जाईल. चला, स्वतःला आणि इतरांना पटवून देऊया की येथे प्रत्येकाची काळजी घेण्याएवढी माणुसकी अजून शिल्लक आहे.

अस्थिरतेचा हा तात्पुरता कालावधी आहे. मानवजातीने पूर्वी देखील कित्येक प्राणघातक धोक्यांविरूध्द असे संघर्ष केले आहेत आणि जिंकले आहेत. सार्स, स्वाईन फ्ल्यू तसेच बुबोनिक फ्ल्यू सारख्या कित्येक साथीच्या रोगांवर आपण मात केली आहे. खात्री बाळगा की यावर देखील आपण मात करणार आहोत. या महामारीबाबतच्या निराधार अफवा पसरवण्यापासून प्रत्येकाने आळा घालावा अशी मी प्रत्येकाला विनंती करतो. कोरोना बाबतच्या वस्तुस्थिती आपल्याला माहिती होणे गरजेचे असले तरी त्याने धास्तावून जाऊ नका. अंतहीन दूरदर्शन वरील चर्चासत्रे आणि भावनाशुन्य समाज माध्यमांच्या प्रसारणामुळे अनिश्चितता वाढून काळजी आणि भीती पसरू शकते.

कोरोना विषाणू ही जागतिक स्तरावरील मोठी आपत्ती असली तरी हा काही अंत नव्हे. काळ्याकुट्ट, अंधाऱ्या ढगांभोवती दिसणारी चंदेरी रेषा आशेच्या उजेडाचा उदय दर्शवतो. आपण यावर लक्ष देणे गरजेचे आहे. वूहान मध्ये लगेच पक्षी गुंजारव करतील, तेथील आकाश आणि पाणी स्वच्छ होऊन तेथे लोक राहू लागले आहेत किंवा गरजू लोकांना त्वरित इतर खुल्या दिलाने मदत करून त्यांना सुखी करतील, या सर्वामुळे या महामारीमुळे झालेले नुकसान त्वरित भरून निघेल असे होणार नसले तरी मानवाच्या या लढयामध्ये चांगल्याची खात्री असणे, हे ही काही थोडके नाही. मात्र या संकटामुळे मानव वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छता आणि निरोगी जीवनशैलीबद्धल आणखी संवेदनशील होईल हे नक्की.

काळ हेच सर्वावर जालीम औषध आहे. वेळ देऊया, सहनशक्ती, धैर्य आणि दयाळूपणाने वेळ देऊया.

२३ मार्च, २०२० पासून दुपारी १२ आणि सायंकाळी ७.३० वाजता गुरुदेव श्री श्रीं सोबत ऑनलाईन ध्यानाचा चा लाभ घ्या.

येथून कोणतेही रेकॉर्डेड मार्गदर्शित ध्यान मोफत मिळवू शकता.

संबंधित लेख:

Leave a Reply

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>