मानसिक आरोग्य ही आज जगभरात सर्वात मोठी समस्या झालेली आहे. पूर्ण जगभर कोरोनाची सारखी महामारी पसरलेली असताना आणि लोक लॉकडाऊनमध्ये अडकलेले असताना, त्यांच्या हृदयात आणि मनात चिंता व्यापून आहे. यावर मात करण्यासाठी योग आणि ध्यान हा सर्वोत्तम उपाय आहे.
चाणाक्ष आणि सक्रिय बुद्धीचे लोक कमी बुद्धीच्या लोकांपेक्षा लवकर कंटाळतात. सर्व ऐहिक बाबींचा तुम्हाला कंटाळा यायला हवा. तेव्हा तुम्हाला आत्मज्ञान होईल.
या विषाणूवर मात करण्याची कृती सामुदायिक हवी आहे. यासाठी प्रत्येकाने खाजगी स्वच्छता राखणे, आपले हात सतत धूत राहणे, एकमेकांमध्ये सामाजिक अंतर राखणे इत्यादी खबरदारी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. सुरवातीला हे अवघड वाटेल परंतु सरावाने हे करणे कठीण नाही.
जगभरात चौथा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. अन्तस्तम फुलविणारी हि प्राचीन कला प्रकाशझोतात येण्याची हीच योग्य वेळ आहे. गेल्या चार वर्षात योगाला जागतिक स्तरावर लाभलेली मान्यता, त्याची लोकप्रियता ह्यामुळे त्याच्या मार्गातील सारे अडथळे दूर सारले गेले. योगसाधनेकडून असलेल्या प्रचंड अपेक्षा, त्याबद्दल असलेल्या धारणा आणि त्यात असलेली बहुमुखी प्रतिभा हेच दर्शवते कि आधुनिक जगातल्या बऱ्याच व्याधींवर रामबाण उपाय आहे.
आपल्या आयुष्याच्या अनेक रहस्यांपैकी ‘काळ’ हे एक मोठे गूढ आहे. काळ हा सर्वोत्तम कथाकार आहे आणि त्यासारखा कोणी साक्षीदारही नाही. बाह्य जगतात काळ प्रत्येकासाठी अगदी एकसारखा धावत असतो, तरीही, वेळ पटकन निघून जाते की रखडत जाते, हे प्रत्येकाच्या मानसिक अवस्थेवर अवलंबून असते.